रस्त्यावर राहणारी मुले
एखाद्या शहरांतील रस्त्यावर राहणार्या मुलांचा उल्लेख करण्यासाठी स्ट्रीट चिल्ड्रन शब्दांशाचा वापर करण्यात येतो. त्यांना कुटुंबाचे संगोपन आणि संरक्षण कधीच मिळत नाही. ही मुले साधारणतः 5 ते 17 वयोगटातली असतात, आणि प्रत्येक शहरात त्यांची संख्या वेगवेगळी असते. अशी मुले पडक्या इमारती, पुठ्याची खोकी, बागा किंवा रस्त्यावरच झोपतात. ह्या मुलांबद्दल बरेच काही बोलले आणि लिहिले जाते खरे मात्र त्यांची विशिष्ट वर्गवारी नाही. काही मुले रस्त्यावर दिवस काढून झोपायला घरी जातात, तिथे ही त्यांच्या पालकांना ती नकोच असतात, तर जी मुले पूर्णपणे रस्त्यावरच राहतात त्यांच्याकडे बघणारे मोठे कोणीच नसते.
रस्त्यावरच्या अशा मुलांचे दोन मुख्य वर्ग UNICEF ने निश्चित केले आहेत : –
- रस्त्यावर राहणारी मुले कोणत्या तरी आर्थिक व्यवहारात गुंतलेली असतात, मग ते भीक मागणे असो की वस्तू विकणे असो. अशा मुलांपैकी बरीच मुले दिवस मावळल्यावर घरी जातात व दिवसभराची कमाई ते कुटुंबास देतात. काही मुले शाळेत जाणारी असू शकतात व त्यांना कुटुंबासह राहण्याचे थोडे तरी समाधान मिळते. पण कुटुंबाची एकंदर नाजुक आर्थिक स्थिती पाहतां, अशी मुले बहुधा कायम रस्त्यावरच जगणे पसंत करतात.
- रस्त्यावरची मुले खरोखरच रस्त्यावर जगतात (किंवा सामान्य कौटुंबिक वातावरणाच्या बाहेर). कौटुंबिक दुवे अस्तित्वात असू शकतात पण अगदी कमकुवत किंवा कधीतरी निभावण्याच्या लायकीचे असतात.
भारतातील अनाथ आणि रस्त्यावर राहणार्या मुलांची स्थिती
- भारत ही जगातील 1 अब्जापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली सर्वांत मोठी लोकशाही व्यवस्था आहे ज्यांपैकी 40 कोटी मुलेमुलीच आहेत.
- भारत त्याच्या बहु-पारंपारिक, बहु-भाषीय आणि बहु-धार्मिक पार्श्वभूमीसाठी ओळखला जातो. भारतात 15 अधिकृत भाषा, 36 राज्ये व केंद्रशासित प्रदेश आहेत.
- भारतात सुमारे 673 कोटी हिंदू, 95 कोटी मुस्लिम, 19 कोटी ख्रिस्ती, 16 कोटी शीख, 60 लाख बौद्ध व 30 लाख जैन आहेत.
- भारतीय लोकसंख्येपैकी सुमारे 26% दारिद्र्यरेषेखाली आहेत तर 72 % ग्रामीण भागांत राहतात.
- भारतीय लोकसंख्येपैकी एचआयवी/एड्स झालेल्यांचे प्रमाण फक्त 0.9% असले (5) तरी ह्या बाबतीत जागतिक पातळीवर आपला दुसरा क्रमांक आहे, पहिली दक्षिण आफ्रिका आहे.
- आपण अलिकडील काही वर्षांत बरीच प्रगती केली असली तरी स्त्रीपुरुष भेदभाव, गरिबी, निरक्षरता आणि मूलभूत संसाधनांची कमतरता ह्या सारख्या बाबींची भूमिका भारतात एचआयवी/एड्स पासून बचाव आणि उपचार कार्यक्रमात अडथळे आणण्यात महत्वपूर्ण ठरते. एड्सच्या संकटाचा प्रभाव भारतात अजून पूर्णपणे प्रसारास आला नसून एड्समुळे अनाथ झालेल्या मुलांसंबंधीच्या नोंदी ही नाहीत.
- तरी ही, एड्समुळे अनाथ झालेल्या मुलांची सर्वाधिक संख्या भारतात असल्याचे अनुमानित आहे आणि येत्या पाच वर्षांत हा आकडा दुप्पट होण्याची शक्यता आहे.
- भारतातल्या 55,764 एड्सच्या रुग्णांपैकी 2,112 मुले आहेत.
- असा अंदाज आहे की एचआयवी/एड्सग्रस्त 4.2 दशलक्षांमध्ये 14 वर्षाखालील मुलांचे प्रमाण 14% आहे.
- आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेतर्फे करण्यात आलेल्या अभ्यासांत (ILO) असे आढळले की एड्सग्रस्त व्यक्तींच्या मुलामुलींशी भेदभाव करण्यात येतो. 35% ना मूलभूत सुविधा नाकारण्यात आल्या तर 17% ना जगण्यासाठी किरकोळ कामे करणे भाग पडले.
- भारतातील बालश्रम ही एक गंभीर समस्या आहे व ह्याचा थेट संबंध गरिबीशी आहे.
- 1991 च्या जनगणनेतील माहितीवरून दिसते की भारतात 11.28 दशलक्ष श्रमिक मुले आहेत.
- ह्या बालश्रमिकांपैकी सुमारे 85% ग्रामीण भागात आहेत आणि गेल्या दशकात हे प्रमाण वाढले आहे.
- लक्षपूर्वक मांडलेले अंदाज देखील सांगतात की आज भारतातील 300,000 मुले व्यावसायिक देहविक्रयात गुंतलेली आहेत. भारतातील काही क्षेत्रांमध्ये देवदासी पध्दतीच्या नावांखाली बाल-वेश्यावृत्तीस सामाजिक मान्यता आहे. दरिद्री कुटुंबातील लहान मुली देवाला सोडल्या जातात व त्या धार्मिक वेश्या बनतात. 1982च्या समर्पण प्रतिबंधक कायद्यानुसार (प्रोहिबिशन ऑफ डेडिकेशन ऍक्ट 1982) देवदासींवर बंदी आहे. तरी ही आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, ओरिसा, उत्तर प्रदेश व आसामसारख्या राज्यांत ही प्रथा चालू आहे.
- देवदासींपैकी 50 % वेश्यव्यवसायात शिरतात: त्यांचेपैकी सुमारे 40 टक्के शहरी विभागातील वेश्यागृहांत येतात तर उरलेल्या आपापल्या खेड्यांत हा व्यवसाय करतात. राष्ट्रीय महिला आयोगाच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील सुमारे 250,000 स्त्रियांना देवदासी बनविण्यात आलेले आहे. 1993 मधील एका अध्ययनानुसार कर्नाटकातल्या एकट्या बेळगांव जिल्ह्यातल्या 9% देवदासी एचआयवी पॉझिटिव आहेत.
- रस्त्यावर रहणार्या मुलमुलींना रस्ता हेच आपले खरे घर वाटू लागते, जेथल्या परिस्थितीत त्यांना कोणते ही संरक्षण नसते, त्यांच्यावर कोणाची देखरेख नसते आणि त्यांना सल्ला देणारी कोणी जबाबदार प्रौढ व्यक्ती ही नसते. मानवी हक्कासंबंधी संस्थेला असे दिसले आहे की भारतातील रस्त्यांवर सुमारे 18 दशलक्ष मुले राहतात किंवा कामे करतात. ह्यांपैकी बरीचशी मुलेमुली गुन्हेगारी, वेश्याव्यवसाय, गँग बनवून मारामार्या करणे आणि मादक द्रव्यांच्या वाहतुकीत गुंतलेली आहेत..