Site icon MH General Resource

कायदेतज्ज्ञ म्हणून ओळख…

कायदा विषयात करियर करण्याचे ठरविले तर, आपण प्रथम दोनच पदव्यांचा विचार करतो. एलएलबी म्हणजे कायद्यातील पदवी आणि एलएलएम म्हणजेच पदव्युत्तर पदवी. मात्र, यापुढेही जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर विचार केल्यास कायद्यात विविध शिक्षणक्रम उपलब्ध आहेत.

भारतात केंद्र शासीत प्रदेश आणि जिल्हे मिळून एकूण 24 उच्च न्यायालये कार्यरत आहेत. राष्टरीय स्तरावर सर्वोच्च न्यायालय कार्यरत असते. लोकशाहीच्या चार आधारस्तंभापैकी एक म्हणजे आपली न्यायव्यवस्था आहे. नागरी न्यायालय, गुन्हेविषयक न्यायालय, कार्यकारी न्यायालय, कौटूंबिक न्यायालय, दिवाणी न्यायालय या न्यायव्यस्थेअंतर्गत कार्यरत असतात.

कायदा विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यावर कोणत्याही नामांकित कंपनीमध्ये किंवा खासगी किंवा सरकारी संस्थेत कायदेविषयक सल्लागार म्हणून काम करण्याची संधी प्राप्त होते. तर, दिवाणी न्यायलय ते सर्वोच्च न्यायालयात तुम्हाला वकील किंवा न्यायाधिश म्हणून काम करण्याची संधी प्राप्त होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत परिक्षा आयोजीत करण्यात येते.

16 राष्ट्रीय कायदा विद्यापीठे भारतात कार्यरत आहेत.

या शिक्षणक्रमास प्रवेश घेण्यासाठी एसईटी, एमएच सीईटी, एमयुसीएलईटी, बीव्हीपी सीईटी आदी प्रवेश परिक्षा राज्यासाठी घेण्यात येतात.

सिबॉसिस लॉ कॉलेज, पुणे, आयएलएस लॉ कॉलेज पुणे, सिंहगड लॉ कॉलेज पुणे, गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई, भारती विद्यापीठ न्यु लॉ कॉलेज पुणे, दयानंद कॉलेज ऑफ लॉ लातुर, नवजीवन लॉ कॉलेज नाशिक, ए.के.के. न्यु लॉ अकॅडमी पुणे, डॉ. पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ लॉ अमरावती, जीजेए लॉ कॉलेज मुंबई, माणिकचंद पहाडे लॉ कॉलेज औरंगाबाद, पीईएस मॉर्डन लॉ कॉलेज पुणे, एनजीएलसी ठाणे, भारती विद्यापीठ न्यु लॉ कॉलेज सांगली, डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ मुंबई, इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेज सातारा, सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ लॉ नागपूर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अशा अनेक महाविद्यालयात कायद्याचे शिक्षणक्रम उपलब्ध आहे.

प्रादेशिक विभाग आणि महाविद्यालये तसेच उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सोयी-सु‍व‍िधा यानुसार  शैक्षणिक शुल्क हे ५ हजार ते १ लाखापर्यंत आहे.

एलएलबी – बॅचलर ऑफ लेगीसलेटीव्ह लॉ – हा तीन वर्षाचा पदवी शिक्षणक्रम असून, ४५ % सह पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे.

बॅचलर ऑफ आर्ट + एलएलबी – हा ५ वर्षाचा पदवी शिक्षणक्रम आहे. ४५ % सह १० + 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

एलएलएम – मास्टर ऑफ लॉ – हा एक वर्षाचा शिक्षणक्रम असून, एलएलबी ५० % सह पूर्ण असणे आवश्यक आहे.

पदविका- एक वर्षाचा पदविका शिक्षणक्रम उपलब्ध आहे.

आंतरराष्ट्रीय विद्यापीठात मास्टर ऑफ लॉ, ज्युरीस डॉक्टर, एमबीए ज्युरीस, मास्टर ऑफ जस्टीस ॲण्ड क्रीमीनॉलॉजी, एलएलएम ट्रेडिश्नल ट्रॅक, मास्टर ऑफ लॉ क्रीमिनल जस्टीड, असे विविध पदवी पदविका शिक्षणक्रम असून, १० लाख ते २५ लाखांपर्यंत शिक्षणक्रम शुल्क आकारण्यात येते.

Exit mobile version