“कौटुंबिक हिंसाचार: Koutambik Hinsachar”
तुम्ही कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करत आहात का?
घराच्या चार भिंतीत स्त्रियांविरोधात होणाऱ्या हिंसाचाराचे प्रमाण खूप अधिक आहे. कौटुंबिक हिंसाचार व्यापक स्तरावर प्रचलित आहे पण तो फारसा दिसून येत नाही. आकडेवारीतून दिसून येते की, ४५ टक्के भारतीय स्त्रियांना त्यांचे नवरे थोबाडीत मारतात, लाथा मारतात किंवा मारहाण करतात (आयसीडब्ल्यूआर २००२). ३२ टक्के नवऱ्यांनी पत्नी गरोदर असताना तिच्याविरोधात हिंसाचार केलेला आहे. भारतात दर ६० मिनिटांनी एक स्त्री कौटुंबिक हिंसेमुळे दगावते. सामाजिक संकेतांमुळे स्त्रिया कौटुंबिक हिंसाचार सहन करतात. तसेच संस्कृतीची बंधने आणि आर्थिक परावलंबित्व यांमुळे स्त्रियांना पतीच्या घरी राहणे भाग पडते. कौटुंबिक हिंसाचाराला प्रतिबंध करण्यासाठी फौजदारी कायदा तर आहेच, शिवाय, अलीकडेच आलेल्या ‘प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायोलन्स’ या दिवाणी कायद्याचा उद्देश स्त्रीला मदत, भरपाई व पाठिंबा पुरवणे हा आहे.तुमचा पती किंवा जोडीदार तुमच्या किंवा तुमच्या मुलाच्या विरोधात खालीलपैकी कोणते हिंसक कृत्य करतो का?
– भाषिक किंवा भावनिक हिंसाचार
– अपमान- तू आकर्षक नाहीस, स्मार्ट नाहीस, मला/माझ्या आईवडिलांना मान देत नाहीस असे बोलणे
– तुमच्या आईवडिलांवर आरोप करणे/त्यांचा अपमान करणे
– शिवीगाळ करणे (नेम-कॉलिंग)
– तुमच्या चारित्र्यावर किंवा वर्तनावर आरोप करणे
– हुंडा न दिल्याबद्दल अपमान करणे
– मुलगा जन्माला न घातल्याबद्दल अपमान करणे
– तुम्हाला किंवा तुमच्या ताब्यातील मुलाला शाळा, कॉलेज किंवा कोणत्याही शैक्षणिक संस्थेत उपस्थिती लावण्यास प्रतिबंध करणे
– तुम्हाला नोकरी करण्यास प्रतिबंध करणे
– तुम्हाला नोकरी सोडण्यासाठी जबरदस्ती करणे
– तुम्हाला किंवा तुमच्या ताब्यातील मुलाला घरातून बाहेर जाण्यास मनाई करणे
– तुम्हाला सामान्य दिनक्रमात एखाद्या व्यक्तीस भेटण्यापासून रोखणे
– आत्महत्येची धमकी देणे
आर्थिक हिंसाचार
– तुम्हाला स्वत:च्या किंवा तुमच्या मुलांच्या देखभालीसाठी पैसे न देणे
– तुम्हाला तसेच तुमच्या मुलांना अन्न, कपडे, औषधे न पुरवणे
– तुम्हाला रोजगार सुरू ठेवण्यापासून रोखणे
– तुम्हाला रोजगाराची संधी घेण्यास मज्जाव करणे
– तुमचा पगार, रोजंदारी तुमच्याकडून काढून घेणे
– तुमचा पगार, रोजंदारी वापरण्यापासून तुम्हाला रोखणे
– तुम्हाला तुम्ही राहत असलेल्या घरातून जबरदस्तीने बाहेर काढणे
– घराच्या कोणत्याही भागात प्रवेश करण्यास किंवा तो वापरण्यास तुम्हाला मज्जाव करणे
– तुम्हाला कपडे, वस्तू, किंवा सामान्य घरगुती वापराच्या वस्तू वापरण्यास परवानगी न देणे
– भाड्याच्या घरात राहत असल्यास घरभाडे न भरणे
शारीरिक हिंसाचार
– थोबाडीत मारणे
– मारहाण करणे
– आपटणे
– चावे घेणे
– लाथा मारणे
– बुक्के मारणे
– ढकलणे
– लोटून देणे
– कोणत्याही पद्धतीने शारीरिक वेदना देणे किंवा जखमा करणे
लैंगिक हिंसाचार
– जबरदस्तीने शारीरिक संभोग करणे
– तुम्हाला पोर्नोग्राफी किंवा अन्य काही अश्लिल साहित्य किंवा चित्रे बघण्याची जबरदस्ती करणे
– तुम्हाला त्रास देण्याच्या, तुमचा अपमान करण्याच्या किंवा कमी लेखण्याच्या उद्देशाने लैंगिक कृत्य करणे अथवा तुमच्या प्रतिष्ठेचा भंग करणारे किंवा अन्य कोणत्या प्रकारे खपवून न घेण्याजोगे लैंगिक कृत्य करणे
सरकारने नुकताच कौटुंबिक हिंसाचार (डीव्ही) कायदा संमत केला आहे हे लक्षात ठेवा.
डीव्ही कायद्याची ठळक वैशिष्ट्ये:
– पीडब्ल्यूडीव्हीए पुरुषासोबत कौटुंबिक नात्यात राहणाऱ्या प्रत्येक स्त्रीला सामावून घेतो, लिव्ह-इन नातेसंबधात राहणाऱ्या, द्विभार्या विवाहात राहणाऱ्या, फसव्या लग्नांत राहणाऱ्या सर्व स्त्रियांना हा कायदा लागू आहे.
– हा कायदा स्त्रियांना सामाईक कुटुंबात राहण्याचा हक्क देतो
– या कायद्यानुसार, न्यायदंडाधिकारी हिंसाचार थांबवण्यासाठी त्वरित संरक्षक आदेश देऊ शकतात.
– हा कायदा दोन्ही पक्षांना स्वतंत्र किंवा संयुक्त पद्धतीने समुपदेशन पुरवतो.
– ३ दिवसांच्या आत केस नोंदवली गेली पाहिजे आणि ६० दिवसांच्या आत सर्व देय सहाय्य दिले गेले पाहिजे असे या कायद्यात निर्दिष्ट आहे.
कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेची माहिती कोणाला द्यावी?
– नजीकचे पोलीस ठाणे
– संरक्षण अधिकारी (जिल्ह्याच्या महिला व कुटुंबकल्याण विभागाचे प्रकल्प संचालक). तुमच्या स्थानिक संरक्षण अधिकाऱ्याशी संपर्क साधा.
– सेवा पुरवणारे (राज्य सरकारद्वारे नियुक्त)
– न्यायदंडाधिकारी
तुम्हाला निवारा नसेल तर-
– निवाऱ्यासाठी: निवाराघरात निवारा पुरवण्याच्या दृष्टीने नजीकचे संरक्षण अधिकारी किंवा सेवा पुरवठादार
– वैद्यकीय सुविधांसाठी: कोणत्याही वैद्यकीय सुविधेसाठी नजीकचे संरक्षण अधिकारी किंवा सेवा पुरवठादार
– मदतीसाठी किंवा आदेश प्राप्त करण्यासाठी: न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अर्ज करणे
– भरपाईच्या पेमेंटसाठी किंवा हानीसाठी: सामाईक घरात राहण्याचा अधिकार
– संरक्षण आदेश: कौटुंबिक हिंसाचाराच्या कोणत्याही कृत्याच्या प्रतिबंधासाठी
– मदत करणे किंवा प्रवृत्त करणे: नोकरीच्या ठिकाणी प्रवेश करणे किंवा मुलाच्या शाळेत जाणे; व्यक्तिगत, मौखिक, लेखी, इलेक्ट्रॉनिक किंवा टेलिफोनच्या माध्यमातून संपर्क साधणे
मालमत्तेपासून वंचित ठेवणे
– तिचे स्त्रीधन असलेली बँकेची लॉकर्स किंवा दोन्ही पक्षांची संयुक्त वा एकेरी बँकखाती ऑपरेट करणे
– तिच्या नातेवाईकांविरोधात किंवा अन्य व्यक्तींविरोधात हिंसाचार करणे
– अन्य कोणतेही कृत्य
– निवास आदेश
– पैशाच्या स्वरूपातील मदत
– ताबाविषयक आदेश
– भरपाईचे आदेश