Site icon MH General Resource

गुंतवणूकदार सुरक्षा फंड ( Investors Protection Fund)

या फंडाची स्थापना गुंतवणुकदारासाठी केली गेली आहे. जेव्हा शेअर दलाल आपल्या जवाबदारी मध्ये निष्फळ होतात. तेव्हा या फंडा पासून गुंतवणुकदाराना त्यांचे पैसे परत मिळतात. या फंडाची नोंदणी चॅरीटी कमीशनर मध्ये झालेली आहे.

बीएससीचे गुंतवणूकदार सुरक्षा फंड (Investoes Protection Fund of BSE) :

फंडाची स्थापना बीएससी (BSE) ने सर्वप्रथम केली. या फंडाची स्थापना दलाल विरोधी ग्राहकाच्या संरक्षणासाठी केली गेली आहे. याची स्थापना १० जुलाई १९८६ ला झाली आहे आणि चॅरीटी कमीशन कडे यांची नोंदणी झाली आहे. बीएससी (BSE) दलालाच्या चूकी वर जास्तत जास्त १० लाख पर्यंत नुकसान भरपाई करून देते. शेअर दलाल १० लाखाच्या Turnover वर १.५० पैशांच्या हिशोबानी पैसे फंडात जमा करतात आणि नवीन कंपनीच्या लीस्टींग फीझ listing fees मधुन २.५% त्या फंडात जमा करते.

एनएससीचे गुंतवणूकदार सुरक्षा फंड (Investors Protection Fund of NSE) :

मुंबई लोक फंड १९५० च्या नावा खाली हा फंड (Trust) म्हणून स्थापित केला गेला आहे. आयपीएफ (IPF) चे संचालन एनएसई च्या हाताखाली होत आहे. जर दोषीत दलालानी कामाची सेटलमेंट केली नाही तर ग्राहकांची मागणी हक्क सुरक्षित राखविण्यासाठी अशी योजना केलेली आहे. जेव्हा दलाल दोषी ठरतो तेव्हा आयपीएफ (IPF) च्या फंडाच्या रक्कमेतून ग्राहकाला त्यांची रक्कम परत दिली जाते. आयपीएफ ग्राहकांंपर्यंत ५ लाख नुकसान भरपाई करून.

ट्रेड गॅरेन्टी फन्ड (व्यापार हमी निधी):

व्यापारच्या समस्या मिटवण्यासाठी आणि दलाला कडून खात्रीचा व्यवहार करण्यासाठी आणि मार्केट मध्ये समतोलनपणा ठेवण्यासाठी १२ में १९९७ पासून ट्रेड गॅरेन्टी फंन्ड अस्तित्वात आला. ट्रेड गॅरेन्टी फन्ड (Trade Guarantee Fund) चे हेतू खालील प्रमाणे आहे.

१. स्ट्रोक एकचेन्जचे व्यवहार वेळेवर पूर्ण करणे आणि शेअरधारकांची आणि स्ट्रोक एकचेन्जच्या (Stock Exchange) सभासदा मधील विश्वासाचे नाते कायम ठेवण्यास मदत करणे.

२. द्वितीय मार्केटच्या भारतीय आणि विदेशी बाजारात भारतीय गुंतवणदार

आणि एफ.आय.आय (FII) चा मार्केट मधिल भरोसा कायम ठेवण्यासाठी ३. गुंतवणुकदाराचा विश्वास संपादन करणे आणि तो कायम राखणे आणि द्वितीय बाजाराची प्रगती घडवून आणणे.

या फंडाचे संचालन डीफोल्टर कमेटी (Defaulters Committee) करते. ही कमीटी एक्सचेंज ने तयार केली आहे आणि एसईबीआय (SEBI) ने त्यांस संमति दिलेली आहे.

Exit mobile version