Site icon MH General Resource

धोक्याचे मोजमाप आणि धोक्याचे मोजमाप करणा-या एजेन्सी (Credit Rating And Credit Rating Agency)

धोक्याचे मोजमाप (Credit Rating ):

धोक्याचे मोजमाप हे सेबीच्या (Credit Rating Agencies) Regulations रेग्युलेशन १९९९ या कायदयाअंतर्गत चालते. यात फीक्स डीपोजिट फॉरन एक्सेन्ज कन्ट्री (Country) रेटींग रिअल इस्टेट यांतील धोक्यांचे मोजमाप केले जात नाही. ते फक्त सेक्युरिटी संदर्भातील धोक्याचे मोजमाप करतात. सीआरएची स्थापना ही पाब्लिक फायनांशिअल इन्स्टीटयुशन शेडयुल कमर्शियल बैंक भारतात स्थापन झालेली विदेशी बैंक विदेशी क्रेडीट रेटींग एजेन्सी वगैरे मार्फत होऊ शकतात आणि यासाठी त्यांना या क्षेत्रात कीमान ५ वर्षाचा अनुभव असायला हवा अथवा चालु वर्षाच्या आधीच्या ५ वर्षात त्याचे नेट वर्थ किमान १०० करोड असले पाहीजे.

क्रेडीट रेटींग करणे सक्तीचे (मॅन्डेटरी) आहे. (Credit Rating is Mandatory):

क्रेडीट रेटींग करणे सक्तीचे (मॅन्डेटरी) आहे कंपन्यामार्फत होणा-या कॉरपोरेट बॉन्ड आणि डीबेन्चरचे पब्लीक इशू करण्यासाठी सेबी (सेक्यूरीटी अॅन्ड • एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडीया) ने त्या कंपन्यांना त्यांच्य इन्स्ट्रूमेंटचे रेटींग करून घेणे सक्तीचे केले आहे. तसेच १०० करोड आणि त्यातून जास्त रूपयांचा इशू करण्यासाटी सेबीने त्या कंपन्यांना त्यांच्या इन्स्ट्रूमेंटावर दोन वेगवेगळ्या कंपन्या मार्फत दोन वेगवेगळी रेटींग करून घेण्याचेही सक्तीचे केले आहे. दोन्ही रेटींगमध्ये पूर्णपणे पारदर्शकता आहे की नाही याची तपासणी करणे हा यामागिल मुख्य हेतू आहे.

भारतातील क्रेडीट रेटींग एर्जेन्सी (Credit Rating Agencies in India):

१. क्रेडीट रेटींग इनफोर्मेशन सर्व्हिस ऑफ इंडिया लीमीटेड (क्रिसिल):

ही कंपनी १९८७ मध्ये स्थापन झाली. ही भारतातील धोक्याचे मोजमाप करणारी त्यावर संशोधन करणारी धोक्यावर उपाययोजना करणारी प्रमुख कंपनी आहे. त्याची प्रतिष्ठा (Reditability) आणि विश्लेषण (analytical rigour) करण्याची पध्दती असाधारण आहे.

२. इनवेस्टमेंट इनफॉरमेशन अॅड क्रेडीट रेटींग एजेन्सी ऑफ इंडीया (ICRA):

(ICRA) आयसीआरएची स्थापना १९९१ मध्ये झाली आणि नंतर ही एक स्वतंत्र आणि प्रोफेशनल कंपनी बनली आहे. ही गुंतवणुकी बद्दल योग्य माहीती देणारी आणि धोक्याचे मोजमाप करणारी मुख्य कंपनी आहे. त्याच्या सेवा भारतात तसेच विदेशातही उपलब्ध आहेत.

१३. क्रेडीट अॅनालिसिस अॅन्ड रिसर्च लिमिटेड (CARE) :

(CARE) सीएआरइची स्थापना १९९३ मध्ये झाली. धोक्याचे मोजमाप करणा- या त्याबद्दल माहीती देणा-या या कंपनीची स्थापना आयडीबिआय बँक, कॅनरा बँक, युटीआय बँक, आणि इतर प्रसिध्द बँका आणि फायनांशिअल सेवा पुरवणा-या कंपन्यामार्फत केली गेली आहे. (CARE) सीएआरइचे एकूण १४ शेअरधारक आहेत.

CARE सीएआरई ही कंपनी गव्हरमेंट ऑफ इंडीयाच्या निर्देशनाअंतर्गत चालते. तसेच ती रेग्युलेटरी ऑथोरिटी म्हणजेच, रिजर्व बँक ऑफ इंडीया ( Reserved bank of India) आणि (SEBI) सेबीच्या निर्देशनाप्रमाणे देखिल काम करते.

Exit mobile version