Site icon MH General Resource

न्यायवैद्यक – गंभीर घटना

  1. प्रस्तावना
  2. गंभीर समजल्या जाणाऱ्या दुखापती

प्रस्तावना

या सर्व घटनांची आधी पोलीस पाटील अथवा प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात नोंद केली जाते. पोलिसांनी नोंद घेतल्यानंतर प्रसंगाच्या गांभीर्याप्रमाणे ‘दखल’ घेतली जाते. बलात्कार,खून, आत्महत्या, विषारी पदार्थांचे सेवन, दारू पिऊन वाहन चालवणे, अनैसर्गिक लैंगिक संबंध, लग्नानंतर सात वर्षाच्या आत विवाहितेचा मृत्यू किंवा शारीरिक इजा या सर्व दखलपात्र गंभीर घटना आहेत (इंडियन पीनल कोड 304 व 174, (3), 498 (अ). पोलिसांना यासंबंधी सर्व तपासणीची जबाबदारी घ्यावी लागते. आपण फक्त पोलिसांपर्यंत ही बाब पोहोचवायची असते. असे प्रकार नुसते पोस्टकार्ड पाठवल्यानंतरदेखील न्यायसंस्थेने नोंदवल्याची उदाहरणे आहेत. खालील दुखापती ‘गंभीर’ समजल्या जातात.

गंभीर समजल्या जाणाऱ्या दुखापती

डॉक्टरी प्रमाणपत्रानेच ही जखम ‘दखलपात्र’ आहे हे सिध्द करावे लागते. उरलेल्या किरकोळ जखमांच्या बाबतींत पोलीस फक्त सरकारी डॉक्टरला चिट्ठी (पोलीस यादी) देऊन प्रमाणपत्र द्यायला सांगतात. जखम गंभीर असल्यास पोलीस ठाणे टाळून सरळ (सरकारी) रुग्णालयात गेल्यास तिथल्या डॉक्टरवर पोलिसांना खबर देण्याची जबाबदारी असते.

Exit mobile version