_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/05/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/mhgr_barandbench_2024-05_7c1b7d2a-75a6-4c0d-969b-a21eab60066e_supreme_court_of_india__web_page_1600x-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee भजन (Bhajan) - MH General Resource भजन (Bhajan) - MH General Resource

भजन (Bhajan)

भक्तिसंगीतातील एक प्रकार.त्यास टाळ,मृदंग,पखवाज या वाद्यांची साथ असते. हा प्रकार सामवेदापासून सुरू झाला असे अभ्यासकांचे मत आहे. भजनाचा स्पष्ट उल्लेख श्रीमद्भागवताच्या दसमस्कंधात होतो. भागवताच्या काळापासून भजनाची परंपरा रुढ आहे. उत्तर हिंदुस्थानात भजन करणाऱ्या भक्तांना भजनी मंडळी म्हणतात. ही मंडळी चैतन्य महाप्रभूंचे अभंग, चंडीदासाची भजने, गौडी संप्रदायाची भजने, तुलसीदासांची सगुण भजने, तसेच सुरदास, मिराबाई आणि कबीर यांची निर्गुण भजने म्हणतात. पश्चिम बंगालमध्ये कीर्तनीया ही नामसंकीर्तनाची स्वतंत्र परंपरा आहे. वैष्णव भजनात रामकृष्णाच्या कथा येतात. या कथा प्रमुख विणेकरी व पेटी वाजविणारा सांगतो. शैव आखाड्यात शिववर्णनपर भजने म्हटली जातात. कर्नाटक संगीतामध्ये भजन म्हणणारे ‘भागवतार’ मृदंग, टाळ, वीणा व तंबोरा यासह भजन म्हणतात. तंजावर प्रांतात देवदेवतांच्या पालख्यांपुढे भजने म्हटली जातात. यात पुरंदर दास, बोधेंद्र गुरूस्वामी त्यागराज, सदाशिव ब्रह्मेंद्र इ.च्या रचना असतात. गुजरात मधील भजनपरंपरेचा नरसिंह मेहेता हा प्रवर्तक आहे.गुजरातमध्ये चारणभाट यांची भजनाची परंपरा आहे.ओरिसातील भजनी परंपरा ही रामकृष्ण कथांनी युक्त असते. इशान्येकडील राज्यांत अंकियानाट अशी भजनाची परंपरा आहे. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाने भजन गायनाची परंपरा सुरू केली. त्यापूर्वी महानुभावपंथात मठसंगीत होते.भजन चक्रधरांच्या गुणस्तुतीपर कवनातून उपलब्ध होते. महाराष्ट्रात भजनाचे सोंगी भजन, दत्तपंथी भजन, नाथपंथी भजन, चक्री भजन, डबलबारीचे भजन असे विविध प्रकार आहेत.

Telegram Group Join Now

महाराष्ट्रात ‘भजन’ हा प्रयोगात्म लोककलाप्रकार म्हणून ओळखला जाण्याआधी तो नामसंकीर्तनप्रकार म्हणून सर्व परिचित होता आणि आहे. भजनाला आध्यात्मिक अधिष्ठान असते. त्यामुळे त्याकडे निखळ रंजनपर प्रकार म्हणून पाहता येत नाही. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय असे पाच भक्ती संप्रदाय सर्वपरिचित असून शक्ती देवतेच्या उपासकांचा शाक्त संप्रदाय आणि तंत्रमंत्र विद्येचा कापालिक संप्रदाय असे संप्रदायही भारतभर परिचित आहेत. या संप्रदायांपैकी बहुताश संप्रदायांमध्ये नामसंकीर्तन भक्ती रूढ असून या नामसंकीर्तन भक्तीचा अविष्कार भजनाव्दारे होतो. एखाद्याचा भजनी लागणे अशा स्वरूपाचा वाक्प्रचार रूढ आहे. ‘भजनी लागणे’ याचा अर्थ गुणगान गाणे. इष्टदेवतेचे नामसंकीर्तन संप्रदायानुसार भजनाव्दारे केले जाते. कीर्तन आणि भजन हे दोन्हीही प्रकार नामसंकीर्तनात मोडतात.कीर्तनात एखाद्या अभंगावर भाष्य असते. हे भाष्य कीर्तनकार करतो,तर भजनात भाष्य नसून केवळ अभंगगायन असते. कीर्तनात गायनासोबत निरूपण असते, तर भजनात केवळ गायन असते.

संत तुकाराम महाराज वैकुंठाला जाताना त्यांनी “भजन करा सावकाश” असा संदेश आपल्या अनुयायांना दिला होता. जिभले तुला काय धंदा। घडोघडी भज रे गोविंदा।। असे भजनाचा महीमा सांगणारे पद संत गाडगेमहाराज, संत तुकडोजीमहाराज यांच्या अनुयायांमध्ये लोकप्रिय आहे. भजनाने म्हणजे नामसंकीर्तनाने जन्मांतरीची पापे नष्ट होतात अशा आशयाचा एक अभंग आहे. ‘नामसंकीर्तन साधन पै सोपे। जळतील पापे जन्मांतरीची’ या अभंगासारखाच अन्य अभंग असा ‘नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले’. भजनातील नामसंकीर्तनाची महती सांगणारे असे अनेक अभंग आढळतात. भजन हे मूलतः आत्मोध्दारासाठी केले जाणारे संकीर्तन असून त्याला रंजनाची जोड अलीकडच्या काळात मिळाली. नाटक, चित्रपटांचा प्रभाव जसजसा वाढत गेला, तसतसे चित्रपटगीतांच्या चाली भजनातील अभंगाला लावल्या जाऊ लागल्या आणि भक्तिसंगीताने लोकप्रिय संगीताचा असा अनुनय सुरू केल्यानंतर नामसंकीर्तन भजन रंजनपरही होऊ लागले. भजनात मुख्यतः रूपाचा अभंग, ध्यानाचा अभंग आणि अभंगपंचक अशी रचना असते. अभंगपचंकात बाळक्रीडेचे अभंग, विराण्या, उपदेशपर अभंग, देवाचा धावा, गवळणी अशा स्वरूपाचे अभंग गायिले जातात. हे स्वरूप वारकरी भजनाचे असते. वारकरी भजनात टाळ, मृदंग, वीणा असा वाद्यमेळ असतो. मुख्य गायकाच्या हातात वीणा असते. त्याला गायनासाठी साथ करणाऱ्या टाळकरयांना चाल म्हणणारे संबोधले जाते. ‘जय जय विठोबा रखुमाई’,‘ज्ञानोबा माऊली तुकाराम ’असा नामगजर भजनात केला जातो. वारकरी भजनात काकडयाचे भजन, हरिपाठाचे भजन, एकादशीचा हरिजागर असे प्रकार पडतात. हरिपाठाचे भजन मुख्यतः सायंकाळी मंदिरात अथवा आळंदी, पंढरीला दिंडया पालख्यांच्या वेळी, गावोगावी होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहात आयोजित केले जाते. ‘हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी’ या संत ज्ञानेश्वरांच्या हरिपाठापासून भजनाची सुरूवात होते. ज्ञानेश्वरांचा हरिपाठ झाल्यावर आंधळे, पांगुळ, बाळक्रीडेचे अभंग सुरू होतात.हरिपाठाचे अभंग वर्षभर मंदिरात सादर होतात त्यामुळे या भजनाला नेमाचे भजन म्हटले जाते.

वारकरी भजनातच दुसरा एक प्रकार चक्रीभजन असा असतो. चक्रीभजन म्हणजे एकच अभंग मुख्य बुवासोबत अन्य चाली म्हणणारे बुवा गात असतात. अभंगाचे चरण गाणारे बुवा आपापल्या गायनशैलीनुसार चाल आळवितात. चक्रीभजनातील गायकीची बैठक ही शास्त्रीय गायनाची बैठक असते. हरिपाठाच्या भजनाचे स्वरूप हे सामूहिेक भजनाचे असल्यामुळे तेथे गायकीचा बडेजाव नसतो. चक्रीभजनाची स्वतंत्र परंपरा महाराष्ट्रात असून वारकरी संप्रदायात चक्रीभजन सादर करणाऱ्या गायकबुवांमध्ये खाशाबा कोकाटे, तुळशीरामबुवा दीक्षित, शेजवळबुवा, शिवरामबुवा करळीकर, स्नेहल भाटकर आदिंच्या नावाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. चक्रीभजनासारखाच विदर्भात सप्तखंजिरीवादन हा प्रकार लोकप्रिय असून विजयकुमार पांडे, सत्यपाल महाराज सप्तखंजिरीवादन सादर करतात. दत्तपंथी भजनात दिमडी, चिमटा व एकतारी या वाद्याचा वापर होतो. नरसोबाची वाडी व कोल्हापूर, सांगलीकडे दत्तपंथी भजन प्रसिध्द आहे.सांगली जिल्ह्यातील  खुजगाव येथे सोंगी भजनाची, सोंगी रामायणाची परंपरा आहे.

भजनाचा आणखी एक प्रकार म्हणजे डबलबारी भजन. डबलबारी या शब्दातच ‘भजनाचे दोन संच’ असा अर्थ ध्वनित होतो. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणपट्टीतील जिल्ह्यांमध्ये डबलबारी भजनांची मोठी परंपरा आहे. डबलबारी भजन आणि वारकरी चक्रीभजन यात प्रमुख फरक आहे. तो असा-डबलबारी भजनात अनेक बुवा स्वरचित अभंग, गवळणी गातात. वारकरी चक्रीभजनात संतांच्या अभंग,गवळणी पारंपरिक चालींमध्ये गायल्या जातात. अभंगाचा एकच चरण अनेक बुवांनी वेगवेगळ्या प्रकारच्या आलापांमध्ये गाणे म्हणजे चक्रीभजन होय. डबलबारी भजन म्हणजे शक्तीवाले आणि तुरेवाले या गायकांसारखे दोन स्वतंत्र भजनी संच होत. हे संच एकमेकांना पदांमधून कूटप्रश्न विचारून त्यांची उत्तरे मागत एकमेकांवर कडी करतात.त्यालाच ‘कडी करणे’ असे म्हणतात. देवीच्या भजनांना ‘बारयांची भजने’ असे म्हणतात. तर या डबलबारी भजनांमध्ये शास्त्रीय संगीताचा आधार घेत हार्मोनिअम, पखवाज, झांज, टाळ या वाद्यांच्या साथीने भजने सादर केली जातात. जयदास, पारुनाथ, मध्वनाथ आदींची हिंदी पदेदेखील हिंदी, मराठी चित्रपट गीतांच्या चालींसोबत लोकगीतांच्या चालींवरही भजनात सादर होतात. तमाशात गण,गवळण सादर झाल्यानंतर जशी वगाला सुरुवात होते तशी डबलबारी भजनात रूपाचा अभंग, ध्यानाचा अभंग आणि भारुडाला सुरुवात होते. डबलबारी भजनातील बुवा आपल्या नावाआधी ‘बुवा’ असा शब्द लावतात. आणि नंतरही ‘बुवा’ असा शब्द लावतात. म्हणजे ‘बुवा परशुरामबुवा पांचाळ’, ‘बुवा चंद्रकांतबुवा कदम’ अशी ही मंडळी स्वतःचा उल्लेख करतात. शास्त्रीय संगीताचा फार मोठा पगडा डबलबारी भजनातील बुवांवर होता आणि आहे. ‘मारू बिहाग’,‘कंसी कानडा’, ‘जोगी’, ‘बागेश्री’, ‘बिलावल’, ‘खमाज’, ‘ढमार’, ‘बिहाग’ आदी चालींमध्ये बुवामंडळी भजने बांधत असतात.

वारकरी भजनाचे फड आहेत. फड म्हणजे वारकरी भजनांचा समुह वारकऱ्यांनी आयुष्यभर या फडाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. वासकर बुवांचा फड, गुरव बुवांचा फड, करमरकर बुवांचा फड, कदम बुवांचा फड इत्यादी फड पंढरपुरात आहेत. वारकरी भजन मंडळे महाराष्ट्रभर आहेत. वारकरी शिक्षण संस्थेत खास भजनाचे वर्ग घेतले जातात.

संदर्भ :

  • राणे,सदानंद,लोकगंगा : महाराष्ट्राच्या लोककला आणि लोकनृत्ये,डिंपल पब्लिकेशन्स, पुणे, २०१२.

Related Posts

यमुनाबाई वाईकर (Yamunabai Waikar)

वाईकर ,यमुनाबाई (जन्म : ३१ डिसेंबर १९१५ – मृत्यू : ७ मे २०१८) मराठीतील सुप्रसिद्ध लावणी गायिका. मूळ नाव यमुना विक्रम जावळे. आईचे नाव गीताबाई. सातारा जिल्ह्यातील वाई…

चंद्रकांत ढवळपुरीकर (Chandrakant Dhawalpurikar)

ढवळपुरीकर, चंद्रकांत : (२३ जुलै १९३२).  ढोलकी फडाच्या तमाशाचे मालक, ज्येष्ठ कलावंत. पूर्ण नाव चंद्रकांत शिवराम जाधव. Telegram Group Join Now त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी…

छगन चौगुले (Chagan Chougale)

चौगुले, छगन : (१९५७ – २० मे २०२०). महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोककलावंत. लोकगीते व भक्ती गीते गाणारे म्हणून त्यांना ओळखले जायचे. लोककलेचे कोणतेही प्रशिक्षण न घेता खड्या आणि बहारदार गाण्याने…

मंगला बनसोडे (Mangla Bansode)

बनसोडे, मंगला : (१२ सप्टेंबर १९५१). ढोलकी फडाच्या तमाशातील कलावती. तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊ नारायणगावकर यांच्या कन्या. ढोलकी फडाच्या तमाशात गायिका, नर्तिका, अभिनेत्री अशा विविध भूमिका त्यांनी आजवर…

गुलाबबाई संगमनेरकर (Gulabbai Sangamnerkar)

संगमनेरकर, गुलाबबाई : (१९३२). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी कलावंत. नृत्यचंद्रिका म्हणून त्यांना ओळखले जाते. लावणी क्षेत्रात बैठकीच्या लावणीची अदाकारी याविषयी ज्या ज्या वेळी बोलले जाते तेव्हा हमखास डोळ्यासमोर येणारे…

मधू कांबीकर (Madhu Kambikar)

कांबीकर, मधू : ( २८ जुलै १९५३ ). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी कलावंत चित्रपट नायिका . जन्म माळेगाव खुर्द, ता. गेवराई, जि. बीड येथे. एका उपेक्षित समाजात त्यांचा जन्म झाला. आई…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *