Site icon MH General Resource

भांडवलदाराला दिलेले हक्क (Rights given to Shareholder)

1. कंपनीचा डीवीडन्ड जाहीर झाल्यानंतर आणि सभेमध्ये मंजुर झाल्या नंतर शेअरधारकाला तो वेळेवर मिळाला पाहीजे.

२. कंपनी ने राईट शेअर, बोनस शेअर, डीबेन्चर वगैरै इशु केल्यानंतर ते शेअरधारकाला वेळेवर मिळाले पाहीजेत.

३. जर कंपनी वार्षिक सामान्य सभा (Annual General Mecting) ठेवत नसेल, तर ती बोलवण्यासाठी शेअरधारक कंपनीच्या लॉ बोर्ड मध्ये अर्ज करू शकतात.

४. शेअरधारकाला मिनीट बुक मध्ये जनरल मिटींगचा अहवाल तपासण्याचा आणि त्याची नमुना प्रत घेण्याचा अधिकार आहे.

५. कंपनीच्या वार्षिक जनरल मिटींग व सामान्य जनरल मिटींग मध्ये

शेअरहोल्डरला अथवा त्याच्या प्रतिनिधिला (Proxy) उपस्थित राहण्याचा

अधिकार आहे आणि त्याला मत देण्याचा ही अधिकार आहे.

६. शेअर होल्डरला कंपनीचा वार्षिक अहवाल नफा तोटा अकाउन्ट, बॅलेन्सशीट आणि ओडीट रीपोर्टची एकप्रत कंपनी तर्फे मिळाली पाहीजे.

७. कोणत्याही कारणामुळे गडबड झाल्यास कंपनीचे संचालक आणि व्यवस्थापक यांवर सिविल व क्रीमीनल केस दाखल करण्याचा अधिकार शेअरधारकाला आहे.

Exit mobile version