Site icon MH General Resource

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

लाभार्थी पात्रता निकष :-

•     वैयक्तिक शेतकऱ्यांनाच लाभ घेता येईल. संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही.

•     शेतकऱ्यांच्या स्वत:च्या नावे 7/12 असणे आवश्यक आहे.

•     जर 7/12 उताऱ्यावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडी साठी संमतीपत्र आवश्यक आहे.

•     जमिन कुळ कायदयाखाली येत असल्यास 7/12 च्या उताऱ्यावर जर कुळाचे नाव असेल तर योजना राबविण्यासाठी कुळाचे संमतीपत्र  आवश्यक  आहे.

•     परंपरागत वननिवासी ( वन अधिकार मान्यता ) अधिनियम, 2006 नुसार वनपट्टेधारक शेतकरी योजनेत लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.

    क्षेत्र मर्यादा : 

योजनेचा लाभ कोकण विभागासाठी 0.10 हे. ते कमाल 10 हेक्टर तर उर्वरीत महाराष्ट्रासाठी किमान 0.20 हे  ते कमाल 6 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुज्ञेय आहे.

   अनुदान मर्यादा :-

लाभार्थीस  100 टक्के अनुदान देय आहे.

अनुदान तीन वर्षाच्या कालावधीत प्रथम वर्ष 50 टक्के  दुसरे वर्ष 30 टक्के ‍ तिसरे वर्ष 20 टक्के

   लागवड कालावधी :-

         जून ते मार्च अखेर

   अर्ज कुठे करावा : – 

        संबंधित तालुका कृषि अधिकारी 

   समाविष्ट फळपिके :-

          योजनेअंतर्गत आंबा, काजु, पेरु, चिक्कू, डाळींब,सिताफळ, कागदी लिंबू, नारळ, चिंच, अंजिर, आवळा, कोकम, फणस, जांभूळ, संत्रा, मोसंबी या 16 बहूवार्षिक फळपीकांची आवश्यकतेनुसार  कलमे /रोपांद्वारे लागवड करण्यास मान्यता आहे.फळपिकनिहाय अनुदान-          

अ.क्र.फळपिकलागवड  अंतर (मी.)झाडे संख्याहेक्टरी अनुदान (रुपये )
1आंबा  कलमे10×1010057516
2आंबा  कलमे5×5400108482
3काजू कलमे7×720060804
4पेरू कलमे3×21666212199
5पेरू कलमे6×627764808
6डाळींब कलमे4.5×3740114235
7संत्रा मोसंबी,कागदी लिंबू कलमे6×627765658
8संत्रा कलमे6×3555105034
9सिताफळ कलमे5×540075646
10आवळा कलमे7×720054401
11चिंच कलमे10×1010050226
12जांभूळ  कलमे10×1010050226
13कोकम  कलमे7×720051926
14फणस  कलमे10×1010046501
15अंजिर  कलमे4.5×374099834
16चिकू कलमे10×1010055491
17आंबा रोपे10×1010053316
18काजू रोपे7×720054804
19कागदी लिंबू रोपे6×627760688
20नारळ रोपे बाणावली8×815063297
  21नारळ रोपे टी/डी8×815068697
22सिताफळ रोपे5×540068446
23आवळा रोपे7×720049601
24चिंच रोपे10×1010046026
25जांभूळकलमे10×1010046026
26कोकमरोपे7×720050726
27फणसरोपे10×1010045901
Exit mobile version