Site icon MH General Resource

महाडीबीटी पोर्टल : विविध शिष्यवृत्त्या मिळविण्याचे महाद्वार..

आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर आणि शिक्षण फी तसेच इतर शुल्काची रक्कम विद्यार्थी शिकत असलेल्या महाविद्यालयाच्या खात्यावर जमा करण्यात येत असे. आता मात्र विद्यार्थ्यांना देय होणारी वित्तीय लाभाची रक्कम ही लाभार्थी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना याचा थेट फायदा होणार आहे.

सन २०१७-१८ पासून महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी एकत्रित संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. या संकेतस्थळाचे नाव महाडीबीटी असे असून हे पोर्टल (https://mahadbtmahait.gov.in/login/login) कार्यान्वित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. अर्ज ऑनलाईन असल्याने विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत होणार आहे. या योजनेसंदर्भातील माहिती शाळा आणि महाविद्यालयांनी दर्शनी भागात लावण्याबाबत आणि पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी, निर्वाह भत्ता, विद्या वेतने विषयक योजनांचा लाभ मिळणेसाठी महाडीबीटी पोर्टलवर स्वत:ची नोंदणी करणे, अर्ज भरणे आवश्यक आहे. अर्ज भरल्यापासून ते रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची सर्व प्रक्रिया आता राज्यस्तरीय डीबीटी (DBT) पोर्टलमार्फत करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर ही लाभाची रक्कम जमा केल्याबाबची सूचना डीबीटी पोर्टलद्वारे प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयाला देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित विद्यापीठ / शैक्षणिक संस्था / महाविद्यालय / तंत्रनिकेतने यांनी कोणत्याही विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम घेऊ नये. तसेच कोणत्याही विद्यार्थ्याची आर्थिक पिळवणूक होणार नाही याची योग्य ती दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्थांची असणार आहे.

महाडीबीटी पोर्टल दिनांक ३ ऑगस्ट २०१७ पासून सुरु करण्यात आले आहे. यामुळे आता विविध शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना ऑनलाईन प्रक्रियेमुळे वेळेची बचत होणार असून पारदर्शकता वाढणार आहे. सन २०१७-१८ पासून विद्यार्थ्‍यांनी वरील योजनांचे ऑनलाईन अर्ज महाराष्‍ट्र शासनाकडून नव्‍याने तयार करण्‍यात आलेल्‍या राज्‍यस्‍तरीय डीबीटी पोर्टल Mahadbt Portal वर आलेल्‍या युजर मॅन्‍युअल एफएक्‍यूचा वापर करुन ऑनलाईन पद्धतीने व पोर्टलवर दिलेल्‍या सूचनांचे पालन करुन अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत. ज्‍या विद्यार्थ्‍यांचे आधार कार्ड नंबर मोबाईल नंबरशी संलग्नित नाहीत, त्‍यांनी जवळच्‍या आधार केंद्रावर जाऊन आपले आधार कार्ड नंबर मोबाईल नंबरशी संलग्‍न करुन घ्‍यावे. या योजनांचा लाभ घेण्‍यासाठी अर्ज करण्‍याची कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचनाही शिक्षण संचालनालयाने जारी केल्या असून योजनांच्‍या पात्रतेचे निकष व संबंधित शासन निर्णय (https://mahadbtmahait.gov.in/login/login) वर ज्ञान बँक (Knowledge Bank) याठिकाणी उपलब्‍ध आहेत. या योजनांची मंजूर रक्‍कम विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या आधार संलग्नित बँक खात्‍यामध्‍ये जमा करण्‍यात येईल. पात्र प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांने स्‍वतंत्र युजर आयडी तयार करुन ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहेत. यासंदर्भातील सर्व माहिती या पोर्टलवर देण्यात आली आहे.

डीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती योजना देण्यात येणारे विभाग

  1. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
  2. आदिवासी विकास विभाग
  3. .उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग
  4. अल्पसंख्याक विकास विभाग
  5. शालेय शिक्षण विभाग

डीबीटी (DBT) पोर्टलवर नोंदणी करण्याची पद्धत –

अ) ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी पूर्वतयारी :-

विद्यार्थ्यांनी आपला जातीचा दाखला, जात पडताळणी दाखला, १०वी, १२वी तसेच मागील परीक्षा उत्तीर्ण झालेला दाखला व गुणपत्रक, जन्मतारखेचा पुरावा, रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, प्रवेशित महाविद्यालयाची माहिती, प्रवेशित अभ्यासक्रमाची माहिती, अभ्यासक्रमाचा कालावधी, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, आधार कार्ड, दिव्यांग (अपंग) असल्यास दिव्यांगाचा दाखला, शिधापत्रिका इ. कागदपत्रे तयार ठेवावीत.

ब) डीबीटी पोर्टलवर नोंदणी कशी करावी :-

क) डीबीटी पोर्टलवर अर्ज कसा भरावा :-

महाडीबीटी पोर्टलचा लाभ :

‘आधार प्रमाणिकरण’ सह थेट लाभ देण्यासाठी या प्रणालीची सुरूवात करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.

महाडीबीटी पोर्टलद्वारे सर्व शासकीय योजनांचा लाभ लाभार्थींच्या बँक खात्यांमध्ये थेट हस्तांतरित केला जाईल. ही आधार-प्रमाणीकृत इलेक्ट्रॉनिक यंत्रणा आहे ज्यामुळे राज्यातील विविध विभागांद्वारे अंमलात आणलेल्या ४० हून अधिक योजनांच्या फायद्यांचे थेट हस्तांतरण करण्यास मदत होणार आहे.

माहिती स्रोत: महान्युज

Exit mobile version