Site icon MH General Resource

महाराष्ट्राचे निर्माते मराठा सातवाहन राजे

सातवाहन

सातवाहन राजे ओरडून ओरडून स्वतःला महारठ्ठीय-मराठा वंशाचे सांगत आहेत. मग तो विसापुरच्या किल्ल्यातील कौशिकीपुत्राचा शिलालेख असो वा राणी नागणिकेचा जुन्नरचा नाणेघाटातील शिलालेख… सर्वच शिलालेखात त्यांनी स्वतःला महाराष्ट्रीय म्हणजेच क्षत्रिय मराठा म्हटलेय. मित्रानो, महाराष्ट्र १९६० साली अचानक जन्माला आलेला नसून २५०० वर्षापूर्वी पासून अस्तित्त्वात आहे. तो कालपरवा निर्माण झालेला नाही. हे लक्षात ठेवावे.


महाराष्ट्र राज्याची स्थापना हि हजारो वर्षांपूर्वी झाली होती. संपूर्ण महाराष्ट्राचे संस्थापक-निर्माते आणि भाग्यविधाते हिंदू क्षत्रिय मराठा सातवाहन राजे आहेत.


महाराष्ट्राचे स्वतंत्र अस्तित्व हे पहिल्यापासूनच होते आणि ते अस्तित्व सातवाहन राजांनी टिकवून ठेवले होते.
महाराष्ट्रामध्ये पहिले मराठा दंडक सातवाहन नावाचे राजे राज्य करित होते तेव्हा या संपूर्ण प्रदेशाला दंडकारण्य महाराष्ट्र असे संबोधले जात होते.


सातवाहन राजे हे शिवभगवान महादेव यांचे वंशज आहेत म्हणून त्यांना शिवभगवान सातवाहन असेदेखील संबोधले जाते.
क्षत्रिय मराठा जातीचे निर्माते मल्लरठ्ठ-मराठा सातवाहन राजे आहेत. क्षत्रिय मराठा जातीची उत्पत्ती हि रठ्ठा/रठ्ठीक/मल्लरठ्ठा/मल्लरठ्ठीक, पुढे ल्ल चा र झाला आणि मरठ्ठा-मराठ्ठा-मराठा असा झाला.(त्याचबरोबर महारठ्ठीक/महारठ्ठा-मराठा असे देखील संबोधले जाते.)


सातवाहन राजांनी ९६ कुळी मराठयांची निर्मिती केली.
सातवाहन साम्राज्य (महाराष्ट्र राज्य) ची बोली भाषा म्हणजे राजभाषा हि मराठी होती आणि लिपी ब्राम्ही,प्राकृत होती. त्याचबरोबर संस्कृत भाषा देखील होती. हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.
सातवाहन राजांनी महाराष्ट्राला उत्कर्षाप्रत बनविले होते म्हणजे प्रगतीशील आणि विकसित आणि बलशाली राज्य बनविले होते.


शिर्केसातवाहन साम्राज्य हे हिंदू वैदिक आर्य सनातनी धर्म (म्हणजेच हिंदू धर्म) धार्मिक ग्रंथानुसार आणि नियमावलीनुसार राज्य कारभार करत होते. त्यामध्ये हिंदू धार्मिक ग्रंथ चार वेद,मुख्य शिवपुराण,आठरा पुराण,भगवत गीता,हाल सातवाहन राजांची गाथा सप्तशती,मनुस्मृती सह इतर हिंदू धर्मातील महत्वाचे धार्मिक ग्रंथ होते.
भगवान श्रीराम यांच्या काळामध्ये स्वतंत्र अस्तित्व असणाऱ्या सातवाहनांच्या महाराष्ट्रात सातवाहन राज्य शासन होते आणि त्याकाळातील राजाचे नाव होते मदन सातवाहन.


महाभारताच्या काळामध्ये आणि नंतरच्या काही कालपर्यंत हिंदुस्तानामध्ये महाजनपद व्यवस्था होती त्यामध्ये महाराष्ट्रात अश्मक महाजनपद होते तेव्हा महाराष्ट्रात सातवानांचे राज्य शासन होते.
महाराष्ट्राचा इतिहास म्हंटल कि आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर पहिलं नाव येत ते आपल्या आराध्यदैवताचे महाराष्ट्र राज्याचे निर्माते क्षत्रिय मराठा सातवाहन राजांचं.


सातवाहन राजांची मुख्य राजधानी हि जीर्णनगर(जुन्नर) होती आणि उपराजधानी प्रतिष्ठान(पैठण) होती.
सातवाहनांनी महाराष्ट्राची स्थापना केली आणि हिंदू धर्माचे संरक्षण केले.
शिर्केसातवाहन वंशातील महान सम्राट गौतमीपुत्र सातवाहन राजांनी शकांचा जोरदारपणे पराभव करुन अखंड महाराष्ट्राचे विदेशी परकीयांपासून संरक्षण केले.


गौतमीपुत्र सातवाहन राजांनी दोन हजार वर्षांपूर्वी विदेशी परकीय आक्रमणांपासून महाराष्ट्राचे संरक्षण केले आणि हिंदू धर्माचे आणि हिंदुस्तानाचे संरक्षण केले आणि महाराष्ट्र हिंदू धर्माला नवीन प्राणज्योत दिली म्हणून आज आपल्या सर्वांचे अस्तित्व टिकून आहे हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.


गौतमीपुत्र सातवाहन यांनी नाशिक येथील गोवर्धन येथे शक सम्राट नहपान याचा पराभव केला. तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा म्हणजेच गुढीपाडव्याचा आणि त्यानंतर गौतमीपुत्र सातवाहन राजांनी विजयाचे प्रतिक म्हणून नाशिक येथे एक विजय स्तंभ बांधला पण तो स्तंभ कालांतराने नामशेष झाला असावा आणि दुसरा विजय स्तंभ प्रतिष्ठान(पैठण),औरंगाबाद येथे गोदावरी नदीच्या काठावर एक विजय स्तंभ बांधला तो आज देखील आहे.
त्यावेळी शालिवाहन शक कालगणनेची सुरुवात झाली.आज त्या कालगणनेनुसार १९४४ चालू आहे.


सातवाहन राजांचे वंशज सुयश शिर्केसातवाहन आहेत. त्याचबरोबर ते समाज संजीवनी ट्रस्ट महाराष्ट्र आणि त्याअंतर्गत संचलित असणारी सातवाहन साम्राज्य सेनेचे अध्यक्ष आहेत. सातवाहन राजांचा वंश वारसा जपण्यासाठी सुयश शिर्केसातवाहन पूर्णपणे प्रयत्नशील आहेत. 

Exit mobile version