Site icon MH General Resource

महाराष्ट्र विधानपरिषदेचा थोडक्यात इतिहास

महाराष्ट्र विधिमंडळाला देशात आगळी-वेगळी अशी प्रतिष्ठा लाभली आहे. अनेकविध क्षेत्रांत देशपातळीवर नेतृत्व देणारे नेते या विधिमंडळाने राष्ट्राला दिले आहेत. या नेत्यांनी संसदीय लोकशाही आणि सत्तेच्या विकेंद्रीकरणाद्वारा सबळ प्रशासनाचा वस्तुपाठ इतरांना घालून दिला आहे आणि त्यायोगे अनेक उत्तम परंपरा, संकेत व आदर्श निर्माण केले आहेत.

भूतपूर्व मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव्ह कौन्सिलची (Council of the Governor of Bombay) पहिली बैठक दिनांक २२ जानेवारी १८६२ रोजी मुंबई येथील टाऊन हॉलच्या दरबार हॉलमध्ये भरली होती. मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर सर जॉर्ज रसेल क्लार्क हे त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

१८६२ ते १९३७ या पंच्याहत्तर वर्षांच्या विधिमंडळाच्या प्रदीर्घ वाटचालीत सर्वश्री जगन्नाथ शंकर शेठ, जमशेटजी जीजीभॉय, सर माधवराव विंचुरकर, रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक, रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, सर फिरोजशहा मेहता, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले व डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर असे दिग्गज सन्माननीय सदस्य म्हणून लाभले, ज्यांनी आपल्या महान कर्तृत्वाने आणि सर्वकष कामगिरीने या विधिमंडळाला उच्चस्तर व प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली.

आत्तापर्यंत सर्वात शक्तिशाली भारतीय पंतप्रधान कोण आहे? | Who has been the most powerful Indian Prime Minister till now?

भारताच्या घटनात्मक इतिहासातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे १९३५ चा भारत सरकार कायदा (Govt. of India Act, १९३५) अस्तित्वात आला, ज्यात संघराज्यात्मक शासन पद्धती (Federal form of Govt.) स्वीकारण्यात आली होती. तसेच, प्रातांना स्वायत्तता देण्यात आली होती. या कायद्यान्वये विधानसभा व विधानपरिषद असे नामाभिधान देऊन दोन सभागृहे मुंबई प्रांतात १९३७ मध्ये अस्तित्वात आली.

विधानपरिषदेचे पहिले अधिवेशन :-

१९३५ च्या कायद्यानुसार जुलै १९३७ मध्ये विधानपरिषद राज्यात अस्तित्त्वात आली आणि सदुसष्ट वर्षापूर्वी, २० जुलै १९२७ रोजी पुणे येथील कौन्सिल हॉलमध्ये दुपारी दोन वाजता विधानपरिषदेची (Legislative Council) पहिली बैठक झाली. गेल्या सदुसष्ठ वर्षात परिषदेची १७९ अधिवेशने झाली. त्यातील चौदा अधिवेशने पुण्याच्या कौन्सिल हॉलमध्ये, ४२ अधिवेशने नागपूरच्या कौन्सिल हॉलमध्ये आणि १२३ अधिवेशने मुंबई येथे झाली.

Exit mobile version