Site icon MH General Resource

महिलांसाठी इन्फॉर्मेशन सुरक्षा जागृती

  1. प्रस्तावना
  2. सायबर किंवा व्हर्च्युअल दुनियेत महिलांवर होणारे हल्ले
  3. सायबर हल्ल्यांपासून सुरक्षितता कशी कराल

प्रस्तावना

अनेक युगांपासून महिलांना सुरक्षित कसे राहायचे आणि गोपनीयता कशी पाळायची याचे शिक्षण दिले जात आहे. स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांना समोरच्या माणसातील सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी ओळखण्याची जाणीव त्यांना करून दिली जात असे. या प्रथांमुळे महिला अधिक समर्थ झाल्या आणि स्वतंत्र झाल्या. आजच्या पिढीत महिला पुरुषांच्या बरोबर समजल्या जातात. हल्ली अनेक महिला अग्रणी उद्योजक आहेत, दुसऱ्यांसाठी रोजगार निर्माण करीत आहेत, गृहिणी या नात्याने कुटुंबाला सुरक्षित ठेवत आहेत, बँक मॅनेजर्सच्या भूमिकेत माणसे आणि संसाधनांचे व्यवस्थापन करीत आहेत आणि इतर अग्रगण्य भूमिका निभावत आहेत.

जरी आधुनिक जगात ही सद्य परिस्थिती असली, तरीही बऱ्याच बाबतीत महिलावर अन्याय होत असतो आणि त्यांना खाजगी आणि जाहीर जीवनात दुःख व तोटा सहन करावे लागताता.

सायबर किंवा व्हर्च्युअल दुनियेत महिलांवर होणारे हल्ले

छळ, ब्रॅकमेल अशा स्वरूपात अजूनही जुन्या प्रथा चालू आहेत. आजच्या सायबर किंवा व्हर्च्युअल दुनियेत महिलांवर हल्ले करण्याचे नवनवीन मार्ग खुले झाले आहेत. सायबर स्पेस व त्या सोबत येणारा निनावीपणा समाजाच्या सांस्कृतिक आणि सामुदायिक पैलूंवर नकारात्मक प्रभाव पाडण्याचे काम करीत आहे.

महिलांनी सायबर दुनियेतील फायद्यांचा लाभ घेण्यासाठी अनेक सुरक्षा साधने आणि स्थाने उपलब्ध आहेत, तरीही त्यांच्यात या गोष्टी सुरक्षितपणे कशा वापराव्या या विषयी जागृतीचा अभाव असल्यामुळे महिला पुरुषांपेक्षा सायबर हल्ल्यांसाठी अधिक प्रमाणात असुरक्षित आहेत.

सायबर दुनियेत ईमेल, मॉर्फिंग, सायबर बदनामी, सोशल नेटवर्किंग, हॅकिंग, सायबर-स्टॉकिंग, सायबर बीभत्स अश्लीलता, सायबर छेडछाड आणि सायबर गुंडगिरी अशा विविध प्रकारे महिलांचा छळ केला जातो.

सायबर हल्ल्यांपासून सुरक्षितता कशी कराल

थोडी जागृती, सर्वोत्तम पद्धती, आणि सूचना यांची मदत घेऊन महिला अशा सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित राहू शकतील आणि त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे संरक्षण होईल.

इन्फॉर्मेशन सुरक्षा शिक्षण आणि जागृती, या प्रकल्पाचा एक भाग म्हणून आम्ही महिलांमध्ये ही जागृती पसरवण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि इंटरनेट, स्मार्ट फोन्स आणि अन्य अनेक नव्या सायबर टेक्नॉलॉजीज् ज्यांच्यामार्फत हल्ला होण्याची दाट शक्यता असते, यांचा वापर करताना कोणत्या सर्वोत्तम पद्धती अनुसराव्या त्यासाठी मदत करतो आहोत.

  1. तुमचे इ-मेल अकौंट आहे का?
  2. तुमचे सोशल नेटवर्किंग अकौंट आहे का (उदा. फेसबुक, ट्विटर, इ.)?
  3. तुम्ही स्मार्ट फोन वापरता का?
  4. तुमच्याकडे स्मार्ट वाशिंग मशीन किंवा स्मार्ट फ्रिज आहे का?
  5. आपण वाणसामान ऑनलाईन खरेदी करता का?
  6. आपण वस्तू ऑनलाईन खरेदी करता का?
  7. आपण व्हॉट्सॅप, इन्स्टाग्राम, व्हायबर वापरता का?

जर वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर होय असे असेल, तर आपण कृपया पुढील लेख जरूर वाचा. ते खास आपल्यासठीच आहेत.

सायबर दुनियेत महिलांसाठी काही साध्या आणि झटपट सूचना पुढे दिल्या आहेत

Exit mobile version