“Maharashtra state excise” “Maharashtra Rajya Utpadan Shulk” “Darubandi Aani Utpadan Shulk” ब्रिटिश काळामध्ये या विभागात अबकारी विभाग असे संबोधण्यात येत होते. महसूल संकलित करण्यासाठी मद्यार्क “Alcohol”, ताडी “Tadi”, अफू “Afu”, गांजा “Ganja” व भांग “Bhang” इत्यादी बाबी नंतर प्रांतिक सरकारच्या नियंत्रणाखाली देण्यात आला व राज्यात महसूल मिळण्याच्या दृष्टीने उत्पादन शुल्क आकारण्याची पद्धत सुरू झाली. सन 1878 मध्ये मध्य व गुंगी या पदार्थाच्या व्यापारावर जादा महसूल मिळविण्यासाठी अबकारी कायदा अमलात आणण्यात आला.
तदनंतर दारूबंदी अमलात आणण्यासाठी मुंबई दारूबंदी कायदा 1949 अमलात आणण्यात आला. दिनांक 16 जून 1949 रोजी दारूबंदी कायदा अमलात आल्यानंतर या विभागाचे नाव “दारूबंदी आणि उत्पादन शुल्क” “Darubandi Aani Utpadan Shulk” असे करण्यात आले.
भारतीय संविधान 166 अनुच्छेद महाराष्ट्र राज्य शासकीय कामकाज नियमित शासन शासन अधिसूचना सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील दिनांक 28 डिसेंबर 1989 पाचवी सुधारित नियमावली 1989मध्ये अस्तित्वात आले त्यानुसार या विभागाचे “दारूबंदी आणि उत्पादन शुल्क” हे नाव बदलून “राज्य उत्पादन शुल्क” “Rajya Utpadan Shulk”असे करण्यात आले आहे.
या विभागाकडून खालील अधिनियमाची अंमलबजावणी करता येते.
महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949
महाराष्ट्र अफू ओढण्या बाबत अधिनियम 1936
महाराष्ट्र औषधी द्रव्य नियंत्रण अधिनियम 1959
मुंबई आणि मळी नियंत्रण अधिनियम 1956
नार्कोटिक ड्रग अँड साय्क्रोटोपीक अधिनियम 1985
2Rajya-Utpatadan-Shulka-Part-2