“जास्तीत जास्त निराशावादाच्या टप्प्यावर गुंतवणूक करा.”
“Invest at the point of maximum pessimism.”
“तुम्हाला गर्दीपेक्षा चांगली कामगिरी करायची असेल, तर तुम्ही गर्दीपेक्षा वेगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत.”
“If you want to have a better performance than the crowd, you must do things differently from the crowd.”
व्यक्तीगत माहीती (Personal Profile):
१९१२ साली विन्चेस्टर टेनेसी यथे जॉन टेम्प्लेटॉन यांचा जन्म झाला १९३४ साली येल युनिव्हसिटीतुन ते इकोनोमिक्स विषयात उच्च श्रेणीने • गॅज्युएट झाले. १९३६ साली त्यांनी एक हुशार विध्याथी म्हणुन ऑक्सफर्डी युनिव्हसिटीत प्रवेश घेतला आणि तेथुन लॉ विषयात एमएची पदवी मिळवली. युएसमध्ये परतल्यनंतर त्यांनी न्यूयॉक मधिल मेरिल लॉच या कंपनीतील फेनेर अॅन्ड बिन या फर्म मध्ये एक ट्रेनी म्हणुन नोकरी केली.
टेमप्लेटॅन यांनी १९३७ च्या मंदीच्या काळात टेम्पलटॅन डॉ अॅन्ड वॅन्स नावाची स्वता:ची इन्वेस्टमेन्ट फर्म सुरू केली. या फर्मची फारच प्रगती झाला आणि आठ म्युच्युअल फंड असलेल्या फर्मचे असेट अंडर मॅनेजमेट रू.३०० मिलिअन झाले. नंतर त्या फर्मचे नाव बदलुन टेम्पलटन डॅमरोथ ठेवण्यात आले आणि १९६८ साली त्या फर्मची विक्री झाली. त्याच कालावधीत पुन्हा बाहामास देशातील नासौ शहरात नविन टेम्पलटन गोथ फंडाची सुरूवात केली.
त्यानंतरच्या पुढील २५ वर्षात टेम्पलटनने जगातील सर्वात मोठया आणि यशस्वी आंतरराष्ट्रीय इन्वेस्टमेंट फंडाची स्थापना केले. १९९२ साली त्यांनी
फ्रान्कीलीन ग्रुपला टेम्पलटन फंडाची विक्री केली. १९९९ साली मनि मॅगझिनने टेम्पलटनना “आर्गुएबली द ग्रेटेस्ट ग्लोबल स्टॉक पिकर ऑफ द मन्चुरी म्हणुन संबोधित केले”.
इन्व्हेस्टमेंट स्टाइल (गुंतवणूक शैली):
मागिल शकताकात उलटपक्षी व्यवहार करणा-या मध्ये (contrarians) जॉन टेम्पलटनचाही समावेश होतो. कारण त्यांनी मार्केटमध्ये मंदी चालू असताना स्वस्तात खरेदी केली आणि जेव्हा मार्केटमध्ये तेजी आली तेव्हा उच्च विक्री करून बुल मार्केटमध्ये फार नफा कमविला होता.
फक्त एकाच देशाचा विचार न करता अनेक देशातील मौल्यवान इन्वेस्टमेंन्टची माहीती मिळवणे टेम्पलटनच्या शब्दात म्हणायचे झाल्यास “बारगेन इंटीग करणे ही त्यांची इन्वेस्टमेंट स्टाईल होती.
“कमी किमतीत ऑफर होणा-या आणि लॉग टर्ममध्ये चांगले आऊटलुक देणा- या अशा कंपन्याचा संपूर्ण जगभरात शोध घेणे” हा टेम्पलटनचा इन्वेस्टींग मंत्र होता.
ज्या स्टॉकवर कोणाचेही लक्ष नसते आणि कोणतेही गुंतवणुकदार ज्या स्टॉकचा कधी विचारही करत नाही त्याच स्टॉकवर बारगेन करण्याच्या पध्दतीवर एक व्हॅल्यू कॉन्ट्रेरिअन इन्वेस्टर म्हणून टेम्पलटन यांनी विश्वास ठेवला.