Site icon MH General Resource

पोकरा अंतर्गत शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह अनुदान माहिती

Maharashtra GR: “What is Pokara Shednet House/Plastic Tunnel / Harit Anudan ?

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प – शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह /शेडनेटगृहातील लागवड साहित्य व मशागत याविषयी माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये या अनुदानाचे उद्दिष्ट्य, अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता, अनुदान किती मिळणार ,अर्ज कुठे करायचा या सर्व गोष्टीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

फलोत्पादन क्षेत्रात शेती पद्धतीचा अवलंब केल्याने उच्च दर्जाचे अधिक उत्पादन घेऊन शेतकरी अधिक नफा मिळवू शकतो. शेडनेट हाऊस व हरितगृह यांच्या वापरामुळे फुलपिके आणि भाजीपाला पिकांचे उत्तम गुणवत्तापूर्ण उत्पादन हे कमी क्षेत्रात अधिक मिळते. त्यासाठी शेडनेट हाऊस, हरितगृह, प्लास्टिक टनेल इत्यादी आधुनिक कृषी तंत्राचा वापर रोपवाटिका तयार करण्यासाठी करतात. या योजनेचा मुख्य उद्दिष्ट्य शेतकऱ्याने बिगर हंगामी उत्पादन चांगल्या प्रतीचे  घेऊन अधिकाधिक नफा कमवावा असे आहे, आणि त्यासाठीच नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह /शेडनेटगृहातील लागवड साहित्य व मशागत यांकरिता शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यात येते.

शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह  योजनेचे उद्दिष्ट्ये –

शेडनेटचा उपयोग हंगामी व बिगर हंगामी पिके घेण्यासाठी, उच्च मुल्यांकित आणि उच्च प्रतीचा निर्यातक्षम भाजीपाला पिके व फुलांच्या उत्पादनासाठी करण्यात येतो. शेडनेट गृहांमध्ये आर्द्रता ,तापमान, व कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणात नियंत्रण ठेवता येते. .

शेडनेट हाऊस अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता-

शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह आवश्यक कागदपत्रे –

 शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह अर्ज कुठे करायचा? 

इच्छुक शेतकऱ्यांनी  https//dbt.mahapocra.gov.in या संकेतस्थळावर किंवा DBT  APP द्वारे ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. 

शेडनेट हाऊस क्षेत्र मर्यादा –

एका लाभार्थ्यास शेडनेटसाठी (राउंड टाईप) कमीत कमी ५०० चौ. मीटर व जास्तीत जास्त ४००० चौ. मीटर क्षेत्र मर्यादा पर्यंत व (फ्लॅट टाईप) साठी कमीत कमी १००० चौ. मीटर व जास्तीत जास्त ४००० चौ. मीटर क्षेत्र मर्यादा पर्यंत लाभ घेता येईल. यापूर्वी कोणताही शासकीय योजने अंतर्गत लाभ घेतला असल्यास सर्व योजना मिळून प्रति लाभार्थी जास्तीत जास्त ४००० चौ. मीटर क्षेत्र मर्यादा पर्यंतच लाभ अनुज्ञेय राहील. या बाबीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना या बाबीचे तांत्रिक प्रक्षिशण अनुदान अदायगी पूर्वी घेणे बंधनकारक राहील. सदर प्रशिक्षणाची सोय राष्ट्रीय काढणी पश्चात तंत्रज्ञान प्रशीक्षण संस्था, तळेगाव दाभाडे, तालुका वडगाव मावळ, जिल्हा पुणे येथे आहे. सादर प्रशिक्षणासाठी आवश्यक शुल्काची पूर्ण रक्कम नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प मार्फत अदा करणेत येईल.

 हरितगृह खर्चाचे मापदंड –

पूर्वसंमती मिळाल्यानंतरचे कामकाज काय असेल?

शेतकऱ्याला पूर्वसंमती मिळाल्यानंतर मार्गदर्शक सूचनांच्या आराखड्याप्रमाणे आणि तांत्रिक निकषाप्रमाणे BIS मानांकाचे साहित्य वापरून अंदाजपत्रक तयार करून त्यानुसार उभारणी करणे. पूर्वसंमती परतत दिलेल्या मॉडेलनिहाय साहित्य वापरणे अनिवार्य असणार आहे. पूर्वसंमती दिल्यापासून २ महिन्याच्या आत हे काम पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. प्रकल्प साहित्य विकत आणल्यानंतर आणि पायासाठी खड्डे खणून झाल्यानंतर संबंधित कृषी सहाय्यक / समूह सहाय्यक यांना कळविणे बंधनकारक असणार आहे. त्यानंतर उभारणी झाल्यावर प्रमाणपत्र घ्यावे आणि ऑनलाईन अपलोड करावे. अनुदान मागणी करून मूळ बिले, प्रक्षिक्षण प्रमाणपत्राची छायांकित प्रत लाभार्थी शेतकऱ्याने स्वाक्षरी करून संकेतस्थळावर अपलोड करावीत. प्रकल्प स्थळी कायम स्वरूपी एक लोखंडी फलक  लावून त्यावर मोट्या अक्षरात “नानाजी देशमुख कृषी प्रकल्पाच्या अर्थसाहाय्याने” असे लिहून त्यावर शेतकऱ्याचे नाव, सर्वे नंबर, गाव, प्रकल्पाचे आकारमान, वर्ष, एकूण खर्चिक रक्कम, अनुदान रक्कम इत्यादींचा तपशील लिहावा.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पअंतर्गत (पोखरा) विविध कृषी योजनांची माहिती खालील लिंकवर क्लिक करा.

Exit mobile version