Site icon MH General Resource

प्रजनन व लैंगिक आरोग्य योजना

  1. पार्श्वभूमी
  2. उद्दिष्ट
  3. योजना व कार्यपध्दती
  4. आर्थिक तरतुद
  5. देण्यात येणा-या सेवा
  6. इतर क्षेञाचे योगदान

पार्श्वभूमी

राज्‍यातील किशोरवयीन मुला मुलींची संख्‍या (वय वर्ष १० ते १९) एकूण लोकसंख्‍येच्‍या साधारणपणे २३ टक्‍के आहे. किशोरवयामध्‍ये शारिरीक वाढीचे वेळी भावनिक, मानसिक, लैंगिक बदल होत असतात. याबाबत समाजामध्‍ये, कुटुंबामध्‍ये, शाळा कॉलेजमधून योग्‍य माहिती मिळणे दुरापास्‍त असते. चुकीच्‍या माहितीमुळे किशोरवयीन मुलांमुलीमध्‍ये गैरसमज निर्माण होतात. या गोष्‍टी टाळण्‍यासाठी किशोरवयीन मुला मुलीसाठी अर्श हा कार्यक्रम आर.सी.एच भाग २ अंतर्गत कार्यान्वित करण्‍यात आला आहे. या कार्यक्रमाला सध्‍या राष्‍ट्रीय किशोर स्‍वास्‍थ्‍ा कार्यक्रम संबोधले जाते.

उद्दिष्ट

योजना व कार्यपध्दती

आर्थिक तरतुद

प्रजनन व बाल आरोग्‍य (टप्‍पा दोन ) या कार्यक्रमाअंतर्गत प्रकल्‍प अंमलबजावणी आराखडा यामध्‍ये सदर कार्यक्रमाची तरतुद करण्‍यात आलेली आहे.

देण्यात येणा-या सेवा

राज्‍यात १९१ अर्श क्लिनीकची स्‍थापना केली आहे, त्‍यांना मैञी क्लिनीक असे नाव देण्‍यात आले आहे. सदर मैञी क्लिनीक राज्‍यातील निवडक जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालये, उपजिल्‍हा रुग्‍णालये, ग्रामीण रुग्‍णालये, स्‍ञी रुग्‍णालये, वैदयकीय महाविदयालयांमध्‍ये, शहरी भागात व काही प्रा. आ. केंद्रात स्‍थापन करण्‍यात आलेली आहेत.

मासिक पाळीच्‍या वेळी स्‍वच्‍छता संवर्धन कार्यक्रमाअंतर्गत राज्‍यातील ८ जिल्‍हयामधील ग्रामीण भागातील मुलींना आशा सेविकांमार्फत सॅनिटरी नॅपकिन्‍स माफक दरात पुरविल्‍या जातात. हा कार्यक्रम अमरावती, बुलढाणा, नंदुरबार, सातारा, अकोला, लातूर, धुळे व बीड ८ जिल्‍हयात सुरु आहे. या योजने अंतर्गत आरोग्‍य शिक्षण आरोग्‍य सेविकामार्फत आशा सेविकांना देण्‍यात येते. सदर योजनेचे नियंञण वैदयकीय अधिकारी यांच्‍या मार्फत केले जाते.

डब्‍लू.आय.एफ.एस. योजना किशोरवयीन मुलांमुलींमधील रक्‍तक्षयाचे प्रमाण कमी करण्‍यासाठी सुरु केली आहे. शाळेत जाणा-या इयत्‍ता ६ वी ते १२ वी मधील मुलेमुली व शाळेत न जाणा-या किशोरवयीन मुली, विवाहित पण गरोदर नसलेल्‍या किशोरवयीन मुली हे या योजने अंतर्गत लाभार्थी आहेत. दर सोमवारी लोहयुक्‍त गोळयांचे वाटप शाळा व अंगणवाडी केंद्रामार्फत केले जाते व जंतनाशक गोळी वर्षातुन दोनवेळा सहा महिन्‍याच्‍या अंतराने देण्‍यात येते.

इतर क्षेञाचे योगदान

Exit mobile version