Couple Without Marriage can also stay in Hotel : अनेकादा पोलिसांच्या कारवाईत पोलिसांनी जोडप्यांना पकडले अशा बातम्या ऐकल्या किंवा वाचल्या असतील. तसेच हॉटेलमधील या जोडप्यांचा मुक्काम कसा बेकादेशीर होता हे पोलीस पटवून देतात.
पण, तुम्हाला माहितीये का? की, हॉटेलमध्ये अविवाहित जोडपे, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड रूम घेऊन बिनधास्त राहू शकतात. अशाप्रकारे राहणे हा गुन्हाही मानला जात नाही. परंतु, माहितीच्या अभावामुळे अनेकजण अशाप्रकारे राहणे गुन्हा असल्याचे मानतात. आज आम्ही तुम्हाला गर्लफ्रेंडसोत हॉटेलमध्ये राहण्याचा नेमका कायदा काय आहे याबद्दल सांगणार आहोत.
कपल्सने हॉटेलमध्ये राहणे कायदेशीर गुन्हा नाही
तज्ज्ञांचे मते, एखाद्या जोडप्याचे लग्न झाले नसले तरी, ते हॉटेलमध्ये राहू शकतात. कायद्याने त्यांना लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा अधिकार दिला आहे. म्हणजेच, असे लोक या नियमाचा संदर्भ देऊन, स्वतःला लिव्ह-इन पार्टनर असल्याचा दावा करून हॉटेलमध्ये सहज खोली घेऊ शकतात. असे केल्याने कोणत्याही प्रकारच्या कायद्याचे उल्लंघन होत नाही. त्यामुळे पोलिसही अशा जोडप्यांवर कोणतीही कारवाई करू शकत नाहीत.
वैध ओळखपत्रासह घेता येते रूम
कायद्यानुसार 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले कपल्स कोणतेही वैध ओळखपत्र दाखवून हॉटेलच्या रूममध्ये एकत्र राहू शकतात. रूम घेताना संबंधित व्यक्तीने कुणासोबत रहावे हा सर्वस्वी मुलावर आणि मुलीवर अवलंबून आहे. देशात असा कोणताही कायदा नाही ज्यामध्ये अविवाहित जोडप्यांना हॉटेलच्या रूममध्ये एकत्र राहण्यापासून रोखू शकेल.
हॉटेलमध्ये रूम घेण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी
- अविवाहित लोकांनी हॉटेलमध्ये रूम घेण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. ज्यामध्ये जर, तुम्ही अनमॅरीड कपल असाल तर, आणि तुमचे वय अठरा वर्षांपेक्षा जास्त असेल तरच, हॉटेलमध्ये राहायला जा. यावेळी सोबत वैध ओळखपत्र ठेवा.
- हॉटेलमध्ये रूम घेताना मुलाकडे आणि मुलीकडे वैध ओळखपत्रं असणे गरजेचे आहे.
- तुम्ही अनमॅरिड असाल आणि हॉटेलमध्ये एकत्र राहण्यासाठी रूम मागत असाल तर, रूम द्यायाची की नाही याचा सर्वस्वी निर्णय हॉ
- टेल व्यवस्थापनावर अवलंबून आहे, परंतु असा कोणताही कायदा नाही की, ज्यामध्ये अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये खोली घेण्यास बंदी आहे.
- OYO हॉटेल्समध्ये वैध ओळखपत्र पाहून कोणालाही राहण्याची परवानगी देण्यात येते.