Site icon MH General Resource

Karnataka Assembly Election 2023 Rahul Gandhi speaks on Congress wins | कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 मध्ये काँग्रेसचा विजय

नवी दिल्ली : कर्नाटकात काँग्रेसचं पूर्ण बहुमताचं सरकार स्थापण होणार आहे. देशात बऱ्याच काळानंतर मिळालेल्या या दणकेबाज विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भूमिका मांडली. कर्नाटकात द्वेषाच्या नव्हे तर प्रेमाच्या जोरावर जिंकली असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं. (Karnataka Assembly Election 2023 Rahul Gandhi speaks on Congress wins)

Who is eligible for equity research analysis? | Is equity research front or back office?

“द्वेषाचा बाजार बंद झाला असून प्रेमाचं दुकानं उघडलं आहे. हा सर्वांचा विजय आहे, सर्वात आधी हा कर्नाटकच्या जनतेचा विजय आहे. आम्ही कर्नाटकच्या निवडणुकीत कर्नाटकच्या जनतेला पाच वायदे केले होते. माझ्या भाषणात मी, खर्गेजी आणि आमच्या या नेत्यांना याची ग्वाही दिली होती. आम्ही हे वायदे पहिल्याच दिवशी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत पूर्ण करणार आहोत. मी पुन्हा एकदा कर्नाटकच्या जनेतला मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो” अशा शब्दांत राहुल गांधी यांनी कर्नाटकातील काँग्रेसच्या दमदार विजयावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, कर्नाटकात २२४ जागांवर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा विजय झाला आहे. काँग्रेस १३७ जागांवर विजयी झाला असून भाजप ६२, जेडीएस २१, इतर पक्ष ४ जागांवर आघाडीवर आहेत, हे आकडे जवळपास निश्चित मानले जात आहेत. बऱ्याच वर्षांनंतर काँग्रेसला असा दणदणीत विजय मिळाल्यानं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

Exit mobile version