_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/02/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%97-%e0%a4%87%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-gig-%e0%a4%95/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-how-to-make-money-online/mhgr_how_to_make_money_online-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee Maharashtra GR| Homosex and Barak Obama’s Confession | होमोसेक्स आणि बराक ओबामाचे कबुलीजबाब - MH General Resource Maharashtra GR| Homosex and Barak Obama’s Confession | होमोसेक्स आणि बराक ओबामाचे कबुलीजबाब - MH General Resource

Maharashtra GR| Homosex and Barak Obama’s Confession | होमोसेक्स आणि बराक ओबामाचे कबुलीजबाब

Spread the love

Homosex and Barak Obama’s Confession | होमोसेक्स आणि बराक ओबामाचे कबुलीजबाब

Barack Obama : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. याला कारण ठरतंय त्यांनी आपल्या एक्स गर्लफ्रेंडला लिहिलेली एक चिठ्ठी. या चिठ्ठीमध्ये बराक ओबामांनी आपल्या लैंगिक फॅन्टसीजबाबत विस्ताराने लिहिलं आहे.

Telegram Group Join Now

बराक ओबामांनी आपल्या पूर्वाश्रमीच्या गर्लफ्रेंड्सना लिहिलेली पत्रं आता पुन्हा एकदा समोर आली आहेत. बायोग्राफर डेव्हिड गॅरो यांनी एका मुलाखतीत ओबामांच्या तीन एक्स गर्लफ्रेंड्सकडून त्यांनी लिहिलेली पत्रं मिळवल्याचा दावा केला आहे. यातील एका पत्रामध्ये ओबामा हे स्त्री-पुरूष आणि समलिंगी संबंधांबाबत आपले विचार मांडत आहेत.

अ‍ॅलेक्स मॅक्निअर या तरुणीला बराक ओबामा यांनी 1982 साली हे पत्र लिहिलं होतं. ओबामा हे तेव्हा 21 वर्षांचे होते. हे दोघेही लॉस एँजेलिसमधील ऑक्सिडेंटल कॉलेजमध्ये शिकत होते. अ‍ॅलेक्सने आपल्याला हे पत्र दाखवलं, आणि यातील एक पॅराग्राफ हा समलिंगी संबंधांबाबत असल्याचंही त्यांनी सांगितलं, असं डेव्हिड मुलाखतीत म्हणाले. हिंदुस्तान टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्द केलं आहे.

‘I make love to men daily but in imagination’, Barack Obama wrote in his love letters to his ex.

काय लिहिलंय पत्रात?

आपल्या पत्रात ओबामा लिहितात, “समलिंगी संबंधांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, हा स्वतःला वर्तमानापासून दूर करण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं. मी स्वतःदेखील दररोज पुरूषांसोबत संबंध ठेवतो, मात्र केवळ माझ्या कल्पनेत.”

“माझं मन हे मोठ्या प्रमाणात उभयलिंगी आहे. हे प्रमाण तोपर्यंत वाढायला हवं, जोपर्यंत मी महिला किंवा पुरूष असा विचार न करता लोकांच्या दृष्टीने विचार करत नाही. पण शरीराचा विचार करता मी नक्कीच एक पुरूष आहे, आणि शारीरिकदृष्ट्या मी आयुष्यातील ही आकस्मिकता स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.”, असंही ते लिहितात.

ओबामांनी समलिंगी संबंधांबाबत आपले विचार अधिक विस्तृतपणे या पत्रात लिहिल्याचं अ‍ॅलेक्सने म्हटलं आहे. आपण एक पुरूष असून, केवळ कल्पनेत इतर पुरूषांचा विचार करतो, असं ओबामांनी यात स्पष्ट केलं आहे. ओबामांची ही पत्रं अ‍ॅलेक्सने एमॉरी युनिवर्सिटीला विकली आहेत. त्यामुळे ही पत्रं आता या विद्यापीठाच्या ताब्यात आहेत.

Related Posts

Maharashtra GR| Bhumi Pednekar loves being vegetarian |भूमी पेडणेकरला शाकाहारी राहणे आवडते

Spread the love

Spread the love भूमी पेडणेकर तिच्या खाण्याच्या आवडीनिवडींबद्दल नेहमीच प्रामाणिक राहिली आहे, मग ती शाकाहारी आहाराकडे जाणे असो किंवा तिची अधूनमधून मधुर पदार्थांमध्ये रमणे असो. कर्ली टेल्स…

Maharashtra GR| “मला टेस्ला कारची आवड होती, परंतु BYD ने मला त्याच्या ऑफरने जिंकून दिले.”

Spread the love

Spread the love “I was passionate about Tesla cars, but BYD won me over with its offerings.” चीनची ईव्ही जायंट बीवायडी जॉर्डनमध्ये वेग घेत आहे. गेल्या वर्षीच्या…

Maharashtra GR| Google ने नवीन Google Trends पोर्टल लाँच केले

Spread the love

Spread the love SEOs, सामग्री निर्माते आणि विपणक त्यांच्या टूलसेटचा भाग म्हणून Google Trends वापरतात, त्यामुळे हे अपडेट तुमच्या सर्वांसाठी उपयुक्त ठरू शकते. Google ने Google Trends पोर्टलसाठी…

Maharashtra GR| अमेरिकेतील बंदूक मालकीच्या दृष्टिकोनावर ओबामा काय म्हणतात | Obama and gun ownership in America

Spread the love

Spread the love सीबीएस न्यूजच्या डेटानुसार अमेरिकेने नुकतेच या वर्षात आतापर्यंत 200 सामूहिक गोळीबाराचा आकडा पार केल्यामुळे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा अमेरिकन लोकांना बंदुकीच्या हिंसाचाराबद्दल संवाद साधण्याचे…

Understanding Sapiosexuality: The Attraction to Intelligence | Sapiosexuality समजून घेणे: बुद्धिमत्तेचे आकर्षण

Spread the love

Understanding Sapiosexuality

Indian-origin men convicted of running large-scale fake pharma drugs factory, money laundering in UK | भारतीय वंशाच्या पुरुषांना यूकेमध्ये मनी लाँड्रिंगसाठी दोषी

Spread the love

Spread the love भारतीय वंशाच्या पुरुषांना यूकेमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट फार्मा ड्रग्ज फॅक्टरी चालवल्याबद्दल, मनी लाँड्रिंगसाठी दोषी ठरवण्यात आले आहे. Telegram Group Join Now स्कॉटलंड यार्डने पश्चिम…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *