Site icon MH General Resource

Maharashtra GR: Tarapur Transformers Ltd Share | 4 रुपयांत खरेदी करा हा 42 रुपयांचा शेअर!

गुंतवणूकदारांना 42 रुपयांचा हा शेअर अवघ्या 4 रुपयांत खरेदी करता येणार आहे. या कंपनीवर कोणतेही कर्ज नसल्याने शेअरधारकांना लवकरच लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

गुंतवणूकदारांसाठी एक चांगली संधी आहे. शेअर बाजारा (Share Market) येत्या काही दिवसांत या कंपनीच्या स्टॉकमधील गुंतवणुक त्यांना मालामाल करु शकते. गुंतवणूकदारांना 42 रुपयांचा हा शेअर अवघ्या 4 रुपयांत खरेदी करता येणार आहे. या कंपनीवर कोणतेही कर्ज नसल्याने (Debt Free) शेअरधारकांना लवकरच लॉटरी लागण्याची शक्यता आहे. अर्थात गुंतवणूकदारांना (Investors) या कंपनीची इंत्यभूत माहिती कंपनीच्या संकेतस्थळावर सेबीकडे उपलब्ध आहे. त्याची माहिती घेतल्याशिवाय त्यांनी गुंतवणूक करु नये. या कंपनीची कामगिरी आणि शेअरचा चढउतार यावरुन त्यांना गुंतवणुकीचा निर्णय घेता येईल.

तारापूर ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेडच्या शेअरमध्ये (Tarapur Transformers Ltd Share) आज गुरुवारी, 20 एप्रिल रोजी 10 टक्के तेजी दिसून आली. कंपनीचा शेअर इंट्रा डे व्यापारी सत्रात 4.15 रुपयांवर व्यापार करत होता. त्यापूर्वी बुधवारी या शेअर 20 टक्के अपर सर्किट लागले. या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक 6.50 रुपये तर 52 आठवड्यातील निच्चांक 2.85 रुपये आहे.

तारापूर ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड ही कंपनी वीज ट्रान्सफॉर्मरची निर्मिती, दुरुस्ती आणि नुतनीकरणाचे कामे करत आहे. ही मायक्रो कॅप कंपनी आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 8.09 कोटी रुपये आहे. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात तिच्यावरील कर्ज फेडले आहे. सध्या ही कंपनी कर्जमुक्त आहे. कंपनीने गेल्या पाच वर्षांत 34.75 टक्के सीजीआर आधारे चांगला लाभ पदरात पाडून घेतला आहे.

Exit mobile version