_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/02/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%97-%e0%a4%87%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-gig-%e0%a4%95/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-how-to-make-money-online/mhgr_how_to_make_money_online-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee MHGR| राज्य शासनानं सरकारी पदं कंत्राटी पद्धतीनं भरण्याचा निर्णय - MH General Resource MHGR| राज्य शासनानं सरकारी पदं कंत्राटी पद्धतीनं भरण्याचा निर्णय - MH General Resource

MHGR| राज्य शासनानं सरकारी पदं कंत्राटी पद्धतीनं भरण्याचा निर्णय

Spread the love

Tehasildar Post: राज्य सरकारचा पुन्हा झटका! आता तहसीलदार पदंही कंत्राटी पद्धतीनं भरणार

मुंबई : राज्य शासनानं सरकारी पदं कंत्राटी पद्धतीनं भरण्याचा निर्णय घेतल्यानं राज्यातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. यापूर्वी सरळसेवा भरती कंत्राटी पद्धतीनं भरण्याची जाहीरात सरकारनं काढली होती. आता तहसीलदार पदासाठीही कंत्राटी भरती केली जाणार आहे. त्यामुळं राज्य सरकारनं होतकरु तरुणांना पुन्हा एकदा झटका दिला आहे.

Telegram Group Join Now

साम टीव्हीच्या वृत्तानुसार, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयानं तहसीलदार पदाची जाहिरात काढली असून ही भरती कंत्राटीपद्धतीनं होणार आहे. या जाहिरातीनुसार, नायब तहसीलदार, कारकून पदं कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. सरकारच्या या निर्णयावर राज्य लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) प्रशासनात येण्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र सरकारच्या सरकारी क्षेत्रात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाने तीव्र विरोध दर्शवला आहे. राज्य शासनाला सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार परवडत नाहीत. तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन परवडत नाही. म्हणून कंत्राटी पद्धत लागू करण्यात येत असेल तर मग राज्याचा महसूल जातो कुठे, असा सवालही रिपब्लिकन पक्षाने उपस्थित केला आहे.

ज्या खासगी क्षेत्रातील कंपन्यांना कंत्राटी भरतीचा ठेका दिलेला आहे, अशा कंपन्या राज्य शासनाकडून प्रत्येक कर्मचाऱ्याचा पूर्ण पगार घेऊन कंत्राटी कर्मचाऱ्याला २० ते २५ हजारांत वापरून घेणार आहेत. त्यातून राज्य शासन काय साध्य करणार आहे? १९४३ मध्ये ब्रिटिश सरकारमध्ये मजूर मंत्री असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कंत्राटी पद्धतीला तीव्र विरोध केला होता. कामगारांना कायमस्वरूपी नोकरीचा कायदा त्यांनी संमत केला होता. आज राज्य शासन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला विरोध करीत असल्याचे वाटते. शिवाय १९९१ ला गेट करार आला आणि भारतात खासगीकरणाची दारे खुली झाली. त्याला भाजपसारख्या उजव्या पक्षानेही समर्थन दिले. आज राष्ट्राच्या मालकीच्या नामवंत कंपन्या विकल्या जात आहेत. सरकार स्वतःच्या मालकीचे म्हणून काही शिल्लक ठेवणार आहे की नाही, असा प्रश्नही रिपब्लिकन पक्षाने उपस्थित केला आहे. कंत्राटीकरणावर कम्युनिस्टांसह आंबेडकरवादी नेतेही काही बोलायला तयार नाहीत, असा आरोप रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस विवेक पवार यांनी केला.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *