Site icon MH General Resource

Top Shares : केवळ 9 हजारांत कोट्यधीश, या कंपनीने दिला मल्टीबॅगर परतावा…

Share Market Latest News : टायर बनवणारी दिग्गज एमएनसी बाळकृष्ण इंडस्ट्रीजचे (Balkrishna Industries) शेअर्स यावर्षी 16 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. पण तरी त्यांनी लाँग टर्ममध्ये आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. सध्या या शेअर्समध्ये घसरण दिसत असली तरीही भविष्यात हा शेअर तेजीचा कल दाखवत आहे. बाळकृष्ण इंडस्ट्रीजमध्ये सध्याच्या किमतीत गुंतवणूक केल्यास सुमारे 14% नफा मिळू शकतो. सध्या त्याचे शेअर्स बीएसईवर 1938.40 रुपयांवर ट्रेड करत आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म के आर चोक्सीने यामध्ये गुंतवणुकीसाठी 2205 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे. बाळकृष्ण इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप 37,609.86 कोटी रुपये आहे.

बाळकृष्ण इंडस्ट्रीजचे शेअर्स 22 नोव्हेंबर 2002 रोजी अवघ्या 1.71 रुपयांना मिळत होते. आताहा शेअर तब्बल 1134 पटीने वाढून 1938.40 रुपयांवर पोहोचला आहे, म्हणजेच त्या वेळी ज्यांनी या शेअरमध्ये केवळ 9 हजार रुपये गुंतवले असते त्याचे आज 20 वर्षांत 1 कोटी रुपये झाले असते.

या वर्षी 18 जानेवारी 2022 रोजी त्याचे शेअर्स 2,536.75 रुपयांच्या एका वर्षातील उच्चांकावर होते. पण, यानंतर, रशिया-युक्रेन युद्ध आणि चिपच्या तुटवड्यामुळे ऑटो सेक्टरवर दबावाखाली आला बाळकृष्णच्या शेअर्समध्ये विक्री सुरू झाली आणि 7 मार्च 2022 पर्यंत तो 51 टक्क्यांनी घसरून 1,681.95 रुपयांवर आले. हा एका वर्षातील नीचांक आहे. पण, आता पुन्हा खरेदी वाढली आणि आतापर्यंत 15% वाढ झाली आहे.

चौथ्या तिमाहीत जानेवारी-मार्च 2022 मध्ये कच्चा माल आणि मालवाहतुकीच्या खर्चात सुधारणा दिसून येईल असे कंपनीचे म्हणणे आहे. याशिवाय नवीन प्लांट सुरू होऊन क्षमता वाढल्याने त्यांचा व्यवसाय मजबूत होईल. अशा परिस्थितीत, ब्रोकरेज फर्म के आर चोक्सीने यासाठी 2205 रुपयांचे टारगेट दिले आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Exit mobile version