जगातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांच्या यादीत वॉरन बफे यांचा समावेश आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतही त्यांचे नाव आहे. 92 वर्षीय वॉरेन बफे हे त्यांच्या देणगी देण्याच्या कामामुळे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या संपत्तीचा मोठा भाग वॉरेन बफे चॅरिटी साठी दान करतात. वॉरन बफे आपल्या चॅरिटीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
वॉरेन बफे यांच्या कंपनी बर्कशायर हॅथवेने एकूण 750 डॉलर दशलक्ष म्हणजेच 6,125 कोटी रुपये त्यांच्या कुटुंबाद्वारे चालवल्या जाणाऱ्या चार फाउंडेशनला दान केले आहेत. विशेष बाब म्हणजे वॉरन बफे दरवर्षी पाच वेळा त्यांच्या संपत्तीतून धर्मादाय कार्यासाठी देणगी देतात. हा खुलासा सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने नियामक फाइलिंग दरम्यान दिला आहे.
वॉरन बफेने यांनी दान केलेले 6,125 कोटी रुपये हे 2022 वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे दान आहे. यापूर्वी, बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनने 2022 मधील सर्वात मोठी देणगी दिली होती. यामध्ये त्यांनी 11 दशलक्ष डॉलरचे शेअर्स आणि 1.1 दशलक्ष डॉलर सुसान थॉम्पसन बफेट फाऊंडेशनला दिले आहेत. 770,218 शेअर्स त्यांच्या तीन मुलांच्या फाउंडेशनला दान केले. वॉरन बफे हे बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनला देणगी देत असतात.
गेल्या काही वर्षांपासून वॉरन बफे गर्भपात अधिकारांचे प्रमुख समर्थक आहेत, नियोजित पालकत्व आणि इतर संस्थाना मोठ्या भेटवस्तू देत आहेत. सुझी बफेट तिच्या शेरवुड फाउंडेशनचा वापर मुलांच्या शिक्षणाला चालना देण्यसाठी करते.
हॉवर्ड बफे गरीब देशांतील शेतकर्यांना अधिक उत्पादन करण्यास मदत करत आहेत. जगाची भूक दूर करण्यासाठीही ते काम करत आहेत. पीटर बफेट यांचे नोवो फाउंडेशन महिलांवरील हिंसाचार संपवण्यासाठी तसेच शिक्षण आणि आर्थिक विकासाद्वारे जगभरातील महिला आणि मुलींना सक्षम करण्यासाठी काम करत आहेत.