Site icon MH General Resource

कुणाला आणि कशासाठी करतो आपण मतदान?

नगरसेवक: स्वछता, गटर्स, सांडपाणी, पाणी, रस्ते इतर गरजांसाठी निवडून देतो.

आमदार: उदयोग, शिक्षण, कृषी, रोजगार, कर धोरण, अशा मोठया स्वरुपातील गोष्टींसाठी राज्य सरकारच्या
धोरण ठरविणेसाठी आमदार निवडून देतो.

कायदेमंडळाचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे कायदा बनवणे. ज्या बाबींवर संसद कायदा करू शकत नाही अशा सर्व बाबींवर कायदे करण्याचा अधिकार राज्य विधानसभेला आहे. यापैकी काही वस्तू म्हणजे पोलीस, तुरुंग, सिंचन, शेती, स्थानिक सरकारे, सार्वजनिक आरोग्य, तीर्थक्षेत्र आणि दफनभूमी.

खासदार: देशपातळीवरील राष्ट्रीय सुरक्षा, आंतरराष्ट्रीय व्यापार, मागासलेल्या वर्गाचा विकास, भ्रष्टाचार व महागाईला आळा. उदयोग, शिक्षण, कुषीला चालना, स्थानिक कामांसाठी विकास निधी व तरुणांसाठी रोजगार निर्मिती अशा पध्दतीने काम करणेसाठी देशाच्या प्रगतीचे धोरण ठरविणेसाठी आपण खासदार निवडून देतो.

केंद्र पातळीवर धोरण ठरवणे, धोरणाच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा करणे हे खासदाराचे काम आहे.

Exit mobile version