गुन्हा दखलपात्र आहे का अदखलपात्र आहे ते कशावरुन ठरते?
maharashtragr22
गुन्हा दखलपात्र आहे का अदखलपात्र आहे ते कशावरुन ठरते? या विनंती प्रश्नासंबंधी प्रश्नकर्त्यांना धन्यवाद.
IPC धारा 1860 नुसार याबद्दल 511 कलमाखाली यामध्येदेखील नोंद आढळते त्यानुसारच लक्षात येते.
मला याबद्दल सांगता येईन कि, जो गुन्हा दखल घेण्यासारखा आहे, ज्या गुन्ह्याला २ वर्षापेक्षा जास्त शिक्षा असते, त्या गुन्ह्याला दखलपात्र गुन्हा म्हणतात.
दखलपात्र गुन्ह्यात पोलिसांना वारंटशिवाय अटक करण्याचा अधिकार असतो.
दखलपात्र गुन्हे हे जामीनपात्र आणि अजामीनपात्र दोन्ही आहेत.
दखलपात्र गुन्ह्याची काही उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत:-
युद्ध पुकारणे किंवा पुकारण्याचा प्रयत्न करणे किंवा भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे, हत्या, बलात्कार, हुंडाबळी, अपहरण, चोरी, विश्वासचे बेकायदेशीर उल्लंघन, अनैसर्गिक गुन्हे इ. दखलपात्र गुन्हे आहेत.
ज्या गुन्ह्याला २ वर्षापेक्षा कमी शिक्षा सांगितलेली असते, त्या गुन्ह्याला अदखलपात्र गुन्हा किंवा N. C. म्हणतात.
अदखलपात्र गुन्ह्यात पोलिसांना वारंटशिवाय अटक करण्याचा अधिकार नसतो.उदा. शिवीगाळ करणे, क्षुल्लक कारणावरून भांडणे, मारहाण इ. अदखलपात्र गुन्हे मानता येतील.
अशाप्रकारची माहितीप्रमाणे याबद्दल सांगता येईन कि, गुन्हा दखलपात्र आहे का अदखलपात्र आहे ते अशा गोष्टींवरुन ठरते.