- गुन्हा दखलपात्र आहे का अदखलपात्र आहे ते कशावरुन ठरते? या विनंती प्रश्नासंबंधी प्रश्नकर्त्यांना धन्यवाद.
- IPC धारा 1860 नुसार याबद्दल 511 कलमाखाली यामध्येदेखील नोंद आढळते त्यानुसारच लक्षात येते.
- मला याबद्दल सांगता येईन कि, जो गुन्हा दखल घेण्यासारखा आहे, ज्या गुन्ह्याला २ वर्षापेक्षा जास्त शिक्षा असते, त्या गुन्ह्याला दखलपात्र गुन्हा म्हणतात.
- दखलपात्र गुन्ह्यात पोलिसांना वारंटशिवाय अटक करण्याचा अधिकार असतो.
- दखलपात्र गुन्हे हे जामीनपात्र आणि अजामीनपात्र दोन्ही आहेत.
- दखलपात्र गुन्ह्याची काही उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत:-
- युद्ध पुकारणे किंवा पुकारण्याचा प्रयत्न करणे किंवा भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे, हत्या, बलात्कार, हुंडाबळी, अपहरण, चोरी, विश्वासचे बेकायदेशीर उल्लंघन, अनैसर्गिक गुन्हे इ. दखलपात्र गुन्हे आहेत.
- *अदखलपात्र गुन्हा(Noncognizable offence)म्हणजे काय?
- ज्या गुन्ह्याला २ वर्षापेक्षा कमी शिक्षा सांगितलेली असते, त्या गुन्ह्याला अदखलपात्र गुन्हा किंवा N. C. म्हणतात.
- अदखलपात्र गुन्ह्यात पोलिसांना वारंटशिवाय अटक करण्याचा अधिकार नसतो.उदा. शिवीगाळ करणे, क्षुल्लक कारणावरून भांडणे, मारहाण इ. अदखलपात्र गुन्हे मानता येतील.
- अशाप्रकारची माहितीप्रमाणे याबद्दल सांगता येईन कि, गुन्हा दखलपात्र आहे का अदखलपात्र आहे ते अशा गोष्टींवरुन ठरते.