_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/05/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/mhgr_barandbench_2024-05_7c1b7d2a-75a6-4c0d-969b-a21eab60066e_supreme_court_of_india__web_page_1600x-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee आरोग्य सेवा.. - MH General Resource

आरोग्य सेवा..

महाराष्ट्राचा सार्वजनिक आरोग्य सेवा विभाग १८११ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १०५८० उपकेंद्रे, आणि ३७ आश्रम शाळांद्वारे राज्यातील ग्रामीण जनतेला प्राथमिक आरोग्य सेवा पुरवीत आहे.

Telegram Group Join Now

उपकेंद्रे

या उपकेंद्रांमध्ये प्रसुतीपूर्व तपासणी, किरकोळ आजारांवर उपचार, माता आणि बाल आरोग्य सेवा, संशयीत क्षय, हिवताप, आणि कुष्ठरुग्णांची तपासणी, औषधोपचार आणि आरोग्य शिक्षण अशा आरोग्य सेवा पुरविल्या जातात. प्रत्येक उपकेंद्रात एक बहुविध आरोग्य सेवक (पुरुष), एक बहुविध आरोग्य सेवक (महिला) आणि एक अर्धवेळ महिला परिचर असते. याशिवाय काही उपकेंद्रांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बहुविध आरोग्य सेवक (महिला) कार्यरत आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्रे

उपकेंद्रांमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवाशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अतिरिक्त सेवा पुरविल्या जातात. त्या पुढील प्रमाणे आहेत –

बाह्य रुग्ण विभाग, ६ खाटांचा अंतररुग्ण विभाग, तातडीच्या सेवा, शस्त्रक्रिया व प्रयोगशाळेच्या सुविधा, विविध आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी, कुटुंब कल्याण सेवा आणि उपकेंद्रातून संदर्भित निर्देशित करण्यात आलेल्या रुग्णांचे उपचार .

प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी वर्गाची संख्या १५ असून स्वच्छता व रुग्णवाहिका सेवा करारपद्धतीने देण्यात येतात.
महाराष्ट्र जिल्हा परिषद नियम १९६१ मधील कलम १८३ व १८७ अन्वये खालील योजनांसाठी अनुदान देण्यात येते :-

  1. नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम 
  2. प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांची दुरुस्ती व देखभाल.
  3. प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटिकरण.
  4. उपकेंद्रांचे बांधकाम.
  5. प्रादेशिक असमतोल अंतर्गत – प्राथमिक आरोग्य केंद्रांची व उपकेंद्रांची स्थापना व बांधकाम.
भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आरोग्य संस्था स्थापन करण्यासाठी लोकसंख्येचे निकष
अनुक्रमांकसंस्थालोकसंख्येचे निकष
  आदिवासीबिगर आदिवासी
उपकेंद्र३०००५०००
प्राथमिक आरोग्य केंद्र२००००३००००

द्वितीय स्तर आरोग्य सेवा

जिल्हा रुग्णालये – विविध रुग्णालयांमध्ये पुरविल्या जाणाऱ्या तज्ञ सेवा

क्र .तज्ञक्रतज्ञ
सामान्य शल्यक्रियारोगनिदान शास्त्र
सामान्य वैद्यकमानसोपचार
प्रसूतिशास्त्र१०त्वचा व गुप्त रोग
बालरोग११छातीचे रोग
अस्थिरोग१२नेत्ररोग
भूलशास्त्र१३नाक कान घसा
किरणोपायोजन शास्त्र१४दंत आरोग्य

सेवा आणि कार्य :

१ अतिदक्षता विभाग : शासनाने अतिदक्षता विभागासाठी जिल्हा / सामान्य रुग्णालयामध्ये अतिरिक्त कर्मचारी वर्गासह ६ खाटांचा अतिदक्षता विभाग मंजूर केला आहे. या अतिदक्षता विभागांसाठी आवश्यक त्या उपकरणांची व्यवस्था केली आहे.

२ विशेष नवजात दक्षता विभाग : जन्मतःच कमी वजनाच्या व योग्यवेळे पूर्वी जन्म झालेल्या बालकांची काळजी घेण्यासाठी प्रत्येक जिल्हा व महिला रुग्णालयात १० अतिरिक्त कर्मचारी व रेडियंट वॉर्मर्स आणि फोटोथेरपी युनिट इत्यादि आवश्यक उपकरणासह विशेष नवजात दक्षता विभाग स्थापन केला आहे.

३ जळीत विभाग :  भाजून होणारे मृत्यू कमी करण्यासाठी वेगळा जळीत विभाग मंजूर आहे. या विभागासाठी ३ कर्मचारी ( २ वर्ग २च्या परिचारिका व एक चतुर्थ श्रेणी सफाई कर्मचारी ) मंजूर आहेत. पुरुष व महिलांसाठी प्रत्येकी ५ खाटा आहेत.

४ सि.टी. स्कॅन : विविध रोगांच्या निदानासाठी सि.टी. स्कॅन करणे आवश्यक असते. वाशीम व पुणे येथील जिल्हा रुग्णालय व मालेगाव सामान्य रुग्णालय सोडून सि.टी. स्कॅन सेवा सर्व जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहे.

५. मानसोपचार सेवा : १.३.२००६च्या शासकीय निर्णयानुसार २३ जिल्हा रुग्णालयामध्ये १० खाटांचा मानसोपचार विभाग मंजूर आहे. याअंतर्गत २० पदे मंजूर आहेत.

६ सोनोग्राफी सेवा : रोगांचे निदान योग्य रीतीने होण्यासाठी सर्व जिल्हा, महिला व सामान्य रुग्णालयामध्ये सोनोग्राफी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

७ सुरक्षा, रुग्णवाहिका, आहार व स्वच्छता सेवा करार पद्धतीच्या स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येत आहे.

उपजिल्हा रुग्णालये

राज्यात १०० खाटांची एकूण २८ उपजिल्हा रुग्णालये कार्यरत असून त्यापैकी २३ तीस खाटांची रुग्णालये १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धित करण्यात आली असून भिवंडी येथे १०० खाटांचे १ नवीन उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यात आले आहे. ५६ तीस खाटांची रुग्णालये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये श्रेणीवर्धित करण्यात आली आहेत.

क्र.१०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या तज्ञ सेवाक्र.५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या तज्ञ सेवा
सामान्य शल्यक्रियारोगनिदान शास्त्र
सामान्य वैद्यकमानसोपचार
प्रसूतिशास्त्रत्वचा व गुप्त रोग
बालरोगछातीचे रोग
अस्थिरोगनेत्ररोग
भूलशास्त्रनाक कान घसा
किरणोपायोजन शास्त्रदंत आरोग्य

ग्रामीण रुग्णालये

राज्यामध्ये ३० खाटांची ३८७ ग्रामीण रुग्णालये मंजूर आहेत. त्यापैकी ३६० ग्रामीण रुग्णालये कार्यरत आहेत. प्रादेशिक असमतोल योजनेखाली १४३ ग्रामीण रुग्णालये मंजूर आहेत. ग्रामीण रुग्णालयांत एक वैद्यकीय अधीक्षक, स्त्रीरोगतज्ञ / शल्यचिकित्सक, बालरोगतज्ञ / वैद्यकीय चिकित्सक व भूलतज्ञ यांच्या सारखे तज्ञ असतात. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून संदर्भित झालेल्या रुग्णांवर रुग्णालयात उपचार केले जातात. या रुग्णालयांमध्ये क्ष-किरण, प्रयोगशाळा,व रुग्णवाहिका सेवा उपलब्ध असतात. ग्रामीण रुग्णालयांत २५ कर्मचार्‍यांचा आकृतीबंध असून सुरक्षा, रुग्णवाहिका, आहार व स्वच्छता सेवा करार पद्धतीवर आहेत.

ट्रॉमा दक्षता विभाग :

राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या रुग्णालयातील ट्रॉमा दक्षता विभागासाठी शासनाने कर्मचारीवर्ग, उपकरणे व सुसज्ज रुग्णवाहिका पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ६८ रुग्णालयांमध्ये (२३ जिल्हा रुग्णालये व ४५ उपजिल्हा व संदर्भ सेवा रुग्णालये ) ट्रॉमा दक्षता विभाग मंजूर करण्यात आला आहे. या ट्रॉमा दक्षता विभागांसाठी १५ कर्मचारी मंजूर आहेत.

तृतीय स्तरीय दक्षता सेवा

अतिविशेष सेवा :

नाशिक – राज्यात काही वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अतिविशेष आरोग्य सेवा उपलब्ध आहेत. राज्य शासनाने नासिक येथे अतिविशेषोपचार रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून ते दि २६ जून २००८ पासून सुरु झाले आहे.
या रुग्णालयात खालील सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

  • हृदयोपचार , कार्डियोव्हॅस्क्युलर आणि कार्डियोथोरॅकिक शल्य क्रिया
  • नेफ्रॉलॉजी व मूत्ररोग .
  • कर्करोग शास्त्र आणि रसायनोपचार विभाग व कर्करोग शल्यक्रिया

अमरावती अतिविशेषोपचार रुग्णालय दि २६ जून २००८ पासून सुरु झाले आहे. पहिल्या टप्प्यात या रुग्णालयात खालील सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

  • नेफ्रॉलॉजी व मूत्ररोग .
  • प्लास्टिक शल्यक्रिया
  • बालरोग शल्यक्रिया कर्करोग शास्त्र आणी रसायनोपचार विभाग व कर्करोग शल्यक्रिया

दुसऱ्या टप्प्यात खालील सेवा उपलब्ध करून देण्यात येतील –

हृदयोपचार , कार्डियोव्हॅस्क्युलर आणि कार्डियोथोरॅकिक शल्य क्रिया

  • मज्जातंतूविकृती शास्त्र

Related Posts

महानगरपालिका आरोग्य विभाकडून व्यवसाय करणेसाठी मिळणारे परवाने..

Municipal Corporation And Mahanagarpalica License “Lodge License” “Beauty Parlour” “Saloon Registration” Telegram Group Join Now 1. लॉजिंगअँड बोर्डिंग परवाना2. मंगल कार्यालय / धार्मिक विधी व्यावसायिक परवाना3. सलून…

पीसीपीएनडीटी ऍक्ट काय आहे ?

पीसीपीएनडीटी विभाग, बनावट डॉक्टर शोधन आणि कृती समिती गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध कायदा), १९९४ दुरुस्ती कायदा, २००३ Telegram Group Join Now S*X SELECTION AND…

ब्लड ऑन कॉल

ब्लड ऑन कॉल अर्थात जीवनामृतसेवा योजना भारत सरकारच्या राष्ट्रीय रक्त धोरणानुसार आपण ऐच्छिक अपरीश्रामिक, नियमित रक्तदात्याकडून सहज, सुगम, आणि पुरेसा सुरक्षित व गुणवत्तापूर्ण रक्त व रक्तघटकांचा पुरवठा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *