2018 मध्ये विवाहबाह्य संबंधावर निर्णय देताना कोर्ट म्हणालं होतं, ‘विवाहबाह्य संबंधाच्या कारणाने घटस्फोट घेता येऊ शकतो,’
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि वकील अमित कारखानीस म्हणतात, “विवाहबाह्य संबंध क्रिमिनिल ऑफेंस होता. आता यात अटक करता येत नाही. पण, अडल्ट्रीचा आधार घेत कोर्टात घटस्फोटाची केस दाखल करता येऊ शकते. कोर्टात हा एक चांगला ग्राउंड असू शकतो.”
तर, कायदेतज्ज्ञ उल्हास बापट म्हणतात, “विवाहबाह्य संबंध असल्यास या आधारावर पती किंवा पत्नी घटस्फोट मागू शकते.”