_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/05/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/mhgr_barandbench_2024-05_7c1b7d2a-75a6-4c0d-969b-a21eab60066e_supreme_court_of_india__web_page_1600x-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee शेख दीन मुहम्मद (Sheikh Din Muhammad) - MH General Resource

शेख दीन मुहम्मद (Sheikh Din Muhammad)

शेख दीन मुहम्मद : (? मे १७४९ – २४ फेब्रुवारी १८५१). प्रसिद्ध भारतीय प्रवासी व बाष्पचिकित्सक. जन्म बिहारमधील पाटणा येथे. त्याचे वडील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत कामाला होते. बिहारचा तत्कालीन सुभेदार शिताबराय हा कंपनीच्या शिपायांच्या मदतीने जास्त रकमेची सारावसुली करू लागला. याला शेतकरी व स्थानिक जमीनदारांकडून सशस्त्र विरोध होऊ लागला. अशाच एका चकमकीत दीन मुहम्मदचे वडील मारले गेले (१७६९). त्यानंतर कंपनीत नव्यानेच रुजू झालेल्या गॉडफ्रे इव्हान बेकर नावाच्या आयरिश अधिकाऱ्याच्या हाताखाली दीन मुहम्मदने सामान्य नोकर म्हणून काम केले. बेकर हा कंपनीच्या बंगाल सैन्यामधील एका पथकात (रेजिमेंट) रसद गोळा करण्याच्या कामावर होता. १७७१ साली मराठ्यांना तोंड देण्यासाठी बेकरच्या पथकाला पाटण्याहून पश्चिमेला बक्सरला जावे लागले. बक्सरची मोहीम आटोपल्यावर बेकरचे पथक कलकत्त्याला गेले (१७७२). दीन मुहम्मद तेथे सु. सहा महिने राहिला. त्यानंतरची काही वर्षे बेकरच्या पथकासोबत काशी, अवध, बिल्ग्राम इ. ठिकाणी तो राहिला.

Telegram Group Join Now

बेकरला दोन पलटणींचा (बटालियन्स) प्रमुख म्हणून बढती मिळाली (१७८१). त्याबरोबर त्याने दीन मुहम्मदलाही जमादार म्हणून बढती दिली. साधारण चारशे शिपायांसोबत दोघेही कानपूरला जात असताना वाटेत रसद गोळा करताना सैनिकांकडून जबरदस्ती झाल्याने गावकऱ्यांनी केलेल्या सशस्त्र प्रतिकारात दीन मुहम्मद थोडक्यात वाचला. कानपूरला पोहोचल्याबरोबर काल्पी येथे मराठ्यांविरुद्धच्या मोहिमेत बेकरच्या पथकासोबतच दीन मुहम्मदही होता. त्यानंतर बनारसचा राजा चैतसिंगविरुद्धच्या लढायांत चैतसिंगचा पतिता नावाचा भक्कम किल्ला काबीज करण्यातही बेकर आणि दीन मुहम्मद यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.

याखेरीज वाराणसी आणि गाझीपूर, जौनपूरच्या आसपास खेडोपाडी कंपनीला गावकऱ्यांचा असलेला विरोध बेकर व दीन मुहम्मद यांनी क्रूरपणे मोडून काढला. यावेळी एका प्रसंगामुळे बेकरला कंपनीची नोकरी सोडावी लागली. धर्मा दुबे नावाच्या ब्राह्मणाचे संशयित खुनी पकडण्यासाठी बेकरला पाठवले असता त्याऐवजी त्याने एक अख्खे गाव ओलीस ठेवून पैसे घेतले. कंपनीच्या वाराणसीतील रेसिडेंटने (प्रतिनिधी) वॉरन हेस्टिंग्जकडे तशी तक्रार केल्यावर बेकरला बडतर्फ केले गेले. नंतरच्या छाननीत हे आरोप मागे घेतले गेले, तसेच बेकर व दीन मुहम्मद यांना सुभेदारपदी बढती देण्यात आली, तरीही त्यांनी नोकरी सोडली (१७८२).

पुढे बेकर व दीन मुहम्मद दोघांनीही सुंदरबन व ढाका येथे काही काळ काढला. अखेरीस दोघेही क्रिस्ट्यान्सबोर्ग नावाच्या डॅनिश जहाजावरून इंग्लंडला गेले (१७८३). प्रथम मद्रास व तेथून अटलांटिक महासागरातील सेंट हेलेना येथे जहाज दहा दिवस थांबले. तेथून नैर्ऋत्य इंग्लंडमधील डार्टमथ बंदरात व आयर्लंडमधील कॉर्क येथे गेले. दीन मुहम्मदने १७८६ मध्ये जेन डेली नावाच्या आयरिश मुलीसोबत पळून जाऊन लग्न केले. याकरिता त्याने स्वत: धर्मांतर केले. पुढे दीन मुहम्मदने जीवनातील आठवणी पत्ररूप संवादाने ट्रॅव्हल्स ऑफ दीन मुहम्मद  या नावाने प्रकाशित केल्या (१७९३). कोणाही भारतीयाने इंग्लिशमध्ये लिहिलेले हे पहिले पुस्तक होय. कॉर्कमध्ये दीन मुहम्मद व जेन डेली हे बेकर कुटुंबाच्या आश्रयाने राहत होते. जेनपासून त्याला सात मुले झाली. पुढे बेकर कुटुंबाशी संबंध बिघडल्याने दीन मुहम्मद १८०७ मध्ये सहकुटुंब लंडनला आला.

लंडनमध्ये दीन मुहम्मदने जेन जेफरीज नावाच्या मुलीशी आणखी एक लग्न केले. तिच्यापासून त्याला एक मुलगी झाली. तिथे तो बेसिल कोकरेन नामक एका स्कॉटिश उमरावासाठी काम करू लागला. कोकरेन हा नुकताच भारतातून परतलेला होता. त्याने वाफारे देऊन लोकांना बरे करण्याचे तंत्र विकसित करण्याचा दावा केला होता. त्यासाठीच्या केंद्रात अनेक रोगांवर इलाज म्हणून वाफारे देण्याचे काम चाले. दीन मुहम्मदने तेथे काही वर्षे काम केले. तेथे त्याने ‘शँपूʼ चे तंत्र विकसित करण्यात हातभार लावला. मुळात शँपू हा शब्दच ‘चंपीʼ या भारतीय शब्दावरून आलेला आहे. चंपी आणि मालीश हे भारतात शतकानुशतके चालत आलेले प्रकार त्याने काही फरकांसह इंग्लंडमध्ये चालू केले.

कोकरेनच्या बाष्पचिकित्सा केंद्राद्वारे या शँपूची प्रसिद्धी झाली, परंतु दीन मुहम्मदला त्याचे विशेष श्रेय न मिळाल्याने १८०९ साली तेथील काम सोडून देऊन लंडनमध्ये ‘हिंदुस्तानी कॉफी हाउसʼ नावाचे हॉटेल त्याने सुरू केले. हे हॉटेल लंडनमधील पोर्टमन स्क्वेअर या उच्चभ्रू वसाहतीत होते. त्यात अनेक भारतीय शाकाहारी व मांसाहारी पदार्थ मिळत असत. हुक्का, चिलीम, तंबाखू इत्यादींचे सेवन करण्यासाठी वेगळा कक्षही होता. तत्कालीन इंग्लंडमधील हे पहिलेच भारतीय हॉटेल होते. अखेर म्हणावा तितका प्रतिसाद न मिळाल्याने चार वर्षांत त्याला दिवाळे जाहीर करावे लागले. त्यानंतर वयाच्या चोपन्नाव्या वर्षी दीन मुहम्मदने बटलर म्हणून स्वत:ची जाहिरात केली व ब्रायटनमध्ये एका बाष्पचिकित्सा केंद्रात नोकरी करू लागला. काही काळाने त्याने स्वत:चे बाष्पचिकित्सा केंद्र काढून तेथे वाफारे, मालीश आणि चंपी उर्फ शँपू हे सर्व प्रकार चालू केले. १८२० साली त्याने स्वत:करिता ‘शँपूइंग सर्जनʼ ही उपाधी वापरली व तोवर बऱ्या केलेल्या रुग्णांचे वर्णन आणि गिऱ्हाइकांचे अभिप्राय असलेले एक पुस्तकही प्रकाशित केले. १८२१ साली त्याने समुद्राकाठी तीनमजली इमारत बांधून तिला ’महोम्मद्स बाथ्स’(Mahomed’s Baths) असे नाव दिले. थॉमस ब्राउन नावाच्या लंडनमधील एका श्रीमंत माणसाचे त्याला याकामी साहाय्य झाले होते. ट्रॅव्हल्स ऑफ दीन मुहम्मदमध्ये त्याने गॅलेनसारख्या प्राचीन रोमन लेखकांचा हवाला देऊन बाष्पचिकित्सेवर टीका केली होती, पण आता तो स्वत:ला इंग्लंडमधील शँपू चिकित्सेचा प्रणेता म्हणवू लागला. भारतात वैद्यकीय शिक्षण घेतल्याचा खोटा दावाही त्याने केला. तत्कालीन ब्रिटिश वैद्यकाशी संबंधित जाहिरातींमध्येही अशी लबाडी सररास चालत असे.

दीन मुहम्मदसोबतच त्याची पत्नी जेन हीदेखील या व्यवसायात सहभाग घेत असे. पुढे त्याला ब्रिटिश राजघराण्यासाठी शँपू चिकित्सा करण्याचीही संधी मिळाली. ब्रायटनमध्ये तत्कालीन ब्रिटिश राजा चौथा जॉर्ज याने एक मोठा वाडा बांधलेला होता, तेथे दीन मुहम्मद अनेकदा येत असे. बाष्पचिकित्सेला तत्कालीन ब्रिटनमध्ये बरीच मागणी असल्याने त्या कामी दीन मुहम्मदची नेमणूक झाली. त्याने चौथा जॉर्ज आणि चौथा विल्यम या दोघांसाठी अनेक वर्षे हे काम जुजबी मोबदल्यात केले. याची मोठी जाहिरात केल्याने त्याला बराच फायदा झाला. १८३७ साली व्हिक्टोरिया राणी राज्यारूढ झाल्यावर मात्र तिने ब्रायटनकडे पाठ फिरवल्याने दीन मुहम्मदच्या हातातून ही संधी गेली.

त्यानंतर हळूहळू बाष्पचिकित्सेचे महत्त्व कमी झाल्याने दीन मुहम्मदचे उत्पन्न घटत गेले. त्याचा लंडनमधील पाठीराखा थॉमस ब्राउन १८४१ साली मरण पावल्यावर त्याच्या मृत्युपत्रानुसार महोम्मद्स बाथ्स विकायला लागणार होते. लिलावात महोम्मद्स बाथ्स एकाने विकत घेऊन ते दीन मुहम्मदच्या प्रतिस्पर्ध्याला दिले. त्यामुळे दीन मुहम्मदने वयाच्या ८४ व्या वर्षी जेनच्या मदतीने पुन्हा दुसऱ्या लहानशा जागेत आपला व्यवसाय चालू केला. परंतु त्याला यश आले नाही. पुढे जेन (१८५०) व दीन मुहम्मद (१८५१) ब्रायटनमध्येच मरण पावले.

संदर्भ :

  • Fisher, Michael H. The First Indian Author in English, Oxford University Press, Delhi, 1996.
  • Mahomet, Sake Dean, The travels of Dean Mahomet, A Native of Patna in Bengal, Through several parts in India, While in the service of the Honourable East India Company, 2 Vols., Cork, Ireland, 1794.

Related Posts

CAA Act

MHGR| News Update| CAA कायदा काय म्हणतो?

CAA Act

LGBTQ

MHGR| समान विवाहासाठी भारतातील LGBTQ+ प्रचारकांसाठी लढा

LGBTQ+

ISM office V6

MHGR| ISM office V6 software download for Windows 10

ISM office V6

What is a Domicile Certificate in Marathi

What is a Domicile Certificate in Marathi : अधिवास प्रमाणपत्र हे अधिकृत दस्तऐवज आहे जे भारतातील विशिष्ट राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात एखाद्या व्यक्तीच्या निवासी स्थितीचे प्रमाणीकरण करते….

MHGR| महाराष्ट्र शासनाचा करार सूचीबद्ध आयटी कंपनी | Job Vacancy in Aksentt Tech in Mumbai

Government of Maharashtra Contract Listed Company: Aksentt Tech ही टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर सेवा प्रदाता आहे जी मोबाईल आणि फिक्स्ड टेलिकम्युनिकेशन नेटवर्क दोन्हीसाठी पायाभूत सुविधा रोलआउट सोल्यूशन्स ऑफर करते. सेवा…

MHGR| ई-पीक पहाणी प्रकल्प, महाराष्ट्र राज्य

आता पीक विमा आणि कृषी पतपुरवठा अधिक सुलभ होणार मोबाईलवरुन पीक पहाणी करणे आणि मार्गदर्शिका Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *