१. जॉन (जॅक) बोगले John (Jack) Bogle
“वेळ तुमचा मित्र आहे; आवेग तुमचा शत्रू आहे.”
“तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये 20% नुकसान इमेजिंग करण्यात अडचण येत असल्यास, तुम्ही स्टॉकमध्ये असू नये.”
व्यक्तीगत माहीती (Personal Profile):
जॉन बोगले यांचा जन्म १९२९ साली मॉन्टेक्लेर न्यू जर्सीत झाला. १९५१ साली प्रिन्सटॉन युनिव्हर्सिटीतुन ते इकोनोमिक्स या विषयात ग्रॅज्युएट झाले. १९५१ ते १९७४ या काळात त्यांनी वेलिंगटन मॅनेजमेंटमध्ये फायनांशिअल ॲडवायझर म्हणुन काम केले आणि तेथुन त्यांनी इनवेस्टमेन्ट मॅनेजमेन्ट बिझनेसचे ज्ञान अवगत केले. १९७४ साली त्यानी वॅनगार्ड ग्रुप म्युच्युअल फंड कंपनीची स्थापना केली.नंतर ते त्याचे सीइओ झाले आणि मग पुढे ते तीथले चेअरमॅन झाले आणि १९९९ साली ते रिटायर झाले.
बोगले ही पहीली व्यक्ती आहे जीने नो-लोड म्युच्युअल फंडाची स्थापना केली आणि तसेच लाखो गुंतवणुकदारांना लो-कॉस्ट इन्डेक्स इनवेस्टींगचा कॉन्सेप्ट ही शिकवला.
१९९९ साली फॉर्चून मॅगझिनने बोगले यांना वीसाव्या शतकातील “इनवेस्टमेण्ट जाइन्ट” या नावाने सन्मानित केले.
इन्व्हेस्टमेंट स्टाइल (गुंतवणूक शैली):
सोप्या भाषेत सांगायच झाल्यास नो लोड़ लो कॉस्ट लो टर्नओव्हर आणि पॅसिव्हली मॅनेज असणे ही वैशिष्ट असलेल्या ब्रॉड बेस इन्डेक्स म्युच्युअल फंडात गुंतवणुक करून मार्केटमधिल उत्पन्नाला कॅप्चर करणे ही जॅक बोगले यांची इन्वेस्टींग फीलॅसॉफी होतो. व्यक्तीगत गुंतवणुकदाराने पुढील मुददयावर त्यांचे लक्ष केंद्रीत करावे असे बोगलेनि सतत निर्देशित केले.
१. इन्वेस्टमेंटशी निगडीत किंमत आणि खर्चात घट करणे.
२. दिर्घ कालवधीच्या इन्वेस्टमेंट हॉरीजॉनची म्हणजेच क्षितिजाचे प्रोडक्टीव अर्थशास्त्र अभ्यासणे
३. सुज्ञ अथवा योग्य विश्लेषणावर विश्वास ठेवणे आणि इन्वेस्टमेंट विषयी निर्णय घेताना आपल्या मनोभावनावर नियंत्रण ठेवणे.
४. व्यक्तीगत इन्वेस्टरने इन्डेक्स इन्वेस्टींग या योग्य स्ट्रॅटेजिचा वापर करावा.