_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/05/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/mhgr_barandbench_2024-05_7c1b7d2a-75a6-4c0d-969b-a21eab60066e_supreme_court_of_india__web_page_1600x-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee आयपिओ संबंधीत माहीती (IPO Related Information) - MH General Resource

आयपिओ संबंधीत माहीती (IPO Related Information)

आयपीओ मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रथम आपणास त्यांच्या कार्यपध्दती बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. खाली आयपीओ IPO ची महत्त्वाची माहीती दिलेली आहे.

Telegram Group Join Now

कंपनीचे व्यवस्थापक (Board of Directors):

कंपनीतील बोर्ड ऑफ डायरेक्टर यांची रचना आयपीओ IPO अंतर्गत समजणे खुप कठीण आहे. प्रथम म्हणजे बोर्डाची रचना ही कंपनीचे अंतर्गत डायरेक्टर आणि बाहेरचे स्वत्रंत डायरेक्टर मिळून तयार झालेली असते. अंतर्गत डायरेक्टर हे कंपनीची मॅनेजमेंट शेअरधारक वेन्चर कॅपिटॅलिस्ट वेन्डर आणि मित्रपरिवारांपैकी कोणीही असु शकतो. बाहेरील डायरेक्टरचे कंपनीशी कोणते अर्थव्यवहार अथवा खासगी संबंध नसतात त्यामुळे त्यांना विरोध होऊ शकतो. पंरतु ते बोर्डावर असतात ते त्यांच्या व्यापारातील चांगल्या अनुभवांमुळे उत्तम विचारशक्तीमुळे (judgment) आणि प्रतिष्ठेमुळे. बाहेरील डायरेक्टरचा स्वतःचा स्टॉक (Stock) असु शकतो. पण ते काही मोठे शेअरधारक नसतात. गुंतवणुकदार अशा कंपनीकडे जास्त आकर्षित होतात जेथे बाहेरील बोर्ड ऑफ डायरेक्टरची संख्या जास्त आहे. नमुनेदारपणे (Typically) जेव्हा कंपनी आयपीओ IPO इशू करते. तेव्हाच नविन बाहेरील डायरेक्टरची नियुक्ती करते.

मार्केटची रचना (Market Design):

प्राथमिक मार्केटची रचना कंपनीच्या प्रोविजन ऑफ कंपनीस अॅक्ट १९५६ मध्ये नमुद केली आहे. प्राथमिक मार्केट हे शेअर प्रसिध्द (issues) करणे शेअरची लिस्टींग (listing) करणे आणि त्यांची विभागणी करणे ही कार्य करते. कंपनीची रचना (SEBI) सेबीच्या ( DIP) गाइडलाईन अंतर्गत असावी. कंपनीचे इशुअर ( issuer) संस्थापक (Promoter), (management) संचालन प्रकल्प धोक्याच्या बाबी (risk factors), आणि योग्यतेचे नमुने हे सर्व सेबीच्या धोरणाप्रमाणे असायला हवे.

कंपनीच्या पात्रतचे नमुने (Eligibility Norms):

जी कंपनी पब्लिक शेअर प्रसिध्द करू इच्छिते तिला रजिस्ट्रार ऑफ कंपनीस (ROC) कडे २१ दिवसांत उद्देशपत्रिका जमा करावी लागते. नंतर योग्य मर्चंट बँकरमार्फत सेबी (SEBI) कडे उद्देशपत्रिकेचे दस्तावेज जमा करावे लागतात.

अनलिस्टेड कंपनी इक्विटी शेअर अथवा दुस-या सेक्युरीटी ज्यांचे पुन्हा इक्विटी शेअरमध्ये रूपांतर होऊ शकते. त्या स्थिर किंमतीवर अथवा वितरणाच्या आगाऊ बांधणीवर (book building basis) प्रसिध्द करू शकते परंतु त्यांसाठी त्यांना पुढील अटी पुर्ण कराव्या लागतात.

कंपनीच्या शेअर प्रसिध्द (issues) करणाच्या आधीच्या पाच वर्षातील दोन वर्षात (preceding) कंपनीची निव्वळ किंमत (net worth) कमीत कमी १ करोड असली पाहीजे आणि बाकीच्या कोणत्याही एका वर्षात कंपनीची निव्वळ किंमत १ करोडपेक्षा कमी नसली पाहीजे.

कंपनीस अॅक्ट १९५६ कलम २०५ मध्ये कंपनीच्या डीस्ट्रीब्युटेबल नफ्याचा (distributable profits) ट्रॅक रेकॉर्ड आधीच्या ५ वर्षातुन कमीतकमी ३ वर्षी तरी चांगला असावा.

• इश्यु साईज म्हणजेच (ऑफर र्डाक्यूमेंट + अलॉटमेन्ट allotment + व्यवस्थापकांचे योगदान हे) कंपनीच्या निव्वळ किंमती पेक्षा (Net worth) ५ पटीने जास्त नसले पाहीजे.

कंपनीच्या संस्थापकांचा हातभार (Contribution of Promoters ) :

अनलिस्टेड कंपनीच्या पब्लिक ईश्यूमधील व्यवस्थापकांचे (Promoter) योगदान (contribution) आणि जेव्हा शेअरची विक्री केली जाते तेव्हा व्यवस्थापकांचे शेअर होल्डींग हे पोस्ट इश्यू कॅपिटलपेक्षा २०% हुन कमी नसले पाहीजे.

काळाचे बंधन (Lock-In period):

समाजात कंपनीने शेअर ईश्यू केल्यावर व्यवस्थापकाचे योगदान कमीतकमी ३ वर्षासाठी बध्द (locked) होते. जर व्यवस्थापकाचे योगदान गरजे पेक्षा जास्त झाले तर ते जास्तीचे योगदान १ वर्षासाठी बध्द (locked) होते. ज्यां सेक्युरीटी फर्म अलॉटमेट बेसिस basis वर असतात त्यांचा बध्दकाळ १ वर्षाचा असतो.

वितरणाची आगाऊ बांधणी (Book Building Process):

या पध्दतीत सेक्युरीटीचे वितरण केले जाते. ज्यांत गुंतवणुकदार शेअर मार्केटच्या सभासंदामार्फेत शेअरच्या किंमतीवर जी बोली बंदर लावतात ती जोखली जाते. गुंतवणुकदारानी लावलेली बोली हाच बुक बिल्डींग चा पाया आहे. सेक्युरीटीला दिलेल्या मागणीप्रमाणे कराची आकारणी केली जाते आणि मग किंमत ठरवली जाते. सामान्य पब्लिक ईश्यूमध्ये गुंतवणुकदाराला किंमत अगोदरच ठाउक असते आणि त्याची मागणी (demand) शेअरचे वितरण issue बंद झाल्यावर कळते.

बँकर ईश्यू (Bankers to Issue):

आयपीओला पेमेन्टसहीत स्वीकारण्याचे काम शेडयूल बॅक करते. तसेच खालील कामे ही बँक करते.

. अर्जपत्र चौकशी करून स्वीकारणे आणि त्यांच बरोबर त्यांची पेमेन्ट स्वीकारणे.

ज्यां अर्जदारांना विभागणी (allotment) मिळत नाही अथवा अपूर्ण विभागणी Part allotment मिळते. त्यांना त्यांचे पैसे परत देणे. नफाच्या हिस्साची (Dividend) पेमेन्ट करणे.

शेडयूलबॅकला सर्व भारतात जेथील त्यांच्या शाखा पेमेन्ट स्वीकारतात त्यांची यादी आणि दररोजचा अर्ज (daily application) आणि पेमेन्टचा रीपोट कंपनीला दयावा लागतो.

रजिस्ट्रार टू ईश्यु (Registrar to Issue):

हे सामान्यतः कंपनीच्यावतीने खालील कार्य करतात, त्यांची कार्ये पुढील प्रमाणे आहेत.

अर्जदार आणि त्यांच्या पैशांचे अकाऊन्ट सांभाळणे.

वितरणाच्या आगाऊ बांधणीचा कार्यभार अदयावत करणे आणि विभागणीची यादी करणे.

विभागणी मिळालेल्या लोकांना त्यांचे पत्र पाठवणे. नियुक्त केलेल्या बँकेला पैसे परतफेडीची ऑडर पाठवणे.

लीड मर्चंट बँकर (Lead Merchant Banker):

कंपनीचे कर्तव्य पार पाडण्यात मर्चंट बॅकर महत्वाची कामगीरी बजावतो. ते दक्षतेने पाहतात की ऑफर डॉक्युमेंट सेबीच्या गाईडलाइन प्रमाणे आहेत की नाही. तसेच शेअरची डीमांड कमी भरली गेली तर ते स्वतःचे भांडवल बाकीची रक्कम भरून काढण्यासाठी करतात.

आयपीओला IPO अर्ज कसा करावा (How to Apply for IPO):

प्रथम तुमच्याजवळ पेन कार्ड असणे आवश्यक आहे. ते डीमेट अकाउन्ट चालू करण्यासाठी आवश्यक आहे. डीमेट अकाउन्ट चालू केल्यावर आपण करून पेमेंट आणि अर्ज ज्या बेंकेत स्वीकारले जातात तीथे भरले जातात.

• IPO आयपीओला अर्ज करू शकतो. जे आपल्याला शेअर दलालाकडून किंवा बँकेतुन अथवा शेअरबाजारातून मिळते. त्याच्यामध्ये आवश्यक ती माहीती नमुद )

आयपीओला IPO अल्पाय करण्याआधी कंपनीची तपासणी कशी करावी व कोणते मुददे लक्षात घ्यावे ते पुढील प्रमाणे.

IPO आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्याआधी लक्षात घेण्याचे मुददे। (Points to be checked before investment in IPO):

IPO आयपीओला अर्ज करताना खालील मुददे काळजीपूर्वक अभ्यासा.

• कंपनीचे व्यवस्थापन कसे आहे. ते योग्य आहेत की नाही कंपनी केव्हा . सुरू झाली अथवा केव्हा सुरू होणार आहे. हे पहा. कंपनीचे प्रकल्प जमिन मशिनरी कच्चा माल विक्रीची व्यवस्था यावर लक्ष दया.

कंपनीचे एकूण भांडवल कीती आहे आणि कंपनी त्यात वाढ करणार आहे. का ते तपासावे. यात संस्थापकांचे फायनान्शिल इन्स्टिटयुशन आणि जनता या प्रत्येकाचे योगदान किती आहे ते पहावे.

कंपनीत कोणत्याही प्रकारचे टेक्नीकल कोलॅबोरेशन असल्यास त्याची माहीती मिळवावी.

सरकारने उत्पनावरील कर विक्रीकर एक्साईज डयूटी यात कंपनीला काही सुट दिली आहे का ते पहावे. विक्रीचे व्यवस्थापन आणि वस्तुची मागणी देशातच आहे की विदेशी सुध्दा आहे हे पहावे.

जर वरील मुददे काळजीपूर्वक अभ्यासले तर तेथे अर्ज केल्यानंतर काही समस्या येत नाही.

कंपनीच्या शेअरच्या वितरणास योग्य प्रतिसाद नाही मिळाला तर:

(If The Issue Is Not Fully Paid ):

जर आयपीओला प्रतिसाद पुरेसा मिळाला नाही तर विभागणी (Allotment) सुरू केली जात नाही. सेबीच्या नियमांप्रमाणे ९०% अमाउन्टची व्यवस्था आयपीओ IPO बंद झाल्यापासून ६० दिवसात संस्थापकाने (Pomoters) केली पाहीजे. जर का संस्थापक या दिवसात ही व्यवस्था उपलब्ध करून देऊ शकले नाही तर पुढच्या १० दिवसात आयपीओ अर्जदारांना त्यांचे पैसे १५% व्याजाने परत करावे लागतात.

जादा अर्ज भुगदान (Surplus Application Money):

जर दिलेल्या अर्जात वितरणासाठी मिळालेले अर्ज कंपनीने नमूद केलेल्या भागवितरणापेक्षा जास्त रक्कम जमा झाल्यास कंपनीला ते पैसे आठ दिवसात संबधीत अर्जदारांना परत करावे लागतात. जर या कामात संस्थापकांना विलंब झाला तर कंपनीला ते पैसे १५% जास्त व्याजाने परत करावे लागतात.

Related Posts

CAA Act

MHGR| News Update| CAA कायदा काय म्हणतो?

CAA Act

LGBTQ

MHGR| समान विवाहासाठी भारतातील LGBTQ+ प्रचारकांसाठी लढा

LGBTQ+

ISM office V6

MHGR| ISM office V6 software download for Windows 10

ISM office V6

What is a Domicile Certificate in Marathi

What is a Domicile Certificate in Marathi : अधिवास प्रमाणपत्र हे अधिकृत दस्तऐवज आहे जे भारतातील विशिष्ट राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात एखाद्या व्यक्तीच्या निवासी स्थितीचे प्रमाणीकरण करते….

MHGR| महाराष्ट्र शासनाचा करार सूचीबद्ध आयटी कंपनी | Job Vacancy in Aksentt Tech in Mumbai

Government of Maharashtra Contract Listed Company: Aksentt Tech ही टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर सेवा प्रदाता आहे जी मोबाईल आणि फिक्स्ड टेलिकम्युनिकेशन नेटवर्क दोन्हीसाठी पायाभूत सुविधा रोलआउट सोल्यूशन्स ऑफर करते. सेवा…

MHGR| ई-पीक पहाणी प्रकल्प, महाराष्ट्र राज्य

आता पीक विमा आणि कृषी पतपुरवठा अधिक सुलभ होणार मोबाईलवरुन पीक पहाणी करणे आणि मार्गदर्शिका Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *