राजकारणात राहुल यांच्या रूपाने आश्वासक आवाज, त्यांनी माफी मागू नये. अशी भूमिका महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी मांडली आहे. राहुल यांनी कोर्टात माफी मागितली नाही. मी सावरकर नव्हे गांधी आहे, गांधी कधीच माफी मागत नाही, असे म्हटल्याने देशासह राज्यभरात घमसान माजले आहे. (Tushar Gandhi Said Rahul gandhi Reassuring Voice In Politics Should Not Apologize Savarkar row )
दरम्यान, एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी राहुल गांधींच्या भूमिकेवर भाष्य केले. यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे प्रत्यक्षपणे दाखवून दिले.
काय म्हणाले तुषार गांधी?
राहुल गांधी यांनी कोर्टात माफी मागितली नाही. मी सावरकर नव्हे गांधी आहे, गांधी कधीच माफी मागत नाही, असे म्हटले. माफी मागून संसदेत राहणे चांगले राहिले नसते का? असा सवाल उपस्थित केला असता.