वेदांत लिमिटेडने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की, बोर्डाने एका शेअरवर 2,050 टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे.
वेदांत लिमिटेडने आज म्हणजेच 5 एप्रिल 2023 रोजी एक्स-डिव्हिडंड म्हणून व्यापार करणार आहे. कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर 2050 टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. FY23 साठी आतापर्यंत कंपनीने 4 वेळा लाभांश दिला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील हा पाचवा लाभांश आहे.
म्हणजेच, पात्र गुंतवणूकदारांना 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या एका शेअरवर 20.50 रुपये लाभांश दिला जाईल. या लाभांशाची रेकॉर्ड तारीख 7 एप्रिल 2023 निश्चित करण्यात आली आहे.
Vedanta to turn ex-dividend for 5th interim dividend of 2050% on 6 April 2023
कंपनी पाचव्यांदा लाभांश देणार :
या नव्या घोषणेपूर्वी कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात 4 वेळा लाभांश दिला होता. तेव्हा कंपनीने 12.50 रुपये, 17.50 रुपये, 19.50 रुपये आणि 31.50 रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतला होता.
सोमवारी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. त्यानंतर कंपनीचे शेअर्स 2.80 टक्क्यांनी वाढून बीएसईवर 282.40 रुपयांवर पोहोचले होते.
गेल्या एका महिन्यात अनिल अग्रवाल यांच्या कंपनीच्या शेअरची किंमत 1 टक्क्यांहून अधिक घसरली आहे. तर या वर्षी कंपनीच्या शेअरमध्ये 10.47 टक्क्यांची घसरण झाली आहे. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 440.75 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक प्रति शेअर 206 रुपये आहे.
अॅक्सिस सिक्युरिटीजच्या ताज्या अहवालानुसार, वेदांत 28.6% च्या सर्वाधिक लाभांश उत्पन्नासह लार्ज-कॅप कंपन्यांनमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या 12 महिन्यांत, कंपनीने लाभांश लाभ म्हणून प्रति शेअर ₹ 81 दिले आहेत.