Avalon Technologies IPO : एव्हलॉन टेक्नोलॉजीजचा (Avalon Technologies) आयपीओ एप्रिलला सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. गुंतवणूकदार 6 एप्रिलपर्यंत यामध्ये गुंतवणूक करू शकतील. कंपनीला या आयपीओच्या माध्यमातून 865 कोटी रुपये उभे करायचे आहेत. या आयपीओची साीज आधी 1,025 कोटी होती, जी आता कमी करण्यात आला आहे. प्री-आयपीओ प्लेसमेंटमुळे आयपीओची साईज कमी करण्यात आली आहे. याअंतर्गत 320 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स जारी केले जातील. याशिवाय, ऑफर फॉर सेलद्वारे (OFS) 545 कोटीच्या शेअर्सची विक्री केली जाईल.
ओएफएसचा भाग म्हणून कुन्हामेद बिचा 131 कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहे. तर, टीपी इम्बीचम्मद 16 कोटी, मरियम बिचा 10 कोटी आणि आनंद कुमार आणि लुकुमन वीदु एडियानम प्रत्येकी 75.50 कोटी आणि सेशु कुमार 65 कोटी रुपयांचे शेअर्स विकतील.
अँकर गुंतवणूकदार 31 मार्चपासून बोली लावू शकतील. 12 एप्रिलला शेअर्सचे ऍलॉटमेंट होईल, असे कंपनीने म्हटले आहे. त्याच वेळी कंपनी 18 एप्रिलला मार्केटमध्ये डेब्यू करेल.
कंपनी या फ्रेश इश्यूमधून 145 कोटी एव्हलॉन टेक्नॉलॉजी अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे. ऍवलॉन टेक्नॉलॉजीजवर जानेवारी 2023 पर्यंत कंसोलिडेटेड आधारावर 324.12 कोटीचे कर्ज आहे. याशिवाय कंपनीला वर्किंग कॅपिटलसाठी 90 कोटी रुपये वापरायचे आहेत.
एव्हलॉन टेक्नॉलॉजीज ही एक फुल्ली इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस (EMS) कंपनी आहे. त्याची स्थापना 1999 मध्ये झाली. एव्हलॉन इतर कंपन्यांना इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सेवा देते. त्याचे अमेरिका आणि भारतात 12 मॅन्युफॅक्चरींग प्लांट्स आहेत.