राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – भरडधान्य (मका)
राष्ट्रिय अन्नसुरक्षा अभियान- भरडधान्य (मका) हे अभियान मका या पिकासाठी राज्यातील ७ जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानासाठी अर्थ सहाय्य केंद्र हिस्सा 60 टक्के व राज्य हिस्सा 40 टक्के आहे. मका पिकाचे क्षेत्र व उत्पादकता वाढावी या उद्देशाने या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
मार्गदर्शक सुचना :
https://drive.google.com/file/d/1PGuezPavqbJZBUrTih-TgQRyxv6_8Pia/view? usp=drivesdk
राष्ट्रिय अन्न सुरक्षा अभियान भरडधान्य (मका) अंतर्गत राबविण्यात येणारे घटक :
1. पिक प्रात्यक्षिके: अ) सुधारित तंत्रज्ञानावर आधारित पिक प्रात्यक्षिके : अनुदान रु. 6000 प्रती हेक्टर देय राहील. ब) आंतर पिक प्रात्याक्षिके : अनुदान रु. 6000 प्रती हेक्टर देय राहील.
पिक प्रात्यक्षिकां साठी विभागीय कृषि सहसंचालक यांचे स्तरावर संलग्न कृषी विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार जिल्हा / तालुका / पिक निहाय निर्धारित तंत्रज्ञान आधारित कीट नुसार सर्व घटक अंमलबजावणी साठी, रासायनिक खतावरील खर्च लाभार्थी शेतकरी यांनी स्वत: करावयाचा आहे यासाठी अनुदान देय नाही.
2. एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM)
अ) पिक संरक्षण औषधे:
किंमतीच्या 50 टक्के किंवा रु. 500 प्रती हेक्टर च्या कमाल मर्यादेत अनुदान देय राहील त्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याने शिफारशी प्रमाणे सूक्ष्म मुल द्रव्ये खुल्या बाजारातून त्यांच्या पसंतीने खरेदी करावीत व त्यानंतर शेतक-याच्या आधार संलग्न राष्ट्रीयीकृत बँक खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येइल.
ब) जैविक खते:
कृषी विभागाच्या जैविक प्रयोगशाळे मार्फत तृणधान्य पिक गटास आवश्यक द्रवरुप जैविक खते/जैविक खते संघ (liquid consortia) तयार करण्यात येत असुन सदर खतांची बीज प्रक्रिया केल्यास उत्पादन खर्चात बचत करुन पिकांच्या उत्पादकतेत वाढ होते. द्रवरुप जीवाणू संघ (Liquid Consortia) यामध्ये नत्र स्थिरी करण करणारे, स्फूरद विरघळविणारे व जस्त विरघळविणारे जीवाणू उपलब्ध करुन देणारे यापैकी कमीत कमी दोन किंवा अधिक जिवाणुंचा समावेश असतो. शेतकरी गटाने जीवाणू खतांची खरेदी प्रथम प्राधान्याने शासकीय प्रयोग शाळा, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र यांच्या कडून करावी. शेतकरी यांना खुल्या बाजारातुन जीवाणू खते खरेदी करावयाची असल्यास किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल रु. 300 प्रती हेक्टर अनुदान देय आहे. शेतकऱ्यांनी खुल्या बाजारातून त्यांच्या पसंतीने खरेदी करावीत व त्यानंतर शेतक-यांच्या आधार संलग्न राष्ट्रियिकृत बँक खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येते. 4) एकात्मिक किड व्यवस्थापन (IPM) :
अ) तणनाशके :
तण नाशकाच्या वापरासाठी किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल रु. 500 प्रती हेक्टर अनुदान देय आहे. त्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याने खुल्या बाजारातून त्यांच्या पसंतीने लेबल क्लेम असलेल्या व कृषी विद्यापीठाच्या सल्यानुसार तणनाशकांची खरेदी करावी व त्यानंतर शेतक-यांच्या आधार संलग्न राष्ट्रियिकृत बँक खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येइल. ब) पिक संरक्षण औषधे : किंमतीच्या 50 टक्के किंवा कमाल रु. 500 प्रती हेक्टर अनुदान देय आहे.एका शेतक-यांस एका वर्षात सर्व बाबी मिळून जास्तीत जास्त 5 हेक्टर पर्यंत लाभ घेता येइल.5) फ्लेक्झी घटक : अ) पिक पद्धतीवर आधारित शेतकरी प्रशिक्षण :रुपये 14000 प्रती प्रशिक्षण 30 शेतक-यांसाठी 4 सत्र (2 सत्र खरीप व 2 सत्र रबी मध्ये). राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – पौष्टिक तृणधान्य (ज्वारी, बाजरी, रागी) राष्ट्रिय अन्नसुरक्षा अभियान- पौष्टिक तृणधान्य हे अभियान ज्वारी, बाजरी, रागी या पिकांसाठी राज्यातील 26 जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानासाठी अर्थ सहाय्य केंद्र हिस्सा 60 टक्के व राज्य हिस्सा 40 टक्के आहे. वरील पिकांचे क्षेत्र व उत्पादकता वाढावी या उद्देशाने या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
मार्गदर्शक सुचना :
https://drive.google.com/file/d/1PGuezPavqbJZBUrTih-TgQRyxv6_8Pia/view? usp=drivesdk
राष्ट्रिय अन्न सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य अंतर्गत राबविण्यात येणारे घटक :
1) सुधारित तंत्रज्ञानावर आधारित पिक प्रात्यक्षिके :
अनुदान रु. 6000 प्रती हेक्टर देय राहील.
पिक प्रात्यक्षिकां साठी विभागिय कृषी सह संचालक यांचे स्तरावर संलग्न कृषी विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार जिल्हा/तालुका/पिक निहाय निर्धारित तंत्रज्ञान आधारित कीट नुसार सर्व घटक अंमलबजावणी साठी रासायनिक खतावरील खर्च लाभार्थी शेतक-यांनी स्वत: करावयाचा आहे यासाठी अनुदान देय नाही.2) प्रमाणित बियाणे वितरण
अ) संकरित वाण बियाणे वितरण :
राज्यासाठी अधिसूचित संकरित वाणाचे मागिल 10 वर्षाच्या आतील अधिसूचित व राज्यासाठी शिफारस केलेले वाण –
किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल रु.10000 प्रती क्विंटल अनुदान देय राहील.
ब) सुधारित वाण बियाणे वितरण :
I) 10 वर्षाच्या आतील अधिसूचित वाण राज्यासाठी शिफारस केलेले वाण –
किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल रु. 3000 प्रती क्विंटल अनुदान देय राहील.
II) 10 वर्षाच्या वरील अधिसूचित राज्यासाठी शिफारस केलेले वाण
किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल रु.1500 प्रती क्विंटल अनुदान देय राहील.
3) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (INM) :
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन मध्ये सूक्ष्म मुल द्रव्ये व जैविक खते या बाबींचा समावेश होतो.
अ) सूक्ष्म मुलद्रव्ये :
सूक्ष्म मुल द्रव्याच्या वापरासाठी किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल रु. 500 प्रती हे. अनुदान देय आहे.