_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/05/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/mhgr_barandbench_2024-05_7c1b7d2a-75a6-4c0d-969b-a21eab60066e_supreme_court_of_india__web_page_1600x-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee मधू कांबीकर (Madhu Kambikar) - MH General Resource

मधू कांबीकर (Madhu Kambikar)

कांबीकर, मधू : ( २८ जुलै १९५३ ). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी कलावंत चित्रपट नायिका . जन्म माळेगाव खुर्द, ता. गेवराई, जि. बीड येथे. एका उपेक्षित समाजात त्यांचा जन्म झाला. आई – कलाबाई , मावशी – आयुबाई. मावशीनं मधुबाईंना दत्तक घेतलं. कांबी, ता. शेवगाव, जिल्हा अहमदनगर येथे त्यांचे बालपण गेले. त्यांचे शिक्षण इयत्ता सातवी पर्यंत कांबीत झाले. आई आणि मावशी लावणी कलावंत होत्या. त्यांचे दत्तक वडील रामभाऊ दौलतराव म्हस्के पाटील यांनी मधुबाईना कलेसाठी विशेष सहाय्य केले. बालपणापासून लावणी अदाकारी मधुबाईंच्या अंगात भिनलेली होती. त्या उजळ रंगाने आणि नाकी – डोळी, उपजतच सुंदरता असलेल्या मधुताईंच्या अंगभूत कलेची ओढ पाहून घरच्यांनी त्यांना शास्त्रोक्त नृत्य शिकवण्यासाठी पुण्यास पाठवले.

Telegram Group Join Now

पुण्यात बाळासाहेब गोखले यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय नृत्याचे धडे घेतले. कथ्थकचं शिक्षण घेऊन त्या मुंबईत गेल्या. त्यांनी न्यू हनुमान थिएटर, लालबाग येथून १९७३ साली आपल्या कला जीवनाचा प्रारंभ केला. तो काळ लोकरंजनाचा होता. मधुबाईनी लोककलावंतांमध्ये राहूनच लावणी आणि अन्य लोकनृत्यांची परंपरा सांभाळली. लोकरंगभूमीचे कलाकौशल्य त्यांनी आत्मसात केले. लोककलेला त्या काळात जनमान्यता आणि राजमान्यताही होती. राज्य शासनाच्या सांस्कृतिक खात्यामार्फत पंचतारांकित हॉटेलांतून कलापथकांचे कार्यक्रम सादर झाले. त्यात लावणी अविष्कारासाठी मधुबाईंची निवड झाली. त्यांच्या सादरीकरणात विविधता असल्याने त्यांच्या नृत्याविष्काराची प्रशंसा झाली. नृत्यांगना म्हणून त्यांची ओळख त्या काळात संपूर्ण महाराष्ट्राला झाली  .

१९७७ साली ‘ महाराष्ट्राची लोकधारा ‘ या कलापथकातून त्यांनी राजधानी दिल्लीत विलोभनीय नृत्यनाट्य सादर केले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या बरोबर खेळलेली फुगडी हा त्या वेळचा औत्सुक्याचा विषय ठरला. पुढे नगर रंगभूमीच्या कलावंत म्हणून त्या प्रकाश झोतात आल्या. त्या आधी अनेक लोकनाट्यातून त्या छोट्या – मोठ्या भूमिका करीत. गाढवाचं लग्न  या वगनाट्यात त्यांनी वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्याबरोबर भूमिका केली. चोरावर मोर  या दूरदर्शन मालिकेतील त्यांची भूमिका लक्षवेधी ठरली. त्याकाळात तमाशापटांना लोकप्रियता मिळत होती. एक वेगळा चेहरा म्हणू प्रख्यात दिग्दर्शक अनंत मानेंनी लक्ष्मी  चित्रपटासाठी मधुबाईंकडून सोलो नृत्य बसवून घेतले  होते. त्याचवेळी सह्याद्री दूरदर्शनवर फुलोरा ,गजरा  असे कार्यक्रम प्रदर्शित होत होते. त्यातील मधुबाईंच्या भूमिकांना उत्स्फूर्त दाद मिळत गेली. सहाजिकच मराठी चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्याकडून छोट्या – मोठ्या भूमिका करवून घेतल्या. मराठी चित्रपटसृष्टीला कष्टाळू, समर्पक कलावंतांची मोठी देणगी लाभली आहे. मधू कांबीकर हे नाव या कलाकारांमध्ये अग्रक्रमानं घ्यावं लागते  .

१९७८ सालात निळू फुलेंबरोबर सतीची पुण्याई , अशोक सराफांसह केलेला दगा , रंजना सारख्या कसलेल्या अभिनेत्रींबरोबरचा तमासगीर  या त्यांनी केलेल्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. मराठी चित्रपटातून काम करता – करता मधू कांबीकर अनेकविध लोकनाट्यातूनही भूमिका करीत होत्या. शंकर पाटील लिखित भानगडी शिवाय पुढारी नाही  अशोकजी परांजपे निर्मित आतून कीर्तन वरून तमाशा , उदे गं अंबे उदे , वसंत सबनीसांचे विच्छा माझी पुरी करा , बाईचा चटका गमविला पटका असा जवळपास दहा लोकनाट्यातील त्यांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या.

अनेक चित्रपटात त्यांनी आव्हानात्मक भूमिका यशस्वी त्यांनी पार पाडल्या.  दिगज्ज कलावंत श्रीराम लागू समवेतचा सौभाग्यदान; यशवंत दत्ताबरोबर देवापुढे माणूस , रानपाखरे , शापित ; दादा कोंडकेंच्या ह्योच नवरा पाह्यजे, मला घेऊन चला , येऊ का घरात ; रवींद्र महाजनी सोबतचा हेच माझं माहेर ; निळू फुलें सोबतचा स्त्री जन्मा ही तुझी कहाणी  ; लक्ष्मीकांत बेर्डे सोबत झपाटलॆला ; जब्बार पटेलांच्या सोबत  एक होता विदूषक ; मोहन जोशी समवेतचा रावसाहेब ; अशा तब्बल १०३ मराठी चित्रपटातून मधु कांबीकरांनी अभिनय करून स्वतःचा आगळा – वेगळा ठसा उमटवला. त्यांनी वेगवेगळ्या भाषांतूनही चित्रपट केले. हिंदीतून ह्म्म दोनो , सातवा आसमान , अपनापन , यशवंत , शोला और शबनम  अशा दहा चित्रपटातून त्यांनी भूमिका साकारल्या. याशिवाय साद  या गुजराती चित्रपटही त्यांनी अभिनय केला .

लोकरंगभूमीवरून कारकीर्द सुरु केलेल्या या अभिनेत्रीने लोकनाट्य, चित्रपट, दूरदर्शन, मालिकांबरोबरच अनेक नाटकातूनही अभिनय केला. त्यात प्रभाकर पणशीकरांबरोबर पुत्रकामेष्टी  ; वि . वा . शिरवाडकर लिखित  चंद्र जिथे उगवत नाही  ;  श्रीराम लागूंच्या समर्थ अभिनयाने साकारलेलं आकाश पेलतांना ; विक्रम गोखलेंसोबत पेईंग गेस्ट ; शं . ना . नवरे लिखित सूर राहू दे, लावणी भुलली अभंगाला ; शाहीर अमरशेख निर्मित आमचं नाव बाबुराव ; रा.रं.बोराडे लिखित आमदार सौभाग्यवती ; शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे निर्मित फुलवंती  या शिवाय बेलभंडार  आणि मधूप्रितम थिएटर्स या स्वनिर्मित सखी माझी लावणी  अशा अनेकविध भूमिकांतून समर्थ अभिनेत्री म्हणून त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला.

अभिनयाच्या या संपूर्ण कारकिर्दीत मधू कांबीकरांनी लोककलेचा वारसा कधीही हरवू दिला नाही. त्यांनी आपल्या मूळ कांबी गावांत वडील म्हस्के पाटील त्यांच्या नावाने सार्वजनिक वाचनालय सुरु केले. सखी माझी लावणी चे अनेक प्रयोग करून दुर्गम भागातील शाळांसाठी आर्थिक मदत केली. अनेक लावणी कलावंतांना लावणी कलेचे प्रशिक्षण दिले. शासनाच्या सांस्कृतिक खात्याकडून चालविल्या जाणाऱ्या  शिक्षण शिबिरातून अभ्यासवर्ग घेतले. शाळा – महाविद्यालयातून लोककलेवर व्याख्यान दिले. अनेक परिसंवादातून सहभाग घेतला. अनेक नृत्यांगनांना त्यांनी आजवर घडवले.

त्यांना मिळालेले पुरस्कार : शापित  चित्रपटाला सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार (१९८२), राज्य चित्रपट महोत्सव, राजाभाऊ परांजपे पुरस्कार, फ्लिमफेअर आशीर्वाद व कार्तिकी पुरस्कार ( खासगी ) ; हेच माझं माहेर  चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार (१९८४), राघुमैना चित्रपटाला महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सव पुरस्कार (१९८५), एक होता विदूषक  चित्रपटाला राज्य चित्रपट महोत्सव नामांकन (१९९१), मुक्ता चित्रपटाला कालनिर्णय पुरस्कार, सहाय्य्क अभिनेत्री महाराष्ट्र राज्य पुरस्कार (१९९४), कुलस्वामिनी तुळजाभवानी  चित्रपटाला उत्कृष्ट सहाय्य्क अभिनेत्री राज्य चित्रपट महोत्सव पुरस्कार  (२००१ ),संघर्ष जीवनाचा  चित्रपटाला उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, २६ वा राज्य महोत्सव (२००२), साद  ( गुजराती) सर्वोकृष्ट अभिनेत्री, गुजरात राज्य चित्रपट पुरस्कार (२००२).

मधू कांबीकरांनी तब्बल चार दशके कलेची सेवा केली. कलेचा त्यांचा प्रवास हा लावणी, लोकनाट्य, चित्रपट, नाटक, दूरदर्शन मालिका पुन्हा लोकरंगमंच अशा विविध अंगानं बहरलेला राहिला. नागर रंगभूमी व ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या या अभिनेत्रींचे स्थान निश्चित वाखाणण्यायोग्य आहे. माना – सन्मानाचे पुरस्कार व प्रसिद्धी मिळूनही त्यांनी सखी माझी लावणी  या कार्चेयक्रमाचे  ‘ प्रयोग अमेरिका, अबुधाबी, दुबई, मॉरिशियस अशा देशात करून मराठी मनाच्या लावणीस बहुमान प्राप्त करून दिला. शब्दप्रधान लावणीनृत्य सादर करून शब्दांना अर्थवाही केले. पूरक मुद्राभिनय आणि आंगिक अभिनयानं फुलवण्याचे कसब मधू कांबीकरानी करून दाखवले.

संदर्भ : क्षेत्र संशोधन

Related Posts

यमुनाबाई वाईकर (Yamunabai Waikar)

वाईकर ,यमुनाबाई (जन्म : ३१ डिसेंबर १९१५ – मृत्यू : ७ मे २०१८) मराठीतील सुप्रसिद्ध लावणी गायिका. मूळ नाव यमुना विक्रम जावळे. आईचे नाव गीताबाई. सातारा जिल्ह्यातील वाई…

चंद्रकांत ढवळपुरीकर (Chandrakant Dhawalpurikar)

ढवळपुरीकर, चंद्रकांत : (२३ जुलै १९३२).  ढोलकी फडाच्या तमाशाचे मालक, ज्येष्ठ कलावंत. पूर्ण नाव चंद्रकांत शिवराम जाधव. Telegram Group Join Now त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी…

छगन चौगुले (Chagan Chougale)

चौगुले, छगन : (१९५७ – २० मे २०२०). महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोककलावंत. लोकगीते व भक्ती गीते गाणारे म्हणून त्यांना ओळखले जायचे. लोककलेचे कोणतेही प्रशिक्षण न घेता खड्या आणि बहारदार गाण्याने…

मंगला बनसोडे (Mangla Bansode)

बनसोडे, मंगला : (१२ सप्टेंबर १९५१). ढोलकी फडाच्या तमाशातील कलावती. तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊ नारायणगावकर यांच्या कन्या. ढोलकी फडाच्या तमाशात गायिका, नर्तिका, अभिनेत्री अशा विविध भूमिका त्यांनी आजवर…

गुलाबबाई संगमनेरकर (Gulabbai Sangamnerkar)

संगमनेरकर, गुलाबबाई : (१९३२). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी कलावंत. नृत्यचंद्रिका म्हणून त्यांना ओळखले जाते. लावणी क्षेत्रात बैठकीच्या लावणीची अदाकारी याविषयी ज्या ज्या वेळी बोलले जाते तेव्हा हमखास डोळ्यासमोर येणारे…

भजन (Bhajan)

भक्तिसंगीतातील एक प्रकार.त्यास टाळ,मृदंग,पखवाज या वाद्यांची साथ असते. हा प्रकार सामवेदापासून सुरू झाला असे अभ्यासकांचे मत आहे. भजनाचा स्पष्ट उल्लेख श्रीमद्भागवताच्या दसमस्कंधात होतो. भागवताच्या काळापासून भजनाची परंपरा रुढ…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *