_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/02/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%97-%e0%a4%87%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-gig-%e0%a4%95/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-how-to-make-money-online/mhgr_how_to_make_money_online-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत डीझाईन क्षेत्रामधील करिअरच्या संधी.. - MH General Resource अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत डीझाईन क्षेत्रामधील करिअरच्या संधी.. - MH General Resource

अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत डीझाईन क्षेत्रामधील करिअरच्या संधी..

Spread the love

इंडस्ट्रीज, फॅक्टरी संबंधीत क्षेत्रात ही आता नवनवे उत्पादन घेण्यासंदर्भातील स्पर्धा सुरू आहे. या व्यावसायिक क्षेत्रात संबंधीत तज्‍ज्ञांची मागणी वाढत असून, इंडस्ट्रीयल आणि प्रोडक्ट डिझाईन क्षेत्रातील काही शिक्षणक्रमांची माहिती घेऊ-

Telegram Group Join Now

सर्टीफीकेट इन ३ डी आर्कीटेक्चर डीझाईन – हा 6 महिन्याचा प्रमाणपत्र शिक्षणक्रम असून, यास ८ वी उत्तीर्ण विद्यार्थीही प्रवेश घेऊ शकतात. रेड चिली, एन्टरटेंटमेंट, युटीव्ही अशा नामवंत कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

सर्टीफीकेट इन प्लास्टीक प्रोडक्ट डिझाईन ॲण्ड टुलींग – हा केवळ 10 दिवसांचा शिक्षणक्रम असून, या शिक्षणक्रमास प्रवेश घेण्यासाठी पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तींना इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा 30 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे असेच तुम्हाला प्रशिक्षण देतात. फॅक्टरी भेट आणि संबंधीत कामांची प्रात्यक्षिक करण्याची संधी प्रशिक्षणा दरम्यान मिळते. तंत्रज्ञानाशी संबंधीत कंपन्यांमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी प्राप्त होते.

ऑटोमोबाईल ॲण्ड ट्रान्सपोर्टेशन डिझाईन – हा ४ वर्षाचा पदवी शिक्षणक्रम असून, १२ वी उत्तीर्ण असणारे विद्यार्थी या शिक्षणक्रमास प्रवेश घेऊ शकतात.

डीझाईन व्हीज्युलायजेशन – हा 7 महिन्याचा शिक्षणक्रम असून, 10+2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. डिजीटल डिझाईन, ३ डी डिझाईन, ॲनिमेशन, व्हीडीओ एडिटींग, पोर्टफोलीओ डेव्हलपमेंट, आर्कीटेक्चर व्हीज्युव्हलायजेशन इत्यादी विषय शिक्षणक्रमात असतात. बीग ॲनीमेशन, स्टार प्लस, इंडीया टी.व्ही., एन.डी.टीव्ही या नामांकीत कंपन्यामध्ये काम करण्याची संधी मिळते.

मास्टर डिप्लोमा इन ऑटोमोटीव्ह डिझाईन – हा 6 महिन्याचा शिक्षणक्रम असून, 10+2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल डिझाईन फाउंडेशन – हा एक वर्षाचा पदविका शिक्षणक्रम असून, 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

एमबीए इन ट्रान्सपोर्ट ॲण्ड लॉजीस्टीक – हा दोन वर्षाचा पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम आहे. कॅट किंवा जीमॅट उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बँक ऑफ अमेरिका, सिटी बँक, टाटा एआयजी इन्शुरन्स, सॅमसंग, वीप्रो, नोकीया या नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळते.

इंटीरियर ॲण्ड फर्नीचर पदवी – हा ४ वर्षाचा शिक्षणक्रम असून, १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. परदेश दौ-यात अभ्यास करण्याची संधी प्राप्त होते.

प्रोडक्ट डिझाईन – हा पदव्युत्तर पदवी दोन वर्षाचा शिक्षणक्रम असून, यास प्रवेश घेण्यासाठी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यामध्ये आर्ट डिझाईन ॲण्ड सोसायटी, स्केचींग ॲण्ड रेंडरींग, एडव्हान्स इंजीनिअरींग ग्राप, प्रोडक्ट ॲनालीसेस, डिजीटल डिजाईन, व्हॅल्यु इंजीनिअरींग, आदी विषयांचा समावेश आहे.

बी.एसस्सी. + एम.एसस्सी. इन प्रोडक्ट डिझाईन – हा ५ वर्षाचा शिक्षणक्रम असून 10+2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

प्रोडक्ट ॲण्‍ड लाइफ स्टाइल डिझाईन – हा ४ वर्षाचा शिक्षणक्रम आहे. 10+2 उत्तीर्ण असणे आवश्यक असून, नॅशनल ॲपटीट्युट टेस्ट इन आर्कीटेक्चर परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

इंस्ट्रक्शनल डिझाईन – हा पदव्युत्तर पदविका शिक्षणक्रम आहे. यास प्रवेश घेण्यासाठी पदवी पुर्ण असणे आवश्यक आहे. टाटा स्काय, कॅपीटा, एचडीएफसी, एनआयआयटी, रिलायन्स रिटेल अशा अनेक नामवंत कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते. लायटनींग ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स, ज्वेलरी डिझाईन, डेकोरेटीव्ह प्रोडक्ट ॲण्ड कार्पोरेट गिफ्ट, फाउस होल्ड प्रोडक्ट इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

बॅचलर इन व्हीज्युअल आर्ट – हा ४ वर्षाचा शिक्षणक्रम असून, 10 + 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. लॅग्वेज, कोअर स्टुडीओ कोर्स, कॉन्सीट्युशन ऑफ इंडीया ॲण्ड ह्युमन राईट या विषयांचा समावेश आहे. एशियन पेंट, बीग बजार, वील्स लाईफ स्टाईल, लाईफ स्टाईल, मलबार गोल्ड, इत्यादी नामवंत कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळते.

सिरॅमीक ॲण्ड ग्लास डिझाईन – हा ४ वर्षाचा पदवी शिक्षणक्रम असून, 10+2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. एडिडास, ॲडॉब, व्हीआयपी, ट्रायडन्ट ग्रुप, ओरॅकल, इन्फोसीस, एचपी, तनीक्ष, महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा अशा नामवंत कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होतें.

क्लोथींग प्रोडक्शन टेक्नॉलॉजी – हा एक वर्षाचा शिक्षणक्रम असून 10 + 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. गारमेंट कन्स्ट्रक्शन, पॅटर्न मेकींग, गारमेंट मशीनरी ॲण्ड इक्युपमेंट, प्रोडक्शन प्लानिंग ॲण्ड कंट्रोल, क्वालिटी अशुरन्स, प्रोडक्ट डेव्हलपमेंट ॲण्ड कॉस्टींग हे विषय अभ्यासक्रमात असतात. ॲमेझॉन, लाइफ स्टाइल, ब्लॅकबेरी क्लोथींग या नामांकित कंपन्यात काम करण्याची संधी मिळते.

पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन इन्स्ट्रक्शनल डिझाईन – एक वर्षाचा पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम आहे. या शिक्षणक्रमास प्रवेश घेण्यासाठी पदवी पुर्ण असणे आवश्यक आहे. कॅप जेमीनी, एचडीएफसी, सकाळ, एनआयआयटी, टीसीएस अशा नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

डिझाईन क्षेत्रात विस्तारत असून, अनेक संधी या क्षेत्रात निर्माण होत आहेत. पुढील भागात आपण इंटीरियर डिझाईन क्षेत्राची माहिती घेऊ.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *