_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/02/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%97-%e0%a4%87%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-gig-%e0%a4%95/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-how-to-make-money-online/mhgr_how_to_make_money_online-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee अमली पदार्थांचा घातक विळखा - MH General Resource अमली पदार्थांचा घातक विळखा - MH General Resource

अमली पदार्थांचा घातक विळखा

Spread the love

अमली पदार्थांच्या व्यसनाविरूद्ध ठोस पावले उचलावीत म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सर्वसाधारण सभेत ७ डिसेंबर १९८७ रोजी २६ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ आणि (त्यांची) अवैध वाहतूक विरोधी दिन, मानला जावा असा ठराव पारित झाला. २६ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय अत्याचार विरोधी दिन म्हणूनही मानला जातो. अमली पदार्थांना ठामपणे विरोध ही काळाची अपरिहार्य गरज होती.

Telegram Group Join Now

७०च्या दशकात हिप्पी संस्कृती मूळ धरू लागली होती. गांजा चरस हे अमली पदार्थ या संस्कृतीचा एक आवश्यक हिस्सा बनले होते. हळूहळू एलएसडी या कृत्रिम विभ्रमक अमली पदार्थाचा वापर वाढू लागला होता. दक्षिण अमेरिकेतून मोठ्या प्रमाणावर कोकेन अवैधपणे युरोप आणि अमेरिकेत निर्यात होत होते. भारतातील बिहार आणि बंगालमध्ये उत्तम दर्जाची अफू पिकत असे. तिची चोरटी निर्यात नेपाळ मार्गे चीनला होत असे. अठराव्या शतकात अफू ही शस्त्र बनवून चीन विरुद्धचे युद्ध ब्रिटीशांनी जिंकले होते. ब्रिटीशांनी भारतीय अफूची अनिर्बंध निर्यात चीनला केली. चीनमधील लाखो तरु ण आणि सैनिक अफूचे व्यसनी झाले. मागणी वाढली म्हणून निर्यात वाढली. ब्रिटीशांच्या या कृत्यास उत्तर म्हणून चीनने ब्रिटीशांविरु द्ध युद्ध पुकारले आणि त्यांचा सपशेल प्रभाव झाला. दोघात झालेल्या तहात ब्रिटीशांनी हाँगकाँग ताब्यात घेतले. या अनुभवाने चीन अमली पदार्थाचा कट्टर विरोध करणारे राष्ट्र झाले. त्या नंतर कित्येक वर्षे अमली पदार्थांच्या व्यापाऱ्यांना मृत्युदंड ही सजा देण्यात येऊ लागली.

जर्मनीमध्ये एका संशोधकाने अफूतील वैद्यकीय भाग लक्षात घेऊन हेरॉइन हे वेदनाशामक औषध तयार केले. आणि अफूचे व्यसन करणाऱ्यांना एक सोपा मार्ग दिसला. हेरॉइन ही पांढरी शुभ्र पूड असते. शुद्ध स्वरुपातील हेरॉइन अत्यंत महागडे असल्यामुळे त्यात भेसळ करून, परवडेल असे (?) ड्रग अर्थात गर्द तयार करण्यात येऊ लागले. भारताच्या नैऋत्येला म्यानमार-लाओस-आणि उत्तर थायलंड या डोंगराळ प्रदेशात अफूची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते व तिथे अफूपासून मॉर्फिन ते गर्द बनवणारे रासायनिक कारखाने आहेत. अशा गर्दची तस्करी नेपाळ मार्गे चीनला आणि भारतात होते. त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला म्हणजे भारताच्या वायव्य दिशेला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ही दोन राष्ट्रे अफूच्या पिकांचे मोठे आगरच आहे. तेथून आणि नायजेरिया या आफ्रिकन देशातून हेरॉइन आणि गर्दची निर्यात मोठ्या प्रमाणात युरोपीय देशात आणि अमेरिकेत होते. जेव्हां अमेरिकेतील ड्रग वापराने कळस गाठला तेव्हा चीनच्या अनुमोदनाने संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत २६ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ आणि अवैध वाहतूक विरोधी दिवस म्हणून निश्चित करण्यात आला आणि तेव्हाच आंतरराष्ट्रीय पातळीवर अमली पदार्थांच्या विरोधात युद्ध सुरू झाले.

हे युद्ध दोन पातळ्यांवर एकाच वेळी लढणे आवश्यक होते. एका बाजूला अमली पदार्थांची मागणी कमी करणे आणि दुसऱ्या बाजूला अमली पदार्थांची जी अवैध आयात-निर्यात होते तिला अटकाव करणे. या पैकी पहिला भाग धर्मादाय संस्थांच्या सहकार्याने जनजागरण, व्यसनमुक्ती उपचार आणि व्यसनमुक्त झालेल्या मित्रांची फौज उभी करून व्यसनी व्यक्तींना मदत करणे हा होता. तर शासनाच्या गृह, कायदा आणि न्याय मंत्रालयामार्फत अमली पदार्थ विरोधी संघटना स्थापन करणे, अमली पदार्थांच्या विक्रेत्यांना शोधून, त्यांच्या जवळचे साठे जप्त करून देणे व दोषी व्यक्तींना जास्तीत जास्त सजा कशी होईल हे पाहणे.

ड्रग्ज व्यवहाराला आणखी एक आयाम आहे. त्याच्या विक्रीतून झालेला नफा शस्त्रे खरेदी-विक्रीसाठी होतो. म्हणजेच हा प्रश्न अमली पदार्थांचा दुरुपयोग करणाऱ्या माणसांपर्यंत मर्यादित नसून त्याचा संबंध दहशतवादाशी आहे. त्यामुळे जवळ जवळ प्रत्येक देशाशी संबंधित आहे. म्हणूनच संयुक्त राष्ट्र संघटनेचा एक स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला आहे.

भारतात अमली पदार्थ विरोधी स्वतंत्र कायदा आहे. त्यानुसार ड्रग्ज जवळ बाळगणे, विक्री करणे वाहतूक करणे अशा गुन्ह्यांना सश्रम कारावासाची शिक्षा आहे. शिवाय ड्रग्जची मागणी कमी करण्याचे प्रयोग आणि प्रयत्नही चालू आहेत. सुमारे पाचशे व्यसनमुक्ती केन्द्रांना अनुदान दिले जाते. तेथील डॉक्टर, वॉर्ड-कर्मचारी, आया, पॅरा-मेडिकल कर्मचारी आणि समुपदेशकांना विशेष प्रशिक्षण देण्याची योजना आहे. जनजागरण करण्यास प्रोत्साहन आणि काही प्रमाणात अनुदानही दिले जाते.

संयुक्त राष्ट्र संघाच्या अमली पदार्थ आणि गुन्हेगारी विरोधी जन जागृतीसाठी वेगवेगळ्या सूत्रांची आखणी केली जाते. या मध्यवर्ती संकल्पनेचा संदेश जनजागरण कार्यक्रमातून केला जाणे अपेक्षित असते. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र आणि मुक्तांगण संसाधन आणि प्रशिक्षण केंद्र प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात या जनजागरण कार्यक्रमात सहभागी होतात. एका वर्षी हा संदेश संगीतातून दिला जावा असे मध्यवर्ती सूत्र होते. त्या वर्षी मुक्तांगणने अनिल अवचट रचित गीतांना संगीतकार राहुल रानडे यांनी संगीत देऊन एक खास कार्यक्रम सादर केला. त्यामध्ये पोवाडा, फटका, प्रार्थना आणि व्यसनमुक्तीचे मंत्र अशा अनेक गोष्टींचा समावेश होता. पुढे त्याची कॅसेटही काढली गेली.

मुक्तांगण प्रतिवर्षी सुमारे दीडशे ते दोनशे कार्यक्रम पुणे पोलीस अमली पदार्थ विरोधी पथकाच्या सहकार्याने आयोजित करते. या मोहिमेची सुरुवात स्वयंसेवक आणि शिक्षक यांच्या प्रशिक्षणाने होते. यंदाच्या वर्षी हे प्रशिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, पुणे यांच्या सहयोगाने दिले जाणार आहे. त्याच प्रमाणे विद्यार्थी, तरुण वर्ग तसेच वस्ती पातळीवर व्यसनांच्या वाईट परिणामांबद्दल जपून ठेवावे असे एक माहिती पत्रक दिले जाणार आहे.

संयुक्त राष्ट्र संघातर्फे दिलेले सूत्र आणि बोधचिन्हामध्ये ‘आपण आपल्या जीवनाचा आपल्या समाजाचा आणि आपल्या स्वत्वाचा विकास साधू या अमली पदार्थांशिवाय’ असा संदेश आहे. जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने मुक्तांगण मित्र आणि त्याच्या सर्व सहयोगी संस्था यांनी मिळून यंदा एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. अमली पदार्थ विरोधी संस्थान; गोवा, सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय; केंद्र सरकार, अमली पदार्थ विरोधी पथक; पुणे पोलीस अशा साऱ्यांनी एकत्र येऊन हा संदेश पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. दैनिक लोकमत या उपक्रमाचा मीडिया पार्टनर बनून संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे.

महेंद्र कानिटकर, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणे

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *