_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/05/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/mhgr_barandbench_2024-05_7c1b7d2a-75a6-4c0d-969b-a21eab60066e_supreme_court_of_india__web_page_1600x-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee मानववंश शास्त्र:अमेरिकन इंडियन २ - MH General Resource मानववंश शास्त्र:अमेरिकन इंडियन २ - MH General Resource

मानववंश शास्त्र:अमेरिकन इंडियन २

American Indian

ख्रि. पू. १३०० च्या सुमारास मातीच्या मातृकामूर्ती तयार करण्यात येत असत. काही मूर्ती विविध प्रकारच्या शिरोभूषणांनी सजविलेल्या आढळतात. दगडावर कोरलेल्या व  कापडावर विणून तयार केलेल्या चित्रलिपीतील इंडियनांचे लेखन अमेरिकेतील काही संग्रहालयांत आजही जतन करून ठेवलेले आहे. इंडियनांनी लाकडी कोरीव काम, दगडी वास्तुरचना व चित्रकला यांचाही विकास घडवून आणलेला दिसतो.

Telegram Group Join Now

माया संस्कृती ऐन भरात येण्यापूर्वी मेक्सिको, पेरू आणि बोलिव्हिया येथील रहिवाशांनी जी नगरे वसविली, त्यांतील घरे रंगीबेरंगी असत. काही घरांसमोर लाकडी अगर दगडी स्तंभ असून त्यांवर उत्कृष्ट रीतीने गणचिन्ह कोरलेले असे. त्या नमुन्यानुसार तयार केलेल्या काठ्या एक प्रतिष्ठाप्रतीक म्हणून आजही हौशी प्रवासी लोक खरेदी करतात.

माया-खगोलशास्त्रज्ञांनी पंचांग-पद्धतीचा व शून्याचा शोध लावला, असे एक मत आहे. अशा शोधानंतर इंडियन लोक सूर्यढालीची पूजा करू लागले असावेत. ही ढाल दगडी असून तिच्यावर सुंदर कोरीव काम असे. इजिप्शियन लोकांच्या पिरॅमिडप्रमाणे (पण वर सपाट असे) असलेल्या आपल्या सूर्यमंदिराची उभारणी त्या लोकांनी केली. प्‍वेब्‍लो जमातीच्या चोलुला गावी ईजिप्तमधील कूफूच्या पिरॅमिडपेक्षा अधिक भव्य मंदिर रचलेले असून, त्यात त्यांच्या धर्मकल्पनेचे प्रतीक असलेल्या फुलपाखराचे एक भित्तिचित्र रंगवलेले आहे. काते-झाल को-अत्ल (Quet-Zal-Co-atl) या तुरा असलेल्या त्यांच्या नागदेवाचे चित्रही तेथे आढळते. तिओ-ती-हु-आकान ह्या जमातीच्या प्रमुख शहरी असलेले सूर्यमंदिर प्रसिद्ध आहे. या देवळाचा परिसर    २·५० x ३·५० किमी.चा असून तो सर्प, अन्य प्राणी, स्वर्गीय अप्सरा व गंधर्व ह्यांच्या आकृतींनी सुशोभित केलेला आहे. इंडियन लोकांच्या अ‍ॅझटेक, प्‍वेब्‍लो, होपी, नव्हाहो अशा वेगवेगळ्या जमाती प्रसिद्ध आहेत. लढाईत पराभवझालेल्याने द्यावयाचे खंडणीपत्र व लढाईतील हत्यारे, विशेषतः गरुडपिसांनी मढवलेली ढाल, हे त्यांच्या उत्कृष्ट कलेचे नमुनेच समजले जातात. लोकरीपासून विणलेल्या रंगीबेरंगी घोंगड्यांच्या स्वरूपात खंडणी द्यावी लागे. त्यास पुरवणी म्हणून पिसांच्या टोप्या, मण्यांच्या माळा, लढवय्यांचे कपडे वगैरे वस्तू द्याव्या लागत. सोन्याच्या मण्यांनी मढवलेले हिरव्या, निळ्या व पिवळ्या पिसांचे राजमुकुट, अग्निदेवतेचे चिन्ह (कोल्हा) असलेली आणि शुद्ध सोन्याचे नक्षीकाम केलेली दरबारी ढाल हे त्यांच्या कलाकुसरीचे उत्तम नमुने समजले जात. प्‍वेब्‍लोंची उत्तर अ‍ॅरिझोनातील बेटाटकीन दरीतील, तेराव्या शतकात त्याग केलेली पहाडघरे ही त्यांच्या कौशल्याची आजही साक्ष देतात. पेरूच्या दक्षिण भागातील पराका आणि नास्का जमातींनी लामा व व्हिकुना जातीच्या जनावरांच्या केसांपासून तयार केलेले जाळीदार, चमकदार जरतारी कापड श्रेष्ठ दर्जाचे समजले जाते. इंडियन जमाती चित्रविचित्र स्वरूपाचे पेहराव धारण करीत.

इंडियन लोकांनी १४९२ ते १७७८ च्या दरम्यान निर्माण केलेल्या कलेस, ‘प्रागैतिहासिक कला’ असे संबोधण्यात येते. ह्या कलेचे उत्तमोत्तम नमुने अ‍ॅरिझोना, कोलोरॅडो, न्यू मेक्सिको, ओक्लाहोमा, अ‍ॅलाबॅमा, जॉर्जिया, फ्लॉरिडा आणि ओहायओ या राज्यांत अद्यापही विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. प्‍लेब्‍लो शेतकरी, नव्हाहो धनगर, अ‍ॅपालॅचिअन गिरिजन, वायव्येकडील वाळवंटातील लोक, अतिपश्चिमेकडील धान्य गोळा करणारे लोक, सपाटीवरील शिकारी, पूर्वेकडील लाकूडतोडे, वायव्येकडील कोळी आणि आर्क्टिक प्रदेशा- तील एस्किमो ह्या सर्वांच्या कलाकृतींचा प्रागैतिहासिक कलेत समावेश करण्यात येतो. भौगोलिक, सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा बरावाईट परिणाम त्यांच्या कलाकृतींवर झालेला दिसून येतो.

इंडियन लोकांच्या कलेचा शोध सोळाव्या शतकात प्रथम दक्षिण कॅलिफोर्नियात लागला. तेथील जमातींची घाटदार भांडी संगजिऱ्याच्या जातीतील दगडांपासून (सोपस्टोन) घडविलेली असत. वीणकाम, मूर्तिकला आणि वास्तुकला ह्यांतही त्यांची प्रगती झालेली होती. प्रथम त्यांनी लाकडावरील कोरीव कामास प्राधान्य दिले; परंतु दमट हवेमुळे त्या कलाकृती अल्पायुषी ठरू लागल्या. दमट हवामानामुळे दगड, शिंगे, शिंपले व जनावरांची हाडे ह्यांचा हत्यारे बनविण्यासाठी जास्त प्रमाणात उपयोग करावयास त्यांनी सुरुवात केली. मच्छीमारीची आयुधे, ढोलाच्या टिपऱ्या, दंडुके इ. वॉलरसच्या दातापासून करीत असत. भांड्यांचे विविध आकार, त्यांवरील कोरलेले अगर रंगविलेले आकर्षक आकृतिबंध, तसेच ताम्रपत्रावरील कोरीव काम हीदेखील त्यांची उल्लेखनीय कलानिर्मिती आहे.

इंडियनांच्या मूर्तिकलेतील पुढील वस्तू उल्लेखनीय आहेत : (१) मेन येथील खोबण असलेल्या कुर्‍हाडी, दातेदार औते व भाल्यांची टोके, (२) ओहायओ आणि व्हर्जिनियामधील मातीच्या ढिगाच्या खाली सापडलेले दगडी नळ, (३) अभ्रकाचे व तांब्याचे दागिने, (४) केंटकीमधील मानवाचा दगडी चेहरा, (५) टेनेसी व आरकॅन्सॉमधील सचित्र भांडी व बरण्या, (६) ओक्लाहोमामधील लाकडी मुखवटे, (७) अ‍ॅलाबॅमामधील चुनखडीची भांडी, (८) लुईझिअॅनामधील भांडी व मातीच्या बाटल्या, (९) केमार्को येथील लाकडी मूर्ती, मगरीचे तोंड व हरिणासारखे मुखवटे. ह्यांखेरीज प्‍वेब्‍लो जमातीने सभारंभासाठी बांधलेल्या सभामंडपातील भव्य भित्तिचित्रे, डोंगरातील दगडी कपारींवर व भिंतींवर काढलेली व्दिमितिचित्रे ही महत्त्वाची आहेत. चित्रलिपीत लेख कोरण्यापर्यंत त्यांनी मजल मारली होती. नंतरच्या काळात गच्चीची घरे आणि सु. एक हजार कुटुंबे एकत्र राहू शकतील अशी अनेक दालने असलेली समूहगृहेही त्यांनी बांधली.

इंडियन लोकांच्या कलेचा आविष्कार नैमित्तिक स्वरूपाच्या चित्रकलेत झालेला आढळतो. उदा., रांगोळीसारख्या असलेल्या वालुकाचित्रांतील त्यांचे नैपुण्य अतुलनीय असे. त्यातील आकृतिबंध, रंगांची योजना व रेखीवपणा साधण्याचे कौशल्य प्रशंसनीय होते. अशा चित्रांतून देव, भूत-पिशाच्च आणि तीर्थस्थाने यांची प्रतीके म्हणून ते रंगीत दगडांचा उपयोग करीत. धार्मिक समारंभप्रसंगी मानवाकृतींच्या व अन्य विषयांच्या केलेल्या शैलीपूर्ण चित्रणात पूर्वसंयोजन व रंगांचा कौशल्यपूर्वक उपयोग केलेला दिसतो. सूर्यास्तानंतर ह्या चित्राकृती अस्तित्वात राहू नयेत, असा संकेत होता.

इंडियन कलेमागील प्रमुख प्रेरणा धार्मिक होती. आदिम जमातीच्या धार्मिक विचारांत जादूटोण्याला महत्त्व असल्याने त्याचाही प्रभाव त्यांच्या कलानिर्मितीवर झालेला दिसून येतो. सौंदर्यदृष्टी ही अर्थातच त्यांच्या कलेच्या मुळाशी होतीच; त्याबरोबरच इंडियनांना कलानिर्मितीची अनिवार हौसही होती. गोऱ्या लोकांशी संपर्क येण्यापूर्वीच इंडियनांनी निर्माण केलेल्या कलेत विचारपूर्वक योजना, अनेकविध आकृतिबंध, भिन्न कलामाध्यमे, रंगसौंदर्य यांसारख्या गुणांनी संपन्न असलेले वैविध्य व वैपुल्य आढळते.

इंडियनांचे प्रशासन : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील अमेरिकन इंडियनांचे प्रशासन गृहखात्यातील इंडियन विभागातर्फे करण्यात येते. हा विभाग इंडियनांच्या सु. २,२४,००० चौ.किमी. जमिनीचे विश्वस्त म्हणून काम बघतो. तसेच या जमिनीचे भाडे सरासरी १० कोटी डॉलर्स येते. याचाही उपयोग इंडियनांचे शिक्षण, आरोग्य, शेतीसुधारणा इ. कार्यासाठी करण्यात येतो. इंडियनांनी आपले प्रशासन स्वतःच करावे, ह्या दृष्टीने प्रयत्‍न चालू आहेत.

१९२४ च्या कायद्यान्वये सर्व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे नागरिक झाले. त्याचबरोबर त्यांची पूर्वापार चालत आलेली जमिनीची मालकी कायम राहिली. असे असले तरी १८८७ ते १९३३ या काळात सरकारी धोरणामुळे इंडियनांच्या सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक जीवनाचा ऱ्हास झाला. आरोग्य, शिक्षण व इतर बाबतींत इंडियनांची १९३४ च्या रिऑर्गनायझेशन अ‍ॅक्टनंतर मात्र बरीच सुधारणा झाली. ते अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या वतीने दुसऱ्या महायुद्धात लढले व त्यांनी बरीच मानाची पदके मिळविली. रूझवेल्टने स्वतःच्या कारकीर्दीत इंडियनांच्या शेतीविषयक समस्याकडे सहानुभूतीने लक्ष दिले. आयझनहौअरच्या काळात ‘इंडियनांनी स्वतःचे प्रशासन केंद्रसत्तेच्या मदतीशिवाय स्वतःच करावे’ या धोरणावर भर देण्यात आला. जॉन केनेडीने १९६१ साली प्रथमच इंडियन खात्याचा आयुक्त म्हणून एका मानवशास्त्रज्ञाची नेमणूक केली. तेव्हापासून इंडियनांच्या विकासावर जास्त भर देण्यात येत आहे.

हल्ली ‘अमेरिकन-इंडियन कोणास म्हणावे?’ असा प्रश्न उपस्थित होतो. आजच्या अमेरिकन इंडियनांत शिकारी टोळ्या आहेत; तसेच आधुनिकीकरण झालेले सुशिक्षित इंडियनही आहेत. कॅनडात १,८५,००० इंडियन आहेत; तेथे ज्या व्यक्तीचा पिता इंडियन असेल, त्यास इंडियन समजण्यात येते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत, एक चतुर्थांश इंडियन रक्त असलेल्यास अमेरिकन इंडियन समजण्यात येते. तेथे ५,२३,००० अमेरिकन-इंडियन आहेत. लॅटिन अमेरिकेत सरासरी दोन कोटी शुद्ध रक्ताचे अमेरिकन इंडियन आहेत. मिश्र पालकत्व असलेले लक्षावधी इंडियन आहेत. बोलिव्हिया, एक्वादोर, ग्वातेमाला, मेक्सिको व पेरू देशांत अर्धीअधिक लोकसंख्या इंडियनांची आहे. अजूनही मिश्र इंडियन दारिद्र्यामुळे व शिक्षणाच्या अभावी अविकसित राहिलेले आहेत. यूनोच्या मदतीने अमेरिकन इंडियनांचा विकास करण्याचे प्रयत्‍न चालू आहेत.

संदर्भ : 1. Colliers, John, Indian of the Americas, New York, 1947.

2. Driver, Harold, E. The Americas on the Eve of Discovery, New Jersey, 1964.

3. Editors of American Heritage, Book of Indians, London, 1968.

4. Editors of Life, The Epic of Man, New York, 1962.

5. Farb, Peter, Man’s Rise to Civilization . . . Industrial State, London, 1969.

6. Hynt, W. Ben,Indian Crafts and Lore, New York, 1965.

लेखक : रामचंद्र मुटाटकर ,गो. वि. चांदवडकर

Related Posts

CAA Act

MHGR| News Update| CAA कायदा काय म्हणतो?

CAA Act

LGBTQ

MHGR| समान विवाहासाठी भारतातील LGBTQ+ प्रचारकांसाठी लढा

LGBTQ+

ISM office V6

MHGR| ISM office V6 software download for Windows 10

ISM office V6

What is a Domicile Certificate in Marathi

What is a Domicile Certificate in Marathi : अधिवास प्रमाणपत्र हे अधिकृत दस्तऐवज आहे जे भारतातील विशिष्ट राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात एखाद्या व्यक्तीच्या निवासी स्थितीचे प्रमाणीकरण करते….

MHGR| महाराष्ट्र शासनाचा करार सूचीबद्ध आयटी कंपनी | Job Vacancy in Aksentt Tech in Mumbai

Government of Maharashtra Contract Listed Company: Aksentt Tech ही टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर सेवा प्रदाता आहे जी मोबाईल आणि फिक्स्ड टेलिकम्युनिकेशन नेटवर्क दोन्हीसाठी पायाभूत सुविधा रोलआउट सोल्यूशन्स ऑफर करते. सेवा…

MHGR| ई-पीक पहाणी प्रकल्प, महाराष्ट्र राज्य

आता पीक विमा आणि कृषी पतपुरवठा अधिक सुलभ होणार मोबाईलवरुन पीक पहाणी करणे आणि मार्गदर्शिका Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *