_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/05/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/mhgr_barandbench_2024-05_7c1b7d2a-75a6-4c0d-969b-a21eab60066e_supreme_court_of_india__web_page_1600x-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee उधमसिंग (Udham Singh) कोण होते? - MH General Resource उधमसिंग (Udham Singh) कोण होते? - MH General Resource

उधमसिंग (Udham Singh) कोण होते?

Udham Singh

उधमसिंग : (२६ डिसेंबर १८९९–३१ जुलै १९४०). प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक. बालपणीचे नाव शेरसिंग. त्यांचा जन्म पंजाब राज्यातील संगरुर जिल्ह्यातील सुनाम या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव चुहडराम आणि आईचे नाव नारायणी होते. गुरुद्वारामध्ये शीख धर्माचा स्वीकार केल्यानंतर चुहडराम यांचे नाव तहलसिंग, तर आईचे नाव नारायणी कौर असे झाले. वडील तहलसिंह हे जवळच्याच एका खेडे गावात रेल्वे क्रॉसिंगवर पहारेकरी म्हणून नोकरीस होते. उधमसिंग यांच्या लहानपणीच आई–वडिलांचे निधन झाले (१९०१; १९०७). त्यामुळे मोठे भाऊ मुक्तासिंग यांच्यासह ते अमृतसरच्या पुतलीघर येथील सेंट्रल खालसा अनाथाश्रमात दाखल झाले (१९०७). तेथे त्यांनी शीख धर्म स्वीकारला आणि शेरसिंगचा उधमसिंग, तर भाऊ मुक्तासिंग हा साधूसिंग झाला. पुढे साधूसिंग मरण पावला (१९१७). उधमसिंग मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यांनी अनाथाश्रम सोडले (१९१८).

Telegram Group Join Now

पंजाबच्या दोन स्थानिक नेत्यांना अटक झाल्याने लोकांनी नगरभवन (टाउन हॉल) आणि डाकघरांवर हल्ला केला (१० एप्रिल १९१९). शहरातील व्यवस्था विस्कळीत झाल्याने सैन्याला बोलावून सर्व शहराची व्यवस्था लावण्याची जबाबदारी ब्रिगेडिअर जनरल एडवर्ड हॅरी डायर याच्याकडे सोपविण्यात आली. त्याने सार्वजनिक सभा आणि जमाव बंदी लादली. १३ एप्रिल १९१९ रोजी वैशाखीच्या दिवशीच रौलट कायद्याविरुद्धच्या म. गांधींच्या सत्याग्रहास प्रतिसाद देण्यासाठी मोठा जमाव हा जालियनवाला बाग येथे सार्वजनिक सभेकरिता जमला. आदेशाचे उल्लंघन केले म्हणून जनरल डायर संतापला आणि त्याने सैनिकांना संपूर्ण निःशस्त्र जमावावर गोळीबार करण्याचा आदेश दिला. जवळजवळ दहा मिनिटे तेथे गोळीबार सुरूच राहिला. कुठलीही पूर्वसूचना न देता हा गोळीबार करण्यात आला. आजूबाजूला मोठ्या भिंती आणि मुख्य वाट अडवली गेल्याने यात असंख्य लोक मारले गेले. शासकीय अंदाजानुसार ३७९ लोक मेले. अर्थात याहून जास्त लोक म्हणजे अंदाजे १००० लोक मेले व २५०० जखमी झाले. डायरच्या या निर्घृण कृत्याचे तत्कालीन पंजाब इलाख्याचा लेफ्टनंट गव्हर्नर सर मायकेल ओड्वायर याने समर्थन केले. या हत्याकांडाची चौकशी करणाऱ्या हंटर समितीनेही ओड्वायर याला दोषमुक्त ठरविले; तर जनरल डायरला अतिशय जुजबी शिक्षा म्हणजे सक्तीची सेवानिवृत्ती देऊन आणि निवृत्तीवेतन नाकारण्यात आले. याउलट भारतीय इंग्रज लोकांनी घसघशीत रक्कम जमवून त्याला सप्रेम भेट दिली. ही घटना जेवढी राष्ट्रीय आंदोलनास कलाटणी देणारी होती; तेवढीच ती उधमसिंग यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.

जालियनवाला हत्याकांडामुळे उधमसिंग स्वातंत्र्यलढ्यात सामील झाले. सुरुवातीच्या काळात ते अमेरिकेतील भारतीयांनी सुरू केलेल्या गदर चळवळीत सहभागी झाले. अमेरिकेत येण्यापूर्वी ते मजूर म्हणून काम करीत होते. काही काळ त्यांनी डेट्रॉइटमधील फोर्डच्या कारखान्यात एक साधन निर्माता म्हणूनही काम केले. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये असताना त्यांनी गदर पक्षाच्या सदस्यांची भेट घेतली. या निमित्ताने त्यांनी अमेरिकेत मोठा प्रवासही केला. क्रांतिकारक भगतसिंग यांच्याबद्दल त्यांना आदर होता. भगतसिंग यांच्या सूचनेनुसार ते भारतात परतले (१९२७). पंजाबमध्ये त्यांनी गदर पार्टीच्या गदर-दि-गुंज ही पत्रिका प्रकाशित करण्यास पुढाकार घेतला. पुढे बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली; तथापि चार वर्षांनंतर त्यांची सुटका करण्यात आली (२३ ऑक्टोबर १९३१). या दरम्यान जनरल डायरचा मृत्यू झाला. भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फाशी देण्यात आली होती. तुरुंगातील सुटकेनंतर उधमसिंग आपल्या गावी परतले, परंतु ब्रिटिश पोलिस सतत त्यांच्यावर नजर ठेवून होते. कारण भगतसिंग व इतर क्रांतिकारकांनी स्थापन केलेल्या हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनशी त्यांचा जवळचा संबंध होता. पुढे त्यांनी मोहम्मदसिंग आझाद असे नाव धारण करून आपले क्रांतिकार्य सुरू ठेवले. जालियनवाला हत्याकांडाचा बदला घेण्याचा त्यांचा निर्धार होता. त्याकरिता पैसे जमवून पुढे ते शिक्षणाच्या व व्यवसायाच्या निमित्ताने इंग्लंडला गेले. लंडनमध्ये त्यांनी सुतार, चिन्हफलक (साइन बोर्ड) रंगकाम, मोटर कारागीर, तसेच दोन चित्रपटांत मदतनीस अशी विविध कामे केली.

ओड्वायर लंडनच्या कॅक्स्टन सभागृहात सेंट्रल एशियन सोसायटी (आताची रॉयल सोसायटी फॉर एशियन अफेयर्स) आणि ईस्ट इंडिया असोसिएशनच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार असल्याचे उधमसिंग यांना कळले (१३ मार्च १९४०). एका सैनिकाकडून बंदूक घेऊन त्यांनी आपल्या जॅकिटच्या खिशात लपवून सभागृहात प्रवेश केला आणि व्यासपीठाजवळ जाऊन ओड्वायरवर गोळ्या झाडल्या. त्यात ओड्वायर ठार झाला. गोळीबारानंतर उधमसिंग यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ओड्वायर यांच्या हत्येचा आरोप ठेवून त्यांना लंडनच्या पेंटोनविले कारागृहात फाशी देण्यात आली.

संदर्भ :

  • Maighowalia, B. S. Sardar Udham Singh, Chhabra Printing Press, Amritsar, 1969.
  • Singh, Navtej, Challenge To Imperial Hegemony : The Life Story Of A Great Indian Patriot Udham Sing, Punjab University, Patiala,1998.
  • Singh, Sikandar, The Trial of Udham Singh, Unistar Books, Amritsar, 2008.
  • सिंह, रामपाल; देवी, बिमला, महान क्रांतिकारी शहीद उधम सिंह, नई दिल्ली, २००९.

Related Posts

CAA Act

MHGR| News Update| CAA कायदा काय म्हणतो?

CAA Act

LGBTQ

MHGR| समान विवाहासाठी भारतातील LGBTQ+ प्रचारकांसाठी लढा

LGBTQ+

ISM office V6

MHGR| ISM office V6 software download for Windows 10

ISM office V6

What is a Domicile Certificate in Marathi

What is a Domicile Certificate in Marathi : अधिवास प्रमाणपत्र हे अधिकृत दस्तऐवज आहे जे भारतातील विशिष्ट राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात एखाद्या व्यक्तीच्या निवासी स्थितीचे प्रमाणीकरण करते….

MHGR| महाराष्ट्र शासनाचा करार सूचीबद्ध आयटी कंपनी | Job Vacancy in Aksentt Tech in Mumbai

Government of Maharashtra Contract Listed Company: Aksentt Tech ही टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर सेवा प्रदाता आहे जी मोबाईल आणि फिक्स्ड टेलिकम्युनिकेशन नेटवर्क दोन्हीसाठी पायाभूत सुविधा रोलआउट सोल्यूशन्स ऑफर करते. सेवा…

MHGR| ई-पीक पहाणी प्रकल्प, महाराष्ट्र राज्य

आता पीक विमा आणि कृषी पतपुरवठा अधिक सुलभ होणार मोबाईलवरुन पीक पहाणी करणे आणि मार्गदर्शिका Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *