- प्रस्तावना
- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेची उद्दिष्टे
- मूल्य आणि दृष्टीकोन
- म.रा.ए.नि.सं चा दृष्टीकोन
- मार्गदर्शक तत्त्व
- ध्येय आणि उद्दिष्टे
प्रस्तावना
महाराष्ट्र हे १०० दशलक्ष लोकसंख्येचे आणि ३.०८ स्क्वे. कि. मी. चा विस्तार असलेले भारतातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे. आपल्या ग्रामीण आणि शहरी भागातील पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महाराष्ट्र आरोग्य सुविधा देण्याच्या बाबतीत संपूर्ण जगात आघाडीवर राहिले आहे. ह्या साऱ्यां सुविधांकडून भारत सरकारने आरोग्य योजनांच्या संदर्भात दिलेले मापदंड पूर्ण केले जातात. ग्रामीण व शहरी भागातील सेवांच्या ह्या विस्तृत जाळ्यामुळे एक प्रोत्साहक, उपकारात्मक आणि पुनर्वसाना संबंधीचे एक मोठे पेकेज दिले गेले आहे. १९८६ मध्ये मुंबईतून एड्सची पहिली केस दाखल झाली. राज्यभरात एच आय व्ही सेवांच्या एका परिणामकारक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमुले राज्यातल्या एपिडेमिओल्जिकल स्थितीची कल्पना आली.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेची उद्दिष्टे
(अ) एच आय व्ही व एड्सचे उच्चाटन (ब) कर्मचारी व त्यांच्या कुटुंबावर एच आय व्ही व एड्सच्या होणार्या परिणामांचे व्यवस्थापन व निर्मूलन. (क) एच आय व्ही व एड्सच्या बाधित कर्मचार्यांची काळजी व त्याना आधार. (ड) कार्याच्या ठिकाणी व रोजगाराच्या वेळी खर्या व समजल्या गेलेल्या एच आय व्ही च्या स्थितीवर आधारित कलांकांचे उन्मूलन.
मूल्य आणि दृष्टीकोन
भारतातील प्रत्येक एचआयव्हीबाधित व्यक्तीला दर्जात्मक उपचार मिळतील आणि तेही प्रतिष्ठेने मिळतील, असे वातावरण निर्माण झाले पाहिजे, अशीMSACS ची दृष्टी आहे. एचआयव्ही/एड्स बाधितांवर उपचार, प्रतिबंध आणि त्यांना आधार देण्याचे काम मानवी हक्कांचे संरक्षण होईल अशा वातावरणात शक्य आहे. एचआयव्हीबाधित व्यक्ती कुचंबणेशिवाय, कलंकाशिवाय सन्मानाने जगू शकली पाहिजे. एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींना समानतेने सर्व आरोग्यसुविधा उपलब्ध असल्या पाहिजेत यासाठी MSACS च्या वतीने उपाययोजना करण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, विश्वासू संस्था, एचआयव्हीबाधित लोकांचे नेटवर्क आणि गट यांच्या सहकार्याने आरोग्यसुविधा उपलब्ध करून देणे तसेच जबाबदार सेवा वाढवण्याची MSACS आशा करीत आहे. एचआयव्हीबाधित व्यक्तींनी या आजाराला समर्थपणे सामोरे जावे यासाठी राज्यपातळीवर, जिल्हा पातळीवर आणि तळागाळातदेखील आश्वासक वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. MSACS च्या माध्यमातून अशाप्रकारे सर्व स्तरातील लोकांपर्यंत योग्य संदेश पोचवत भारतात एचआयव्हीच्या प्रसाराला लगाम घालण्यासाठी आम्ही बांधील आहोत. लोकांपर्यंत एचआयव्हीबाबतची संपूर्ण, अचूक आणि सतत माहिती पुरवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचबरोबर सुरक्षेसाठी कंडोमचा वापर करण्याबाबतचा प्रसार आणि लैंगिक संबंधांतून पसरणाऱ्या आजारांवरील उपचार यासाठी देखील आम्ही प्रयत्न करतो. स्त्री- पुरुषांची लैंगिक संबंधांबाबतची वागणूक जबाबदार असावी, यासाठी MSACS काम करीत आहे. माहिती आणि ज्ञानातून लोकांना जागरुक, सतर्क, सिद्ध आणि सबल केल्यास ते एचआयव्हीपासून स्वतःचा बचाव करू शकतील, यावर आमचा विश्वास आहे. एचआयव्हीची लागण आपल्यापैकी कुणालाही होऊ शकते या सत्याशी आम्ही मुकाबला करतो. योग्य माहिती आणि प्रतिबंध यामधून आपण कुणाचाही बचाव करू शकतो, अशी आमची आशा आहे. काळजी घेणे आणि आधार देणे या पायांवर MSACS उभे आहे. भारतातील एचआयव्ही/एड्सविरोधात लढाईसाठी सतत पाठपुरावा करत राहण्याचा आमचा निर्धार आहे
म.रा.ए.नि.सं चा दृष्टीकोन
- सर्वसमावेशक संवादातून विविध लोकांपर्यंत पोचणे
- अनुभवाधारित आराखडा असलेला राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम राबवणे
- एचआयव्ही/एड्सचा प्रसार आणि प्रादुर्भाव याबाबत नियमित पारदर्शी अंदाज देणे
- एचआयव्ही/एड्स पासून सुरक्षित असा भारत उभारणे
- सहकार्यातून विकास साधणे
- देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत एचआयव्ही बाबत माहिती पोचविणे आणि त्यासोबतचा कलंक – भेदभाव पुसून टाकणे
- असा भारत जिथे प्रत्येक एचआयव्ही बाधित गरोदरस्त्री एचआयव्हीमुक्त बालकाला जन्म देऊ शकेल
- असा भारत जिथे प्रत्येक व्यक्तीला समुपदेशन आणि तपासणी केंद्र उपलब्ध असेल
- असा भारत जिथे एचआयव्ही सह जगणाऱ्या व्यक्तीला प्रतिष्ठेसह आणि दर्जात्मक उपचार मिळतील
- असा भारत जिथे प्रत्येक व्यक्ती प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने निरोगी आणि सुरक्षित आयुष्य जगेल
- असा भारत जिथे एचआयव्हीची लागण होण्याची शक्यता असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचता येईल आणि त्याची माहिती उपलब्ध असेल
मार्गदर्शक तत्त्व
म.रा.ए.नि.सं चे लक्ष्य, उद्देश आणि कार्यपद्धती खालील मार्गदर्शक तत्त्वांनुसार ठरली आहे
- तीन एकात्म गोष्टींचा मिलाप – एकात्मिक मान्यताप्राप्त कार्य आराखडा, एकात्मिक राष्ट्रीय एचआयव्ही/एड्स समन्वय प्राधिकरण आणि एकात्मिक राष्ट्रीय अधिकार आणि मूल्यांकन प्रणाली
- एड्स प्रतिबंध आणि त्याचा दुष्परिणाम कमी करणे अशा दोनही बाबतीत समानतेची भावना जोपासावी. म्हणजेच सेवांचा उपयोग करून घेणाऱ्या लोकांचे वय आणि लिंग यानुसार वर्गीकरण करून तशी समानता साधली पाहिजे.
- एचआयव्ही- एड्स सोबत जगणाऱ्या लोकांना आदराने वागवावे, कारण एचआयव्ही प्रसारावर अंकुश आणि एड्सनियंत्रण या कामात त्यामुळे चांगाला फायदा होतो. NACP च्या तिसऱ्या टप्प्यात एचआयव्ही एड्स संबंधी मानवी हक्कांची जपणूक कशी करावी याचा ऊहापोह झाला आहे. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा एचआयव्ही-एड्ससोबत जगणाऱ्या व्यक्तींच्या मूलभूत अधिकारांचा आहे. एचआयव्हीला प्रतिबंध, उपचार, आधार आणि काळजीसंदर्भातील कामांमध्ये या व्यक्तींना सामावून घेणे महत्त्वाचे आहे.
- एड्स नियंत्रण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये समाजाचे प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. त्यांच्या सहभागाशिवाय या कार्यक्रमाला सामाजिक अधिष्ठान मिळणार नाही.
कार्यक्रम पद्धती आणि कामाची आखणी प्रत्यक्षदर्शी असावी. ज्यातून उद्दीष्टपूर्ती होऊ शकेल अशी नाविन्यपूर्ण आणि लवचिक असावी. ठराविक स्थानिक परिस्थितीनुसार प्राधान्यक्रम गृहित आहे.
ध्येय आणि उद्दिष्टे
राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमातील तिसऱ्या टप्प्याचा (NACP III) मुख्य उद्देश – येत्या पाच वर्षात देशभरातील एचआयव्ही-एड्सची साथ थांबवून त्यावर नियंत्रण ठेवणे हा आहे. सर्वसमावेशक प्रतिबंधात्मक उपाय, रुग्णांची काळजी, त्यांना आधार देणे आणि उपचार करणे याद्बारे हे उद्दीष्ट साध्य करण्यात येईल. त्यासाठी चार प्रदीर्घ कार्यपद्धती अनुसरण्यात येतील.
- लागण होण्याचा सर्वाधिक धोका असणाऱ्या गटाबरोबर थेट मध्यस्थी करून संवाद साधणे आणि सर्वसाधारण लोकांबरोबरचा संवाद वाढवणे
- एचआयव्ही –एड्ससोबत जगणाऱ्या व्यक्तींना अधिकाधिक उपचार, आधार पुरवणे व त्यांची काळजी घेणे
- जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील प्रतिबंध- काळजी-आधार –उपचार सेवा देणारी यंत्रणा अधिक बळकट करणे. सुविधा आणि मनुष्यबळ वाढवणे
- देशभरातील माहिती व्यवस्थापन यंत्रणा बळकट करणे
महत्त्वाचे उद्दीष्ट म्हणजे – ज्या राज्यांमध्ये एड्सचा सर्वाधिक प्रादूर्भाव आहे, अशा राज्यांमध्ये कार्यक्रमाच्या पहिल्या वर्षात लागणीचे प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा कमी करून साथ आटोक्यात आणणे. तसेच जी राज्य धोकादायक पातळी गाठू शकतात अशा राज्यांमध्ये हे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत कमी करून साथ नियंत्रणात ठेवणे.