_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/02/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%97-%e0%a4%87%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-gig-%e0%a4%95/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-how-to-make-money-online/mhgr_how_to_make_money_online-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee कारवाईयोग्य दावा - MH General Resource कारवाईयोग्य दावा - MH General Resource

कारवाईयोग्य दावा

Spread the love

न्यायालयात जाऊनच फलित करुन घ्यावा लागतो,अशा अमूर्त अधिकाराला कारवाईयोग्य दावा म्हणतात. इंग्लिश विधीमध्ये जंगम संपत्तीचे दोन प्रकार आहेत. ताब्यात असलेली संपत्ती आणि ताब्यात नसल्यामुळे न्यायालयातून मिळवणे अवश्य असलेली संपत्ती. दुसऱ्या प्रकारामध्ये ऋणे, संविदेचा लाभ त्याचप्रमाणे एकस्व आदी अमूर्त अधिकारांचाही अंतर्भाव होतो.भारतामध्ये १८८२ च्या संपत्ती–हस्तांतरण विधीमधील कारवाईयोग्य दाव्याची व्याख्या १९०० साली दुरुस्त करण्यात आली. त्याप्रमाणे दावा देण्यास आधारभूत असल्याबद्दल न्यायालयाची मान्यता असलेल्या अप्रतिभूत ऋणाबद्दलच्या किंवा कबजात नसलेल्या जंगम संपत्तीतील हितसंबंधाबद्दलच्या दाव्यास कारवाईयोग्य दावा मानण्यात येते. विघटित भागीदारीचा हिशेब मागणे; संविदेप्रमाणे उत्पन्न होणाऱ्या लाभातील संपूर्ण हितसंबंध इ. बाबतचे दावे कारवाईयोग्य दावे होत. कारवाईयोग्य दावा अभिहस्तांकनकर्त्याच्या लेखाने अभिहस्तांकित करता येतो. या अभिहस्तांकनपद्धतीला वचनचिठी, धनादेश इ. परक्राम्य लेख अपवाद आहेत. ते फक्त पृष्ठांकनाने हस्तांतरित करता येतात. अग्निविमा व सागरी विमा यांचे हस्तांतरण केवळ विमापत्राच्या अभिहस्तांकनाने होत नसून त्याबरोबर विमासंपत्तीही द्यावी लागते.

Telegram Group Join Now

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *