_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/05/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/mhgr_barandbench_2024-05_7c1b7d2a-75a6-4c0d-969b-a21eab60066e_supreme_court_of_india__web_page_1600x-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना - MH General Resource गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना - MH General Resource

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

 शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, विज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे इ.नैसर्गिक आपत्तीमूळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, यामुळे बरेच शेतकरी यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तिस  तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यास झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकरी/ त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता ही योजना सुरु करण्यात आलेली आहे.  

Telegram Group Join Now

1. पात्रता – : 

महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य (आई,वडिल, शेतक-याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी, सून, अन्य कायदेशीर वारसदार यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकुण दोन जण.      

2. नुकसान भरपाईची रक्कम – :             

अ.   अपघाती मृत्यू- रु.2 लाख.

ब.  अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात  

     किंवा एक पाय निकामी होणे- रु.2 लाख                                                       

क.   अपघातामुळे 1 डोळा अथवा 1 हात किंवा एक पाय निकामी होणे- रु.1 लाख.                                             

3. विमा हप्ता भरावा लागत नाही -:  सर्व शेतकरी यांची विमा हप्त्याची रक्कम शासनामार्फत विमा  कंपनीस भरण्यात येते. त्यामुळे शेतकरी यांनी विमा हप्ता भरण्याची गरज नाही. 

4. विमा पॉलिसी कालावधी- 

    7 – 04 – 2021 ते 6- 04 – 2022

5. आवश्यक कागदपत्रे-

अ) लाभ घेण्याकरीता दावा दाखल करताना सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे-

     i) विहित नमुन्यातील पूर्व सुचनेचा अर्ज (सहपत्र क्र.1) पुर्व सूचने सोबत आवश्यक कागद

        पत्रे-

a) 7/12 उतारा किंवा 8अ.(मुळ प्रत)

b) मृत्यू दाखला (स्वयं साक्षांकीत प्रत)

c) प्रथम माहिती अहवाल

d) विजेचा धक्का अपघात, विज पडून मृत्यू, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, उंचावरुन पडून झालेला  मृत्यू, सर्प दंश/ विंचू दंश व अन्य कोणतेही अपघात यासाठी प्रथम माहिती अहवाल किंवा पोलिस पाटील अहवाल

e) घटनास्थळ पंचनामा (स्वयं साक्षांकीत प्रत)

f) वयाच्या पडताळणीकरीता जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळेच्या  मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र/ ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र किंवा  पारपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र किंवा निवडणूक ओळखपत्र (स्वयंसांक्षाकीत केलेले) वयाचा दाखला (नसल्यास शपथपत्र)

        सदरचा दावा दुर्घटने नंतर शक्यतो 45 दिवस कालावधीत नोंदवण्यात यावा.

ii) खातेदार शेतकरी कुटुंबाची शिधापत्रिका (राजपत्रित अधिकारी यांनी सांक्षाकीत केलेली)

आ) प्रस्तावा सोबत सादर करावयाची आवश्यक कागद पत्रे-

i) ज्या नोंदी वरुन अपघातग्रस्त शेतक-याचे नाव 7/12 वर आले असेल अशी संबंधीत

   फेरफार नोंद (गाव नमुना नं.6 ड) मुळ उतारा अथवा फेर फार नोंदी बाबत सक्षम प्राधिकृत अधिका-याने दिलेले प्रमाणपत्र.

ii) शेतक-याचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्या कडील गाव नमुना नं. 6 क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद. मुळ उतारा अथवा वारसाच्या नोंदी बाबत सक्षम प्राधिकृत अधिका-याने दिलेले प्रमाणपत्र.

iii) विहित नमुन्यातील कार्यकारी दंडाधिकारी यांचे समोर केलेले प्रतिज्ञापत्र (प्रपत्र-ग).   

    (मुळ प्रत.)

iv) याशिवाय अपघाताच्या घटनेच्या स्वरुपा नुसार पुराव्यादाखल सादर करावयाची   

     प्रपत्र-क मधील कागद पत्रे.

प्रपत्र – क

अपघाताच्या घटनेच्या स्वरुपानुसार पुराव्यादाखल सादर करावयाची कागदपत्रे

अ.क्र.अपघाताचे स्वरुपआवश्यक कागदपत्रे
1रस्ता/रेल्वे अपघातइन्क़्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, विमा संरक्षित व्यक्ती वाहन चालविताना अपघात झाल्यास त्याचा मोटार वाहन परवाना.
2पाण्यामध्ये बुडून मृत्यूइन्क्वेस्ट  पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, बुडून बेपत्ता झाल्यास फक्त प्रथम माहिती अहवाल व क्षतीपूर्ती बंधपत्र आवश्यक.
3जंतू नाशक अथवा अन्य कारणा मुळे विषबाधाइन्क्वेस्ट  पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, रासायनिक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल).
4विजेचा धक्का अपघात / विज पडून मृत्यूइन्क्वेस्ट  पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल.
5खूनइन्क्वेस्ट  पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, रासायनीक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल), दोषारोप पत्र
6उंचावरून पडून झालेला मृत्यूइन्क्वेस्ट  पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, पोलिस अंतिम अहवाल.
7सर्प दंश/ विंचू दंशइन्क्वेस्ट  पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, वैद्यकीय उपचारा पुर्वीच निधन झाल्याने पोस्ट मॉर्टेम झाले नसल्यास या अहवालातून सूट मात्र वैद्यकीय अधिकार्याचे प्रमाणपत्र शासकीय आरोग्य केंद्र अधिकार्याकडून प्रतिस्वाक्षरीत असणे आवश्यक.
8नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्याइन्क्वेस्ट  पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, नक्षलवादी हत्ये संदर्भातील कार्यालयीन कागदपत्र
9जनावरांच्या चावण्यामूळे रेबिज होऊन मृत्यूऔषधोपचाराची कागदपत्रे
10जनावरांच्या हल्ल्यात जखमी होऊन मृत्यूइन्क्वेस्ट  पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल
11जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू होऊन शव न मिळणेक्षतीपूर्ती बंधपत्र आवश्यक. 
12दंगलइन्क्वेस्ट  पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, दंगली बाबतची कार्यालयीन कागदपत्रे.
13अन्य कोणतेही अपघातइन्क्वेस्ट  पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, पोलिस अंतिम अहवाल. 
14अपंगत्वाच्या लाभाच्या पुराव्यासाठी सादर करावयाची कागदपत्रेअपंगत्व अथवा अवयव निकामी होण्याचे कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र अथवा दवाखान्याच्या नोंदी, प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र/जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिस्वाक्षरीसह कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र.

वरिल 1) ते 13) मधील कागदपत्र मुळ किंवा राजपत्रित अधिकारी यांनी स्वाक्षांकित केलेले अथवा  

स्वसाक्षांकीत (घोषणापत्र-ब नुसार) असल्यास ग्राह्य धरण्यात येइल. मृत्युच्या कारणाची नोंद सक्षम प्राधिकार्याने स्पष्ट केली असल्यास रासायनिक विश्लेषण अहवाल(व्हिसेरा अहवाल) या कागद पत्रांची आवश्यकता राहणार नाही.

6. अर्ज कोठे करावा- तालुका कृषी अधिकारी कार्यालयात. 

a) विमा दाव्याच्या अनुषंगाने पूर्व सुचना अर्ज विहित कागद पत्रांसह ज्या दिनांकास तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दाखल/प्राप्त होईल व संगणक प्रणालीमध्ये अपलोड होईल त्या दिनांकासच तो विमा कंपनीस प्राप्त झाला आहे असे समजण्यात येईल.

b) विमा प्रस्ताव विहित कागदपत्रांसह योजनेअंतर्गत विमा संरक्षित कालावधीत कधीही प्राप्त झाला तरी तो विचारात घेणे तसेच योजनेच्या अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातांसाठी योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्या नंतर 90            दिवसां पर्यंत तालुका कृषी अधिकारी यांचेकडे प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील. शिवाय योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्या नंतर 90 दिवसां पर्यंत संगणक प्रणाली मध्ये नोंद झालेल्या पूर्व सुचना अर्जान्वये तालुका कृषी अधिकारी यांचे कडे प्राप्त होणारे विमा प्रस्तावसुद्धा विमा पॉलिसी चा कालावधी संपल्याच्या  दिवसापासून 365 दिवसांपर्यंत (दि. 6 एप्रिल,2022) स्विकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील. मात्र सदर कालावधी नंतर कोणताही प्रस्ताव स्विकारला जाणार नाही. तसेच या संदर्भात ग्राहक मंच किंवा इतर निर्णय / आदेश शासनावर बंधनकारक राहणार नाहीत.

 विमा कंपनी :- युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी ली. 

टोल फ्री नंबर-1800 22 4030

ई-मेल[email protected]   

विमा सल्लागार कंपनी (ब्रोकर) :- मे.ऑक्झिलियम इन्शुरंन्स ब्रोकींग  प्रा.ि.                  

प्लॉट ने.61/4, सेक्टर-28, प्लाझा हट च्या पाठीमागे,वाशीनवी मुंबई– 400703

दुरध्वनी क्रमांक-022-27650096,   टोल फ्री क्रमांक – 1800 220 812

ई मेल– gmsavy21@auxilliuminsurance.com,

Related Posts

MHGR|  Mud Crab or Mangrove Crab खेकडा संवर्धनासाठी सिल्ला ट्रॅक्‍युबेरिका या जातीस प्राधान्य द्या

खेकडा संवर्धन हे तलावामध्ये, तसेच पिंजरा पद्धतीनेदेखील करता येते. निमखाऱ्या पाण्यामध्ये सिल्ला सेरेटा आणि सिल्ला ट्रॅक्‍युबेरिका या जाती चांगल्या आहेत. सिल्ला सेरेटा रंगाने तपकिरी काळपट आणि डेंग्याच्या…

“अनुसूचित जमातीच्या बचतगटांना कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत”

अनुसूचित जमातीच्या बचतगटांना कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत कुक्कुटपालन केवळ छंद किंवा पूरक व्यवसाय न राहता अर्थार्जनाचा स्वतंत्र व्यवसाय झालेला आहे. पारंपरिक पद्धतीने एक व्यक्ती थोड्याच पक्षांचे…

पोकरा अंतर्गत शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह अनुदान माहिती

Maharashtra GR: “What is Pokara Shednet House/Plastic Tunnel / Harit Anudan ? नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प – शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह /शेडनेटगृहातील लागवड साहित्य व…

फलोत्पादन यांत्रिकीकरण

फलोत्पादन यांत्रिकीकरण योजनेची प्रमुख उद्ष्टिे :- Telegram Group Join Now    शेतीची कामे वेळेवर करणे, शेतीकामाचा वेळ वाचविणे व मशागतीचा खर्च कमी करणे.    शेतीच्या यांत्रीकीकरणास प्रोत्साहन देणे.    फलोत्पादन पिकांची उत्पादकता व गुणवत्ता यामध्ये वाढ करणे.    फलोत्पादन पिकांच्या उत्पादन खर्चात बचत करणे.    घटकाचा लाभ घेऊ इच्छिणारे शेतकरी     लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी हॉर्टनेट…

अन्न सुरक्षा अभियान – भरडधान्य (मका)

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – भरडधान्य (मका) राष्ट्रिय अन्नसुरक्षा अभियान- भरडधान्य (मका) हे अभियान मका या पिकासाठी  राज्यातील ७ जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानासाठी अर्थ सहाय्य केंद्र हिस्सा 60 टक्के…

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान संरक्षित शेती हरितगृह उभारणी

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान संरक्षित शेती हरितगृह उभारणी योजनेचा उद्देश :- Telegram Group Join Now  1.  शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या व उच्च प्रतिच्या निर्यातक्षम पिकांच्या लागवडीसाठी आर्थिक…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *