_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/05/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/mhgr_barandbench_2024-05_7c1b7d2a-75a6-4c0d-969b-a21eab60066e_supreme_court_of_india__web_page_1600x-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee पोकरा अंतर्गत शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह अनुदान माहिती - MH General Resource पोकरा अंतर्गत शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह अनुदान माहिती - MH General Resource

पोकरा अंतर्गत शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह अनुदान माहिती

Maharashtra GR: “What is Pokara Shednet House/Plastic Tunnel / Harit Anudan ?

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प – शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह /शेडनेटगृहातील लागवड साहित्य व मशागत याविषयी माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये या अनुदानाचे उद्दिष्ट्य, अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता, अनुदान किती मिळणार ,अर्ज कुठे करायचा या सर्व गोष्टीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Telegram Group Join Now

फलोत्पादन क्षेत्रात शेती पद्धतीचा अवलंब केल्याने उच्च दर्जाचे अधिक उत्पादन घेऊन शेतकरी अधिक नफा मिळवू शकतो. शेडनेट हाऊस व हरितगृह यांच्या वापरामुळे फुलपिके आणि भाजीपाला पिकांचे उत्तम गुणवत्तापूर्ण उत्पादन हे कमी क्षेत्रात अधिक मिळते. त्यासाठी शेडनेट हाऊस, हरितगृह, प्लास्टिक टनेल इत्यादी आधुनिक कृषी तंत्राचा वापर रोपवाटिका तयार करण्यासाठी करतात. या योजनेचा मुख्य उद्दिष्ट्य शेतकऱ्याने बिगर हंगामी उत्पादन चांगल्या प्रतीचे  घेऊन अधिकाधिक नफा कमवावा असे आहे, आणि त्यासाठीच नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह /शेडनेटगृहातील लागवड साहित्य व मशागत यांकरिता शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यात येते.

शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह  योजनेचे उद्दिष्ट्ये –

  • उच्च तंत्रज्ञान वापरून बिगर हंगामी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्सहीत करणे हे या योजनेचे उद्दिष्ट्य आहे.
  • अत्यल्प/अल्प भूधारक शेतकऱ्यांना नैसर्गिक हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितिशी जुळून घेण्यास शेतकऱ्यांना मदत करून सक्षम बनविणे.
  • उच्च प्रतीच्या निर्यातक्षम आणि उच्च दर्जाच्या पिकांच्या लागवडीसाठी अर्थसहाय्य करणे.
  • ग्रामीण भागातील युवकांना कृषी क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देणे.

शेडनेटचा उपयोग हंगामी व बिगर हंगामी पिके घेण्यासाठी, उच्च मुल्यांकित आणि उच्च प्रतीचा निर्यातक्षम भाजीपाला पिके व फुलांच्या उत्पादनासाठी करण्यात येतो. शेडनेट गृहांमध्ये आर्द्रता ,तापमान, व कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणात नियंत्रण ठेवता येते. .

शेडनेट हाऊस अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता-

  • अत्यल्प व अल्प भूधारक शेतकरी ज्याची एकूण भूधारण २ हेक्टर पर्यंत आहे, तो शेतकरी या घटकांतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र असेल.
  • अल्प/अत्यल्प भूधारक,अनुसूचित जाती जमाती महिला , दिव्यांग व इतर शेतकरी यांना प्राधान्यक्रमानुसार लाभ देण्यात येईल.
  • यापूर्वी सादर घटकांतर्गत इतर शासनाच्या योजनेअंतर्गत लाभ घेतल गेला असल्यास एकत्रित लाभ ४० गुंठ्याच्या मर्यादित घेता येईल.

शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह आवश्यक कागदपत्रे –

  • ७/१२ उतारा
  • जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जातीजमाती असल्यास)           
  • ८- अ प्रमाणपत्र

 शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह अर्ज कुठे करायचा? 

इच्छुक शेतकऱ्यांनी  https//dbt.mahapocra.gov.in या संकेतस्थळावर किंवा DBT  APP द्वारे ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. 

शेडनेट हाऊस क्षेत्र मर्यादा –

एका लाभार्थ्यास शेडनेटसाठी (राउंड टाईप) कमीत कमी ५०० चौ. मीटर व जास्तीत जास्त ४००० चौ. मीटर क्षेत्र मर्यादा पर्यंत व (फ्लॅट टाईप) साठी कमीत कमी १००० चौ. मीटर व जास्तीत जास्त ४००० चौ. मीटर क्षेत्र मर्यादा पर्यंत लाभ घेता येईल. यापूर्वी कोणताही शासकीय योजने अंतर्गत लाभ घेतला असल्यास सर्व योजना मिळून प्रति लाभार्थी जास्तीत जास्त ४००० चौ. मीटर क्षेत्र मर्यादा पर्यंतच लाभ अनुज्ञेय राहील. या बाबीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना या बाबीचे तांत्रिक प्रक्षिशण अनुदान अदायगी पूर्वी घेणे बंधनकारक राहील. सदर प्रशिक्षणाची सोय राष्ट्रीय काढणी पश्चात तंत्रज्ञान प्रशीक्षण संस्था, तळेगाव दाभाडे, तालुका वडगाव मावळ, जिल्हा पुणे येथे आहे. सादर प्रशिक्षणासाठी आवश्यक शुल्काची पूर्ण रक्कम नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प मार्फत अदा करणेत येईल.

 हरितगृह खर्चाचे मापदंड –

  • शेडनेट हाऊस मध्ये फ्लॅट टाईप व राउंड टाईप असे दोन प्रकार आहे. सर्वसाधारण क्षेत्रासाठी रु. ७१०/- प्रति चौ मीटर व डोंगराळ क्षेत्रासाठी रु. ८१६ प्रति चौ मीटर याप्रमाणे खर्चाचा मापदंड आहे.
  • हरितगृहासाठी ५६० चौ मीटर करीता – रु. ५२३६००/-, १००८ चौ मीटर करिता रु. ९४२४८०/-, २०१६ चौ. मीटर करिता – १७९४२४०/-, ३१२० चौ. मीटर करिता – रु. २६३३२८०/-, तसेच ४००० चौ मीटर करिता – रु. ३३७६०००/-

पूर्वसंमती मिळाल्यानंतरचे कामकाज काय असेल?

शेतकऱ्याला पूर्वसंमती मिळाल्यानंतर मार्गदर्शक सूचनांच्या आराखड्याप्रमाणे आणि तांत्रिक निकषाप्रमाणे BIS मानांकाचे साहित्य वापरून अंदाजपत्रक तयार करून त्यानुसार उभारणी करणे. पूर्वसंमती परतत दिलेल्या मॉडेलनिहाय साहित्य वापरणे अनिवार्य असणार आहे. पूर्वसंमती दिल्यापासून २ महिन्याच्या आत हे काम पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. प्रकल्प साहित्य विकत आणल्यानंतर आणि पायासाठी खड्डे खणून झाल्यानंतर संबंधित कृषी सहाय्यक / समूह सहाय्यक यांना कळविणे बंधनकारक असणार आहे. त्यानंतर उभारणी झाल्यावर प्रमाणपत्र घ्यावे आणि ऑनलाईन अपलोड करावे. अनुदान मागणी करून मूळ बिले, प्रक्षिक्षण प्रमाणपत्राची छायांकित प्रत लाभार्थी शेतकऱ्याने स्वाक्षरी करून संकेतस्थळावर अपलोड करावीत. प्रकल्प स्थळी कायम स्वरूपी एक लोखंडी फलक  लावून त्यावर मोट्या अक्षरात “नानाजी देशमुख कृषी प्रकल्पाच्या अर्थसाहाय्याने” असे लिहून त्यावर शेतकऱ्याचे नाव, सर्वे नंबर, गाव, प्रकल्पाचे आकारमान, वर्ष, एकूण खर्चिक रक्कम, अनुदान रक्कम इत्यादींचा तपशील लिहावा.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पअंतर्गत (पोखरा) विविध कृषी योजनांची माहिती खालील लिंकवर क्लिक करा.

Related Posts

MHGR|  Mud Crab or Mangrove Crab खेकडा संवर्धनासाठी सिल्ला ट्रॅक्‍युबेरिका या जातीस प्राधान्य द्या

खेकडा संवर्धन हे तलावामध्ये, तसेच पिंजरा पद्धतीनेदेखील करता येते. निमखाऱ्या पाण्यामध्ये सिल्ला सेरेटा आणि सिल्ला ट्रॅक्‍युबेरिका या जाती चांगल्या आहेत. सिल्ला सेरेटा रंगाने तपकिरी काळपट आणि डेंग्याच्या…

“अनुसूचित जमातीच्या बचतगटांना कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत”

अनुसूचित जमातीच्या बचतगटांना कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत कुक्कुटपालन केवळ छंद किंवा पूरक व्यवसाय न राहता अर्थार्जनाचा स्वतंत्र व्यवसाय झालेला आहे. पारंपरिक पद्धतीने एक व्यक्ती थोड्याच पक्षांचे…

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना  शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, विज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे इ.नैसर्गिक आपत्तीमूळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन…

फलोत्पादन यांत्रिकीकरण

फलोत्पादन यांत्रिकीकरण योजनेची प्रमुख उद्ष्टिे :- Telegram Group Join Now    शेतीची कामे वेळेवर करणे, शेतीकामाचा वेळ वाचविणे व मशागतीचा खर्च कमी करणे.    शेतीच्या यांत्रीकीकरणास प्रोत्साहन देणे.    फलोत्पादन पिकांची उत्पादकता व गुणवत्ता यामध्ये वाढ करणे.    फलोत्पादन पिकांच्या उत्पादन खर्चात बचत करणे.    घटकाचा लाभ घेऊ इच्छिणारे शेतकरी     लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी हॉर्टनेट…

अन्न सुरक्षा अभियान – भरडधान्य (मका)

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – भरडधान्य (मका) राष्ट्रिय अन्नसुरक्षा अभियान- भरडधान्य (मका) हे अभियान मका या पिकासाठी  राज्यातील ७ जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानासाठी अर्थ सहाय्य केंद्र हिस्सा 60 टक्के…

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान संरक्षित शेती हरितगृह उभारणी

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान संरक्षित शेती हरितगृह उभारणी योजनेचा उद्देश :- Telegram Group Join Now  1.  शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या व उच्च प्रतिच्या निर्यातक्षम पिकांच्या लागवडीसाठी आर्थिक…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *