- पार्श्वभूमी
- उद्दिष्ट
- योजना व कार्यपध्दती
- आर्थिक तरतुद
- देण्यात येणा-या सेवा
- इतर क्षेञाचे योगदान
पार्श्वभूमी
राज्यातील किशोरवयीन मुला मुलींची संख्या (वय वर्ष १० ते १९) एकूण लोकसंख्येच्या साधारणपणे २३ टक्के आहे. किशोरवयामध्ये शारिरीक वाढीचे वेळी भावनिक, मानसिक, लैंगिक बदल होत असतात. याबाबत समाजामध्ये, कुटुंबामध्ये, शाळा कॉलेजमधून योग्य माहिती मिळणे दुरापास्त असते. चुकीच्या माहितीमुळे किशोरवयीन मुलांमुलीमध्ये गैरसमज निर्माण होतात. या गोष्टी टाळण्यासाठी किशोरवयीन मुला मुलीसाठी अर्श हा कार्यक्रम आर.सी.एच भाग २ अंतर्गत कार्यान्वित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सध्या राष्ट्रीय किशोर स्वास्थ्ा कार्यक्रम संबोधले जाते.
उद्दिष्ट
- किशोरवयीन मुलांमुलींना त्यांच्या आरोग्याविषयी समुपदेशन व जागृती करणे.
- किशोरवयीन मुलांमुलींना प्रजनन व लैगिंक आरोग्याबाबत माहिती देणे.
- किशोरवयीन मुलींमध्ये प्रजनन व लैगिक रोगाचे प्रमाण कमी करुन भविष्यकालीन सुरक्षित मातृत्वाबाबत जागृती करणे.
- किशोरवयीन मुलांमुलीमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण कमी करणे.
- किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीच्या स्वच्छतेविषयी जागृती करणे.
योजना व कार्यपध्दती
- मैत्री क्लिनीकची स्थापना.
- शाळा व महाविदयालयांमध्ये बाहय संपर्क कार्यक्रमाचे आयोजन.
- किशोरवयीन मुलांमुलींमधील रक्तक्षयास प्रतिबंध व नियंञणासाठी दर आठवडी लोहयुक्त गोळयांचे वितरण करणे तसेच जंतनाशक गोळयांचे वितरण वर्षातून दोन वेळा करुन जंतनाशक मोहिम राबविणे (Weekly Iron Folic Acid Supplementation Scheme – WIFS).
- मासिक पाळीमधील स्वच्छता संवर्धन योजने अंतर्गत (Promotion of Menstrual Hygiene Scheme – PMHS ) किशोरवयीन मुलींना कमी किंमतीत सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरवठा .
आर्थिक तरतुद
प्रजनन व बाल आरोग्य (टप्पा दोन ) या कार्यक्रमाअंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखडा यामध्ये सदर कार्यक्रमाची तरतुद करण्यात आलेली आहे.
देण्यात येणा-या सेवा
राज्यात १९१ अर्श क्लिनीकची स्थापना केली आहे, त्यांना मैञी क्लिनीक असे नाव देण्यात आले आहे. सदर मैञी क्लिनीक राज्यातील निवडक जिल्हा सामान्य रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, स्ञी रुग्णालये, वैदयकीय महाविदयालयांमध्ये, शहरी भागात व काही प्रा. आ. केंद्रात स्थापन करण्यात आलेली आहेत.
मासिक पाळीच्या वेळी स्वच्छता संवर्धन कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील ८ जिल्हयामधील ग्रामीण भागातील मुलींना आशा सेविकांमार्फत सॅनिटरी नॅपकिन्स माफक दरात पुरविल्या जातात. हा कार्यक्रम अमरावती, बुलढाणा, नंदुरबार, सातारा, अकोला, लातूर, धुळे व बीड ८ जिल्हयात सुरु आहे. या योजने अंतर्गत आरोग्य शिक्षण आरोग्य सेविकामार्फत आशा सेविकांना देण्यात येते. सदर योजनेचे नियंञण वैदयकीय अधिकारी यांच्या मार्फत केले जाते.
डब्लू.आय.एफ.एस. योजना किशोरवयीन मुलांमुलींमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्यासाठी सुरु केली आहे. शाळेत जाणा-या इयत्ता ६ वी ते १२ वी मधील मुलेमुली व शाळेत न जाणा-या किशोरवयीन मुली, विवाहित पण गरोदर नसलेल्या किशोरवयीन मुली हे या योजने अंतर्गत लाभार्थी आहेत. दर सोमवारी लोहयुक्त गोळयांचे वाटप शाळा व अंगणवाडी केंद्रामार्फत केले जाते व जंतनाशक गोळी वर्षातुन दोनवेळा सहा महिन्याच्या अंतराने देण्यात येते.
इतर क्षेञाचे योगदान
- बाहय संपर्क कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळा, महाविदयालये यांचा सहभाग.