_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/05/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/mhgr_barandbench_2024-05_7c1b7d2a-75a6-4c0d-969b-a21eab60066e_supreme_court_of_india__web_page_1600x-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee फलोत्पादन यांत्रिकीकरण - MH General Resource फलोत्पादन यांत्रिकीकरण - MH General Resource

फलोत्पादन यांत्रिकीकरण

फलोत्पादन यांत्रिकीकरण

योजनेची प्रमुख उद्ष्टिे :-

Telegram Group Join Now

   शेतीची कामे वेळेवर करणे, शेतीकामाचा वेळ वाचविणे व मशागतीचा खर्च कमी करणे.

   शेतीच्या यांत्रीकीकरणास प्रोत्साहन देणे.

   फलोत्पादन पिकांची उत्पादकता व गुणवत्ता यामध्ये वाढ करणे.

   फलोत्पादन पिकांच्या उत्पादन खर्चात बचत करणे.

   घटकाचा लाभ घेऊ इच्छिणारे शेतकरी

    लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी हॉर्टनेट या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी.

    संकेत स्थळावर नोंदणी करतांना शेतकऱ्यंानी सोबत जोडलेल्या विहीत नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-1), 7/12 उतारा, फोटो, आधार सलग्न राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या प्रथम पानाची झेरॉक्स प्रत (फोटोसहीत), आधार कार्ड, जातीचा दाखला (अनु.जाती/अनु.जमाती शेतकऱ्यांसाठी) इत्यादी कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावीत.

       आवश्यक कागदपत्रे

1.   अर्ज.

2.  7/12 चा उतारा (फलोत्पादनाच्या नोंदीसह).

3.  आधार कार्डाची झेरॉक्स (नसल्यास आधार कार्डाची मागणी केलेल्या पावतीची झेरॉक्स).

4.  आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पुस्तकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स (फोटोसह).

5.  हमीपत्र.

6.  लाभार्थी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील असल्यास वैध अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र/संवर्ग दाखला.

वरीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रांसह तालुका कृषि अधिकारी यांना 10 कार्यालयीन दिवसात सादर करावयाचा आहे. अपूर्ण व त्रुटीचे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत.

पुर्वसंमती –

1. तालुका कृषि अधिकारी यांनी पात्र प्रस्तावांना लक्षांकाच्या अधिन राहुन पुर्वसंमती द्यावी.

2. ट्रॅक्टर या घटकाची मोका तपासणी तालुका कृषि अधिकारी यांनी करावी. तर मंडळ कृषि     

   अधिकारी यांनी अवजारे या घटकाची मोका तपासणी करावी.

3. तालुका कृषि अधिकारी यांनी प्रस्ताव हॉर्टनेटद्वारे जिल्हा कृषि अधिकारी यांचेकडे सादर करावा.   

   सदर प्रस्तावास उपविभागीय कृषि अधिकारी यांनी अनुदानाची शिफारस करावी.

4. जिल्हास्तरावरुन  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी लाभार्थ्यींच्या खात्यात पी.एफ.एम.एस.

    द्वारे अनुदान जमा करावे..

तपासणी टक्केवारी :-

  अमंलबजावणी सुचनामधील क्षेत्रविस्तार या घटकांची तालुका कृषि अधिकारी यांनी  15 टक्के किंवा 60 यंत्र/ अवजारे, उपविभागीय कृषि अधिकारी यांनी 10 टक्के किंवा 50 यंत्र/ अवजारे,जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  यांनी 5 टक्के किंवा 25 यंत्र/ अवजारे  व विभागीय कृषि सहसंचालक यांनी 2 टक्के किंवा 10 यंत्र/ अवजारे याप्रमाणे तपासणी करावी.

अर्थसहाय्याचे स्वरुप

.क्र.यंत्रसामुग्री प्रकार      मापदंड इतर लाभार्थीएससीएसटीमहिलालहान  सीमांत शेतकरीयंत्रसामुग्री यादी
अधिकतम अनुदान मर्यादाअधिकतम अनुदान मर्यादा
1.ट्रॅक्टर 20 अश्वशक्तीपर्यंतरु.3.00 लाख प्रती युनिटकिंमतीच्या 25 टक्के जास्तीत जास्त                रु.0.75 लाख प्रती युनिटकिंमतीच्या 35 टक्के जास्तीत जास्त                         रु.1.00लाख प्रती युनिटTractor
2.पीक संरक्षण उपकरणे
1.मॅन्युअल स्पेअरअ. नॅपसॅक/फ्रुट स्प्रेअर संचलितरु.0.012 लाख प्रती युनिटजास्तीत जास्त                         रु.0.005 लाख प्रती युनिटजास्तीत जास्त                         रु. 0.006 लाख  प्रती युनिट(i) Knapsack/foot operated sprayer.
2.पॉवर नॅपसॅक स्प्रेअर/पॉवर संचलित, तैवान स्प्रेअर क्षमता 8-10 लीटर. रु.0.062 लाख प्रती युनिटजास्तीत जास्त                         रु.0.025 लाख प्रती युनिटजास्तीत जास्त                         रु. 0.031 लाख  प्रती युनिटPowered Knapsack sprayer/PowerOperated Taiwan sprayer
3.नवीन सयंत्रे/उपकरणे परदेशातून फलोत्पादन प्रात्यक्षिकासाठी आयात करणे.  (सार्वजनिक क्षेत्र)रु.50.00 लाख प्रति युनिटहा घटक सार्वजनिक क्षेत्रासाठी असुन एकूण खर्चाच्या 100 टक्के अनुदान देय 

अंमलबजावणी करीता महत्वाच्या सुचना :-

1.   जिल्हास्तरावर या योजनेसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हे अंमलबजावणी अधिकारी म्हणून काम पहातील. उपरोक्त यादीतील प्रस्तावास मंजूरी प्राप्त झाल्यानंतर तालुका कृषि अधिकारी यांनी पुर्वसंमती द्यावी. पुर्वसंमती मिळाल्यानंतर लाभार्थींने यंत्रसामुग्री, औजारे व उपकरणे  खरेदी करावीत.

2.   फलोत्पादन यांत्रिकीकरण हा घटक एका विशिष्ट उद्देशाने राबविण्यात येत असल्यामुळे योग्य लाभार्थ्यांची निवड करणे आवश्यक आहे. निवड केलेल्या लाभार्थ्याकडून घटक योग्य रितीने राबविण्याबाबतचे हमीपत्र घ्यावे.

3.   लाभार्थ्यीने फलोत्पादन यांत्रिकीकरण या घटकांतर्गत कृषि अवजारे, सयंत्रे व उपकरणे ही कृषि आयुक्तालयाने उन्नत शेती समृद्ध शेतकरी योजनेंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार व केंद्र शासनाच्या यांत्रिकीकरण योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार खरेदी करावीत. .

4.   अनुदान दिल्यानंतर लाभार्थ्याने ट्रॅक्टर/ अवजारावर योजनेचे नाव, वर्ष, लाभार्थ्यीचे नाव नमुद करावे.

5.  मंडळ कृषि अधिकारी यांचे मोका तपासणी अहवालानुसार जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचेस्तरावरुन पी.एफ.एम.एस.  द्वारे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावे.

अधिक माहितीसाठी www.mahanhm.gov.in अधिक या वेबसाईट वरील मार्गदर्शक वरील सुचना पहा किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Related Posts

MHGR|  Mud Crab or Mangrove Crab खेकडा संवर्धनासाठी सिल्ला ट्रॅक्‍युबेरिका या जातीस प्राधान्य द्या

खेकडा संवर्धन हे तलावामध्ये, तसेच पिंजरा पद्धतीनेदेखील करता येते. निमखाऱ्या पाण्यामध्ये सिल्ला सेरेटा आणि सिल्ला ट्रॅक्‍युबेरिका या जाती चांगल्या आहेत. सिल्ला सेरेटा रंगाने तपकिरी काळपट आणि डेंग्याच्या…

“अनुसूचित जमातीच्या बचतगटांना कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत”

अनुसूचित जमातीच्या बचतगटांना कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत कुक्कुटपालन केवळ छंद किंवा पूरक व्यवसाय न राहता अर्थार्जनाचा स्वतंत्र व्यवसाय झालेला आहे. पारंपरिक पद्धतीने एक व्यक्ती थोड्याच पक्षांचे…

पोकरा अंतर्गत शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह अनुदान माहिती

Maharashtra GR: “What is Pokara Shednet House/Plastic Tunnel / Harit Anudan ? नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प – शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह /शेडनेटगृहातील लागवड साहित्य व…

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना  शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, विज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे इ.नैसर्गिक आपत्तीमूळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन…

अन्न सुरक्षा अभियान – भरडधान्य (मका)

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – भरडधान्य (मका) राष्ट्रिय अन्नसुरक्षा अभियान- भरडधान्य (मका) हे अभियान मका या पिकासाठी  राज्यातील ७ जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानासाठी अर्थ सहाय्य केंद्र हिस्सा 60 टक्के…

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान संरक्षित शेती हरितगृह उभारणी

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान संरक्षित शेती हरितगृह उभारणी योजनेचा उद्देश :- Telegram Group Join Now  1.  शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या व उच्च प्रतिच्या निर्यातक्षम पिकांच्या लागवडीसाठी आर्थिक…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *