_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/02/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%97-%e0%a4%87%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-gig-%e0%a4%95/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-how-to-make-money-online/mhgr_how_to_make_money_online-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee बौद्ध पुराणकथा - MH General Resource बौद्ध पुराणकथा - MH General Resource

बौद्ध पुराणकथा

Spread the love

प्रारंभीच्या काळात बौद्ध धर्मात पुराणकथांना फारसे स्थान नव्हते; परंतु लवकरच विविध पुराणकथा निर्माण झाल्या.हिंदूनी बुद्धाला विष्णूचा अवतार मानून त्याच्याभोवती पुराणकथेचे वलय तयार केले. बौद्धांनीही बुद्ध व बोधिसत्त्व यांच्याविषयी अनेक पुराणकथा तयार केल्या. शुद्धोदनाची पत्नी माया हिला शुभ्र हत्तीच्या रूपाने बोधिसत्त्व आपल्या गर्भात प्रवेश करीत असल्याचे स्वप्न पडले. जन्माच्या वेळी ब्रह्मदेवादींनी त्याचा स्वीकार केला. तो ज्या दिवशी जन्मला त्याच दिवशी त्याची भावी पत्नी यशोधरा, बोधिवृक्ष, त्याचा शिष्य व मित्र आनंद आणि तो ज्या घोड्यावरून संन्यासासाठी गेला तो कंटक घोडा या सर्वांचा जन्म झाला. जन्मल्याबरोबर त्याने सात दिशांनी सात पावले टाकून जग जिंकले. जेथे त्याचे पाऊल लागले, तेथे कमळ प्रकट झाले. तो जन्मताच वृक्षवेली फुलल्या , वाद्ये आपोआप वाजू लागली आणि नद्या थांबल्या. तो मंदिरात जाताच देवमूर्तींनी त्या प्रणाम केला.

Telegram Group Join Now

तो संन्यासासाठी गेला, तेव्हा देवांनी पहारेकऱ्यांना झोपवले आणि आवाज होऊ नये म्हणून घोड्यांचे खूर कापून टाकले. नंतर नागराज व त्याची पत्नी यांनी पाताळातून येऊन त्याची पूजा केली . माराने अप्सरा पाठवून त्याला भुरळ पाडण्याचा व हल्ला करून भिवविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला . ज्ञानप्राप्तीनंतर निर्वाणात प्रवेश न करता देवांच्या विनंतीवरून लोकांना उपदेश देण्यासाठी तो पृथ्वीवरच राहिला. शरीराच्या खालच्या भागापासून अग्नी आणि वरच्या भागापासून पाऊस पाडणे इ. चमत्कार त्याने केले. स्वर्गात जाऊन, आईला उपदेश देऊन सोन्यारुप्याच्या शिडीवरून तो परत आला. मृत्यूनंतर त्याची चिता आपोआप पेटली योग्य वेळी पावसाने विझली. बौद्ध धर्मात वैरोचन, रत्नसंभव, अमोघसिद्धी, अमिताभ आणि अक्षोभ्य असे पाच ध्यानिबुद्ध मानलेले आहेत.

ज्ञानप्राप्तीसाठी बुद्धाला बोधिसत्त्व म्हटले जाते. जातके किंवा जातककथा म्हणजे बोधिसत्त्वांच्या जन्मकथाच आहेत. बोधिसत्त्वांना गर्भातील सर्व अवस्था भोगाव्या लागत नाहीत. ते शुभ्र हत्तीच्या रूपाने मातेच्या गर्भात प्रवेश करताच आणि उजव्या कुशीतून बाहेर पडतात. समंतभद्र, रत्नपाणी, विश्वपाणी, वज्रपाणी, अवलोकितेश्वर असे ध्यानिबोधिसत्त्व मानलेले असून अवलोकितेश्वराच्या डोळ्यांपासून चंद्रसूर्य इ. प्रकारे देवांची निर्मिती झाली. तारा ही अवलोकितेश्वराच्या अश्रूंपासून जन्मलेली देवता होती. प्रज्ञा, करुणा इ. शक्तीही होत्या. मैत्रेय बुद्ध हा भावी बुद्ध असून तो अजून तुषित स्वर्गात राहतो. मंजूश्री, क्षितीगर्भ इ. बोधिसत्त्वही होते.

संदर्भ  : 1 Aldington, Richard; Ames, Delano; Trans. New Larousse Encyclopaedia of Mythology, Mythology, London, 1975.

2.Bolle, K. W. The Freedom of Man in Myth,Mashhville, Tenn. 1968.

3. Campbell, y3wuoeph, The Masks of God, 4 Vols. London,1959-68.

4. Dandekar, R.N.Vedic Religion and Mythology, Poona, 1965.

5 Dent, J. M ;Dutton, E. p. Everyman’s Dictionary of Non- Classical Mythology, New York, 1952.

6. Eliade,Micera; Trans. Myth and Reality, New York,1963.

7. Frazer,J.G.The Golden Bough, New York, 1922

8. Gray, L. H. Ed. The Mythology of all  Races, 13 Vols., Boston 1925-36.

9. Hackin ,J.; Huart Clement & other, trans , Atkinson, F, M, Asiatic mythology, London, 1967.

10. Hooke, S.H. Ed. Myth and Ritual, New York, 1933.

11. Ions, Veronica, Indian Mythology, London, 1967.

12. James, e.o Prehistoric, Religions London, 1957.

13. Jensen, a,e Trans. Myth and Cult among Primitive Peoples, New York, 1963.

14.  Jung, C.G. Kerenyi, K. Trans. Essays on a Science of Mythology, New York, 1950.

15.  Kramer, S.H. Ed ,Mythologies of the Ancient World , Creation, New York 1961.

16. Long C.H.Alpha : The Myths of Cretion, new York, 1963.

17. Malinowaski, Bronislaw Magic, Science and Religion and other Essays, Bosyon, 1948.

18. Malinoyaski Bronislaw Sex, Culture and Myth  ,London 1963.

19. Middleton, John, Myth and Cosmos: Readings in Mythology and Symbolism New York, 1967.

20. Picard, B.L Ed. The Enclcopadia of Myth & Lagends of All Nations, London 1962.

21. Savill, Sheila Ed. Barker Mary: Cook, Christopher Pears Encyclopaedia of Myth and Lagends,       4. Vols., London, 1976-78.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *