भारतीय वायुसेना सैन्य भरती
सैन्यामध्ये जाणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थैर्य मिळवून देणारी सैन्यातील नोकरी तरुणांना आकर्षित करत असते. भारतीय सैन्याच्या तिन्ही दलापैकी वायुसेना हे दल अत्यंत महत्वाचे आणि शक्तिशाली मानले जाते. सैन्याची ताकद ही वायुसेनेच्या सामर्थ्यावर मोजली जाते. जगातील प्रमुख वायुसेनेमध्ये भारतीय वायुसेनेचा समावेश आहे. आजवर अनेक रणसंग्रामामध्ये या दलाने महत्वाची भूमिका बजावली आहे. भारतीय वायुसेनेचे ध्येयवाक्य आहे. नभ:स्पृशं दीप्तम्। हे वाक्य गीतेतल्या एका श्लोकात आले आहे. तो श्लोक असा आहे .नभ:स्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् । दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो॥. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती राधाकृष्णन् ह्यांनी हे वाक्य सुचविलेले आहे. अशा अद्वितीय वायुसेनेमध्ये भरती होण्याची नामी संधी आता तरुणांना उपलब्ध होत आहे. त्याचा घेतलेला आढावा खास करिअरनामा या सदरासाठी
भारतीय वायुसेनेद्वारा दिनांक ६ मे २०१७ ते १२ मे २०१७ या कालावधीत महाराष्ट्र व गोवा राज्यामधील इच्छुक उमेदवाराकरीता तासगांव (जिल्हा सांगली) येथे सैन्य भरती मेळावा आयोजित केला जात असून या मेळाव्यामध्ये भारतीय वायुसेना (सुरक्षा/गरुड) व मेडीकल असिस्टंट या पदासाठी निवड केली जाणार आहे.
भरतीचे ठिकाण आणि दिनांक
भरतीची दिनांक व वेळ ८ मे २०१७, पहाटे ५.३० ते ९.३० पर्यंत (उशिरा येणा-या उमेदवारांना भरती प्रक्रियेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही),
भारतीय वायुसेना (सुरक्षा/गरुड)
शैक्षणिक पात्रता
इयत्ता १२ वी पास आर्ट्स / कॉमर्स/ सायन्स शाखेतून किमान ५० टक्के गुणासह उत्तीर्ण व इंग्रजी विषयात किमान ५० टक्के गुण आवश्यक. वय जन्मतारीख ७ जुलै १९९७ ते २० डिसेंबर २००० या दरम्यान जन्म असावा (१७ ते २१वर्ष).
शारिरीक पात्रता
उमेदवाराची (उंची) १५२.५ से. मी., शारिरीक क्षमता चाचणी १.६ कि.मी धावणे (५ मिनटे ४० सेंकदमध्ये), ८ चिनअप्स, २० पुशअप्स आणि २० सिटअप्स,
आवश्यक कागदपत्रे
१० वी पासचे मुळ सर्टिफिकेट, १२ वी पासचे मुळ सर्टिफिकेट व गुणपत्रक, अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल), लेखी परिक्षा ५० मार्कसचे ५० प्रश्न (इंग्रजी, बुध्दीमता चाचणी व सामान्य ज्ञान) अनुकूलन क्षमता चाचणी (अडॅप्टबिलिटि टेस्ट). अनुकूलक्षमता चाचणी क्र १ व २ (अडॅप्टबिलिटि टेस्ट).
भारतीय वायुसेना (मेडीकल असिस्टंट)
भरतीची दिनांक व वेळ १० मे २०१७, पहाटे ५.३० ते ९.३० पर्यंत (उशिरा येणा-या उमेदवारांना भरती प्रक्रियेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही),
शैक्षणिक पात्रता
इयत्ता १२ वी पास सायन्स शाखेतून किमान ५० टक्के गुणासह उत्तीर्ण व इंग्रजी विषयात किमान ५० टक्के गुण व जीवशास्त्र विषय आवश्यक. वय जन्मतारीख ७ जुलै १९९७ ते २० डिसेंबर २००० या दरम्यान जन्म असावा (१७ ते २१ वर्ष).
शारिरीक पात्रता
आवश्यक कागदपत्रे
१० वी पासचे मुळ सर्टिफिकेट, १२ वी पासचे मुळ सर्टिफिकेट व गुणपत्रक, अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल), लेखी परिक्षा ५०मार्कसचे ५० प्रश्न (४५ मिनिटामध्ये सोडविणे) शारिरीक क्षमता चाचणी १.६ कि.मी धावणे (७ मिनटात पूर्ण करणे), १०पुशअप्स, १० सिटअप्स आणि १० बैठका. संयोगक्षमता चाचणी (अडॅप्टबिलिटि टेस्ट) संयोगक्षमता चाचणी (एटी २).
सैन्य भरती प्रक्रिया सर्वासाठी मोफत असुन पात्र असणा-या उमेदवारांची गुणवत्तेनुसार भरती केली जाते. त्यासाठी कोणत्याही एजंटची / मध्यस्थीची मदत घेऊ नये किंवा त्यांना पैसे देऊ नये व अशा फसवणुकीपासुन सावध रहावे तसेच आपण एजंट / मध्यस्थ्यांच्या सानिध्यात असाल तर त्याची माहिती त्वरीत जवळच्या पोलीस स्टेशनला/ भरती अधिका-याला किंवा अॅंटी करप्शन सेल (लाचलुपत प्रतिबंध विभाग, सांगली) दुरध्वनी क्रमांक ०२३३-२३७३०९५, ८६००८९७१९९, ९४२१८५८५७० यांना द्यावी. गैरवर्तणुक करणा-या उमेदवारास सैन्य भरतीतून अपात्र करुन त्याचे विरुध्द कायदेशीर कारवाई केली जाईल, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सिंधुदुर्ग यांचेकडून कळविण्यात आले आहे.भारतीय सैन्यात भरती होणे ही एक महत्वाची सुसंधी आहे. चला तर मग तयार व्हा, राष्ट्राच्या सेवेसाठी. कठोर परिश्रम आणि अथकपणे केलेल्या प्रयत्नातून यश साकारले जाते. तर मग या सैन्य भरतीत सहभागी होवून भारतीय वायुसेनेचा भाग व्हा.