_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/03/","Post":"https://maharashtragr.com/maharashtragr-forced-prostitution/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/maharashtragr-forced-prostitution/%e0%a4%b8%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%be-2/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2022 महाराष्ट्र संपूर्ण माहिती - MH General Resource महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2022 महाराष्ट्र संपूर्ण माहिती - MH General Resource

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2022 महाराष्ट्र संपूर्ण माहिती

Spread the love

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Maharashtra: नमस्कार मित्रांनो, आज आपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2022 ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो काय आहे हि योजना, लाभ, या सर्व गोष्टींचा माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. दिनांक १३ एप्रिल २०१७ अन्वये ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ दि.१ एप्रिल २०१७ पासून ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ या नावाने सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Telegram Group Join Now

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे उद्दिष्ट –

या योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या गरीब लोकांवर उपचार करणे आहे. यासाठी राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ हे कोणत्याही प्रकारचे रेशनकार्ड असणारे नागरिक घेऊ शकतात. तसेच कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला बळी पडलेले शेतकरी सुद्धा या योजनेत सामाविष्ट करण्यात आलेले आहेत. तसेच ज्यांचे आर्थिक समर्थन अत्यंत कमकुवत आहे, अशा गरीब लोकांसाठी शस्त्रक्रिया प्रत्यारोपण थेरेपी सारख्या महागड्या आरोग्य सेवा सुद्धा या योजनेअंतर्गत पुरवल्या जाणार आहेत. या सर्व आजारांसाठी महाराष्ट्र राज्यातील शासकीय रुग्णालय निवडली गेलेली आहेत.

(MJPJA पात्रता) Mahatma Jyotiba Phule Scheme Eligibility –

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील नोंदणीची पात्रता ही खालीलप्रमाणे असणार आहे.

 • अर्जदाराचे कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे नागरिक असणे गरजेचे असणार आहे.
 • या योजनेतील अर्जदार हे आर्थिक दृष्ट्या दुर्बल गरीब कुटुंबाचे आणि त्यांचे उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी असणारे सर्व राज्यातील नागरिक हे या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
 • महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामधील गरीब कुटुंबातील कोणत्याही रंगाचे रेशन कार्ड असलेल्या म्हणजेच पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे. त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
 • या योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीने ग्रस्त असलेले शेतकरी लाभ घेऊ शकतात. लाभ घेण्यास पात्र असणार आहेत.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची कार्यपद्धती कशी असणार आहे?

 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरातील रहिवाशांना जवळच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावे लागणार आहे.
 • त्यानंतर गावातील उमेदवारांसाठी त्यांना शासकीय आरोग्य शिबिरात जाऊन त्यांचा आजार तपासून घ्यावा लागेल.
 • यानंतर अर्जदारास त्याच्या आजाराची तपासणी ही तज्ञ डॉक्टरांकडून करून घ्यावी लागेल.
 • एकदा का आजाराची खात्री झाल्यास रोगाचा तपशील आणि खर्चाचा तपशील आरोग्य मित्रांना कळवून नोंदवला जाईल. तसेच आजाराचा त्रास रुग्णालय व डॉक्टरांचा खर्च या योजनेच्या पोर्टल वर ऑनलाइन दाखल केला जाईल .
 • ही प्रक्रिया चोवीस तासाच्या आत पूर्ण होईल यानंतर रुग्णालयावर उपचार सुरू केले जातात आणि उपचारादरम्यान कोणताही उपचार संबंधित खर्च रुग्णाकडून केला जात नाही.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा तपशील –

लाभार्थी –

अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून वितरित करण्यात आलेल्या पिवळ्या अंत्योदय अन्नपूर्णा योजना व केशरी शिधा पत्रिका धारक ज्यांचे उत्पन्न हे एक लाख पर्यंत आहे तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे या योजनेचे लाभार्थी असणार आहेत.

योजने अंतर्गत विमा संरक्षण –

या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रति वर्ष दीड लाखापर्यंत चे विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपण ही मर्यादा प्रतिवर्ष अडीच लाखापर्यंत आहे. लाभार्थी कुटुंबासाठी कोणत्याही एका व्यक्तीला व अनेक व्यक्तीला वरील योजनेचा लाभ घेता येणार आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत कोणते उपचार समाविष्ट असणार आहेत ? (mahatma jyotiba phule jan arogya yojana disease list)

या योजनेअंतर्गत विशेष सेवांतर्गत ७७१ उपचार व शस्त्रक्रिया तसेच १२१ पाठपुरावा सेवांचा समावेश असणार आहे. सदर योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे सेवा व उपचार असणार आहेत.

 • सर्वसाधारण शस्त्रक्रिया
 • काम, नाक घसा शस्त्रक्रिया
 • नेत्ररोग शस्त्रक्रिया
 • स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र
 • अस्थिरोग शस्त्रक्रिया व प्रक्रिया
 • पोठ व जठार शस्त्रक्रिया
 • कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक सर्जरी
 • बालरोग शस्त्रक्रिया
 • प्रजनन व मूत्र रोग शस्त्रक्रिया
 • मज्जातंतूविकृती शास्त्र
 • कर्करोग शस्त्रक्रिया
 • वैद्यकीय कर्करोग उपचार
 • रेडीओथेरपी कर्करोग
 • त्वचाप्रत्यारोपण शस्त्रक्रिया
 • जळीत
 • पॉलिट्रामा
 • प्रोस्थेसिस
 • जोखिमी देखभाल
 • जनरल मेडिसिन
 • संसर्गजन्य रोग
 • बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन
 • हृदयरोग
 • नेफ्रोलोजी
 • न्युरोलोजी
 • पल्मोनोलोजी
 • चर्मरोग चिकित्सा
 • रोमेटोलोजी
 • इंडोक्रायनोलोजी
 • मेडिकल गेस्ट्रोइंट्रोलोजी
 • इंटरवेन्शनल रेडीओलोजी

प्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य योजना (PMJAY) कार्ड Online Apply २०२१

विम्याचा हप्ता कोण देणार ?

या योजनेच्या लाभार्थी कुटुंबासाठी विम्याचा हप्ता हा राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत नॅशनल इन्शुरन्स कंपनीमार्फत  करण्यात येतो.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत कोणती रुग्णालय समाविष्ट आहेत ?

या योजनेत शासकीय आणि निमशासकीय खाजगी तसेच धर्मादाय संस्थेच्या रुग्णालयांची ३० पेक्षा अधिक खाटा असणारे असणाऱ्या निकषांवरून करण्यात आली आहे. लाभार्थी त्यांच्या मर्जीनुसार राज्यातील कोणत्याही रूग्णालयात त्यांचा उपचार करून घेऊ शकतो.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची फी किती ?

या योजनेअंतर्गत लाभार्थी रुग्णास ही निशुल्क वैद्यकीय सेवा पुरवण्यात येणार आहे. ती पुर्णतः संगणीकृत असून लाभार्थ्यास वैध शिधा पत्रक पिवळी, अंत्योदय, अन्नपूर्णा व केसरी व फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयांमधून उपचार अनुज्ञेय राहणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त शुभ्र शिधापत्रिका शेतकऱ्यांना देखील लाभ देण्यात येणार आहे. १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे. त्यामध्ये सातबारा उतारा फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीभूत रुग्णालयांमधून उपचार हा अनुज्ञेय राहणार आहे. वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयाचा उपचार निदान आवश्यक औषधोपचार व भोजन तसेच एका वेळचा परतीचा प्रवास खर्च यामध्ये सामावेश करून दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत रुग्णालयातून मुक्त केलेल्या केल्यानंतर दहा दिवसांत पर्यंतचा सेवा पॅकेज मध्ये समाविष्ट आहेत.

आरोग्यमित्र –

अंगीकृत रुग्णालयात लाभार्थी रुग्णांची नोंदणी उपचारादरम्यान सहाय्यक तसेच मार्गदर्शन करण्यासाठी आरोग्य मित्रांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रत्येक अंगीकृत रुग्णालयांमध्ये आरोग्य मित्र हे उपलब्ध असणार आहेत.

आरोग्य शिबिर –

योजनेचा लाभ अधिकाधिक रुग्णांना घेता यावा, यासाठी अंगीकृत रुग्णालयामार्फत ही आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येतात. या शिबिरात रुग्णांची तपासणी करून दिली जाते. तसेच या योजनेतील ९७१ उपचारांत पैकी उपचारास सदर रुग्ण पात्र ठरल्यास त्यावर योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपचार केले जातात.

संजय गांधी निराधार पेन्शन अनुदान योजना २०२१ संपूर्ण माहिती

(mahatma jyotiba phule scheme required document list) महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे असणार आहेत.

 • आधार कार्ड
 • रेशन कार्ड
 • सरकारी डॉक्टरांनी दिलेल्या आजाराचे प्रमाणपत्र
 • वय प्रमाणपत्र
 • अर्जदाराची तीन पासपोर्ट आकाराची फोटो
 • उत्पन्न प्रमाणपत्र

(MJPJA) महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेची ऑफिशियल वेबसाइट –

https://www.jeevandayee.gov.in/

mjpjay registration online 2022 महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

पोर्टलवर रजिस्ट्रेशन प्रक्रिया –

 • सर्व प्रथम, आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
 • आता मुख्यपृष्ठ आपल्यासमोर उघडेल.
 • मुख्य पृष्ठावर, आपल्याला लॉगिन पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • त्यानंतर तुमच्या पुढे एक नवीन पृष्ठ दिसेल, त्यामध्ये तुम्हाला युजर आईडी पासवर्ड भरावा लागेल.
 • त्यानंतर लॉगिन वर क्लिक करावे लागेल.
 • अश्या प्रकारे तुमचे रजिस्ट्रेशन होईल.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या ऑनलाईन नोंदणीसाठी –

 • रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल.
 • लॉगिन केल्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन फॉर्म स्क्रीनवर उघडेल.
 • यामध्ये आपल्याला स्वतःशी संबंधित सर्व माहिती तयार करावी लागेल आणि सर्व प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील.
 • यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
 • मित्रांनो सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही नोंदणीकृत असाल आणि त्यानंतर तुम्हाला कोणत्याही सरकारी रुग्णालयात उपचार मिळू शकतात.

 Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Contact Number –

रुग्णालय- आरोग्य मित्र (MJPJA contact)

पोस्ट बॉक्स – पो.बॉक्स क्र. १६५६५, वरळी पोस्ट ऑफिस
वरळी मुंबई – ४००००१८

Related Posts

सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात बंधपत्र “अ”| Option Form Regarding Direct Recruitment

Spread the love

Spread the love सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात बंधपत्र “अ”/ Option Form Regarding Direct Recruitment  Telegram Group Join Now

राजपत्रित अधिकाऱ्यांचे कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र | Charge Transfer Certificate

Spread the love

Spread the love राजपत्रित अधिकाऱ्यांचे कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र | Charge Transfer Certificate Telegram Group Join Now

Maharashtra Lipik Exam: Application Form

Spread the love

Spread the love Maharashtra Lipik Exam: Application Form Telegram Group Join Now

Maharashtra Lekha Lipik Exam: M.A.C. Application Form

Spread the love

Spread the love

How to Free ISM V6.2 Download : Devanagari देवनागरी : Indian Language

Spread the love

Spread the love Since 1991, the ISM range of software, from C-DAC GIST has been providing the state of the art Indian language edge to existing as…

The Land Revenue Rules, 1921 | Record of Rights| Power And Duties of Officers | In government official language | सरकारी अधिकृत भाषेत

Spread the love

Spread the love The Land Revenue Rules, 1921 | Record of Rights| Power And Duties of Officers | F.G.H. Anderson | Maharashtra Land Revenue MANUAL

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *